माझ्यासाठी.. माझी कविता .हसू होऊनी खळखळते.. आसवातुनी आसुसते.. माझ्यासाठी माझी कविता अंतरातुनी गहिवरते.. कधी हरवता सूर-ताल-लय मनात दाटून येता आठव.. जोडून नाते प्राणसखीचे सार्यातूनच सावरते. .माझ्यासाठी माझी कविता नवांकुरासम पालवते.. मी रुप तर ती सावली मी बोलकी ती अबोली.. शब्दांच्या आडोशांमधुन अलगद साद तिची घुमते माझ्यासाठी माझी कविता कस्तुरीसम दरवळते..Keywords: माझ्यासाठी माझी कविता Read more about माझ्यासाठी.. माझी कविताLog in or register to post comments