१. दोन तीन बीट आणि सात आठ लसूण पाकळ्या वरून तेल लावून चुलीत निखाऱ्यावर किंवा गॅसवर भाजायच्या. (अव्हन पण चालेल) बीट आतून भाजले गेले पाहिजेत.
२. मग गार झालेले बीट आणि लसूण सोलून बिटाचे तुकडे करायचे.
३. कढईत एक मोठा चमचा तूप गरम करून त्यात जिरे, एक लवंग आणि एक बारीक चिरलेला कांदा परतायचा. त्यात बीट, लसूण, तमालपत्र, बारीकसा दालचिनीचा तुकडा, मीठ, मिरपूड आणि दोन कप पाणी घालून पाच मिनिटे उकळायचे. जरा गार झाल्यावर मिक्सरमधून काढायचे.
४. सूप रेडी! प्यायला घेताना जरासं लिंबू पीळ आणि वरून जराशी मिरपूड घाल.