हंपी कसं आहे? सुरेख, अचंबीत करणारं पण भग्न, उध्वस्त, बेचिराख, केवळ अवशेषांच्या रुपात शिल्लक राहीलेलं? Group of monuments, archeological ruins, burnt city? हो आहे. पण ते युद्धात प्राणपणाने लढून त्याच्या जखमा किंवा त्यात मिळालेले कायमचे अपंगत्व अभिमानाने मिरवणाऱ्या एखादा सैनिकासारखं ही आहे.. कुठलेही रंग, सोन्या चांदीचे पत्रे न पांघरलेलं तरीही श्रीमंत.. दागदागिने, भरजरी वस्त्रं त्यागून पांढरी वस्त्रे आणि फुलांच्या माळा ल्यायलेल्या कैलासाच्या पार्वतीसारखं आहे! त्याच्या सौंदर्याचं वर्णन करताना शब्द पुरत नाहीत, ते निव्वळ पहायला डोळे आणि साठवण्यासाठी स्मृती पुरत नाहीत.