सुहाना मौसम है, पसीने छूट रहे हैं लेकिन तैरकर कलेजेको ठंडक पहुंचानेका सामान भी रेडी है.
नव्या कळ्या फुलू लागल्यात, वसंताचे आगमन मनाला सुखवून टाकते आहे. आतून एक निखळ आनंदाची खुमारी शरीर मनाला बहर आणते आहे. जीवन हे उपभोगण्यासाठी आहे. सर्व सुखे लुट ण्या साठी आपल्या पुढे हात जोडून उभी आहेत. मग हा नकार का बर. चला आपली सर्व इन्हिबिशन्स सोडा आणि जीवनसागरात डुबकी घ्या. सूर मारा, सर्फ करा .... क्युंकी
इस दुनिया मे जीना है तो सुनलो मेरी बात.
गम छोडके मनाओ रंगरेली. और मानलो जो कहे किटी केली.
तर काल काय झालं.... कामं होती म्हणून ठाण्यात दुपारी बाराच्या उन्हात भटकले. धड जेव्ण मिळेल असं एक ठिकाण दिसेना. मग परतताना टिप टॉप लक्षात आलं तिथे गेले. वेटिंग होतंच ते सहन करून मग जागा पटकवली. गार थंड पन्हे, ताक व इतर पदार्थांची गाडी सुरू झाली. आणि मग एक वाटीत मँगो फ्लेवरची अम्गुरी रसमलाई थंडगार व गोड आली आणि सीझनचा राजा आमरस तो ही आलाच छोट्या वाटीत दोन पळ्या!!
चैत्र महिना लागला, वसंत ऋतु येउ घातला आहे. मन व शरीर बधिर करणारा कृर गारठा संपून सर्वत्र नवे चैतन्य, नवे जीवन नवी हिरवळ उगवू पाहते आहे. सुकुमार बालिकेच्या जीवनातही प्रेमाचा उगम झाला आहे. कोणी तरी खास तरूण चेहरा मनासमोर तरळतो आहे. त्याच्याकडूनही उत्सुकतेची पावती मिळाली आहे. आता भेटायचे आहे त्या प्रियकराला, मनातील फुलासारख्या कोमल भावना त्याच्यासमोर व्यक्त करायच्या आहेत. त्याच्या स्पर्शाच्या कल्पनेने शरीर मोहरते आहे. आणि ही कोकिळा कुहु कुहू करते आहे.