सूप

कोलंबीचे सूप - प्रॉन्स क्लियर सूप

परवा अचानक लाराकडून प्रॉन्स सूपाची फर्माईश आली. प्रॉन्स सूप, क्लियर हवं, त्यात त्या हिरव्या चंद्रासारख्या दिसणार्‍या चकत्या हव्या, लाल रंगाचं हवं आणि आंबट तिखट हवं. अधिक चौकशीअंती त्या हिचंदिच म्हणजे कापलेली कांदेपात असा निष्कर्ष निघाला. मग बाजारातून काही गोष्टी आणल्या, आदल्या दिवशीच नीता कोळणीनं प्रॉन्स आणून दिल्या होत्याच. काल केलं बाई सूप आणि एकदम यँव बनलं.

घटक :

पाककृती प्रकार: 

लो कार्ब, हाय प्रोटिन हेल्दी किन्वा सूप

मी सध्या लो कार्ब खाण्यावर भर देत आहे. त्यातून घडलेला हा यशस्वी प्रयोग :)

साहित्य:

- १ वाटी किन्वा
- १ वाटी उकडलेला राजमा ( घरी उकडून किंवा रेडीमेड टिन)
- १ गाजर
- १ लाल सिमला मिरची
- १ झुकिनी
- २ फ्रेश टोमॅटो किंवा कॅन्ड टोमॅटो
- १-२ लसूण पाकळ्या
- १ मध्यम कांदा
- मुठभर पालक ( केल / चार्ड पण चालेल)
- चवी नुसार मीठ, पाप्रिका पावडर किंवा तिखट, मिरपूड, मिक्स हर्ब्स

कृती:

- किन्वा ३ -४ वेळेस स्वछ धूवुन घ्या
- पाणी गरम करायला ठेवून द्या, उकळी आली की त्यात किन्वा घालून ३-४ मिनीटं शिजवा ( त्याला शेपुट फुटायला लागेल)

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

द ग्रेट रस्टिक बीटरूट सूप

मी एक गावाला करतात ती रेसिपी देते.

१. दोन तीन बीट आणि सात आठ लसूण पाकळ्या वरून तेल लावून चुलीत निखाऱ्यावर किंवा गॅसवर भाजायच्या. (अव्हन पण चालेल) बीट आतून भाजले गेले पाहिजेत.

२. मग गार झालेले बीट आणि लसूण सोलून बिटाचे तुकडे करायचे.

३. कढईत एक मोठा चमचा तूप गरम करून त्यात जिरे, एक लवंग आणि एक बारीक चिरलेला कांदा परतायचा. त्यात बीट, लसूण, तमालपत्र, बारीकसा दालचिनीचा तुकडा, मीठ, मिरपूड आणि दोन कप पाणी घालून पाच मिनिटे उकळायचे. जरा गार झाल्यावर मिक्सरमधून काढायचे.

४. सूप रेडी! प्यायला घेताना जरासं लिंबू पीळ आणि वरून जराशी मिरपूड घाल.

पाककृती प्रकार: 

Subscribe to सूप
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle