काही काही पदार्थ पाहिले तरी ते करणारं माणूस आधी समोर येतं... तसा हा प्रसादाचा शिरा! लग्नाआधी पूजेसाठी करताना आमच्या घरी सोवळ्यात करायचा आणि तोही नऊवारी नेसून त्यामुळे मी त्या प्रांतात गेलेच नाही. लग्न झाल्यावर पूजेचा प्रसाद करणं हा एक सोहळा असतो हे मी सासुबाईंची तयारी पाहून अनुभवलं. त्याची तयारी त्या आदल्या दिवशीच करतात. सव्वा किलो रवा मोजून घ्यायचा, तो मंद आचेवर तांबूस भाजायचा. बेदाणे काड्या काढून ठेवायचे. काजूगर सोलून पाकळ्या करून ठेवायच्या. बदाम काप करून ठेवायचे.