एअरफ्रायर

एअरफ्रायर पाकृ : स्वीट पटेटो फ्राईज

स्वीट पटेटो/याम/रताळं/बटाटे काही पण घ्या. सालं काढून फ्राईजच्या आकारात कापा. २०-३० मिनिटं बोलमध्ये पाण्यात घालून ठेवा. नंतर बाहेर काढून पेपर टॉवेलने पाणी टिपून ड्राय करा.थोडा ऑलिव्ह ऑइल (किंवा कोणतेही) घेऊन कापांना चोळा.
एअरफ्रायर ३६० डी फॅ ला प्रिहिट करा.
फ्राईज त्यात ओतून १५-२० मिनिटाला सेट करा. अधूनममधून हलवा.
फ्राईज बाहेर काढले की मीठ चोळा. केचपबरोबर खा.

(मला अतिशय आवडले! थोडा आकार नीट आला पाहिजे. व कडा ब्राउन व्हायला नकोत. पण ते सर्व कॉस्मेटिक चेंचेस. चव अतिशय भन्नाट !!)

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

एअरफ्रायर पाकृ : कुरकुरीत भेंडी

एअरफ्रायर ३६०डी फॅ.ला प्रिहीट करून झाल्यावर त्यात फ्रोझन भेंडी, हळद, तिखट, मीठ घातले. व एअरफ्रायर १०मिनिटाला सेट केला.
अधून मधून भेंड्या हलवल्या.
क्रिस्पि ओक्रा इज रेडी!!

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

Subscribe to एअरफ्रायर
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle