high school

अमेरीकेतील हायस्कूल प्रवास -५

अमेरीकेत कॉलेज प्रवेश प्रक्रिया १२वीच्या सुरुवातीलाच सुरु होते. त्याही आधी सुरु होतो तो योग्य कॉलेजचा शोध. शाळेत काउंसिलर ९वी पासून दरवर्षी मुलांशी बोलून, अ‍ॅप्टीट्युड टेस्ट्सचा वापर करुन मुलांना पुढे काय करायचे ते ठरवायला मदत करत असतात. त्याच्या जोडीला पार्ट टाइम्/समर जॉब, मित्र-मैत्रीणींचे, नातेवाईकांचे अनुभव, वेगवेगळ्या विषयांचे शिक्षक, जॉब शॅडोइंग सारखे उपक्रम या सगळ्याच गोष्टींचा कमी अधिक प्रभाव मुलांवर पडत असतो. पालकांनीही वेळोवेळी मुलांशी बोलून मुलांचा कल, त्यांचे साधारण करीयर प्लॅन्स काय आहेत ते समजून घ्यावे. हे प्लॅन्स दर वेळी बदलत असले तरी काळजी करु नये. It's part of growing up.

Keywords: 

अमेरीकेतील हायस्कूल प्रवास -१

ही लेखमाला मी लेकाचे हायस्कूल ग्रॅड्युएशन झाले तेव्हा दुसर्‍या संकेतस्थळावर लिहिली होती. इथे बर्‍याच मैत्रीणींची मुलं मिडलस्कूल सुरु करत आहेत त्यांना कदाचित याचा उपयोग होईल म्हणून पुन्हा इथे डकवतेय.

जून महिना उजाडला की इथे धामधूम सुरु होते हायस्कूल ग्रॅड्युएशनची. पालक, नातेवाईक, शिक्षक, कोच, मेंटर्स यांनी गजबजलेला परीसर. संडे-बेस्ट मधील मुलं-मुली, काही तर आपापल्या सैन्य शाखेच्या गणवेशातली. विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक हायस्कूल पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले जाते. चार वर्ष केलेल्या मेहनतीचे सार्थक होते. मुलं टोप्या उडवतात आणि एक महत्वाचे पर्व संपते.

Keywords: 

Subscribe to high school
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle