armenia

आर्मेनिया - ४ लवाश आणि सुजुक

लवाश

अर्मेनियन पोळी / ब्रेड
रोजच्या जेवणासाठी लागणाऱ्या पोळी किंवा ब्रेड बाबत आपण भारतीय अतिशय नशिबवान आहोत असं मला आता वाटायला लागलं .
आपल्याकडे बहुतेक घरांमध्ये दोन वेळेला ताज्या पोळ्या केल्या जातात .
एवढंच पुरेसं नाही की काय म्हणून या पोळ्या करण्यासाठी आपल्याला अगदी माफक मोबदला देऊन मदतनीस उपलब्ध होऊ शकतात .

अर्मेनियन लवाश ( ब्रेड ) रुमाली रोटीसारखा दिसतो . तो अशा बेक-यांमध्ये बनवला जातो . बेकरी सरसकट सगळीकडे असेलच असं नाही . मग इतर सामानासोबत लवाश सुपरमार्केटमधून आणून. ठेवायचा तो दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्यापर्यंत पुरतो .

लवाश बनवना-या अर्मेनियन सुंद-या

Keywords: 

आर्मेनिया - ३ येरेवान - टेम्पल ऑफ गार्नी

आर्मेनिया हा देश जगातला पहिला असा देश आहे जिथे ख्रिस्ती धर्म सगळ्यात पहिल्यांदा एखाद्या देशाचा धर्म म्हणून स्वीकारला गेला. अनेक पुरातन ख्रिस्ती धर्मस्थळ आणि त्यांची रचना हे या देशाच अजून एक वेगळ आकर्षण. जगभरातून अनेक लोक केवळ ही जुनी मंदिर बघायला इथे येतात त्याचा धर्माशी फारसा संबध नसावा अस जाणवलं.

पूर्वेला टर्की, पश्चिमेला जॉर्जिया उत्तरेला इराण तर दक्षिणेला अझरबैजान असलेला हा छोटासा देश. पूर्वी USSR चा भाग होता अजूनही इथली कित्येक छोटीमोठी गावं शहरं आपल्याला रशियामध्ये असल्याच भासवतात.

Keywords: 

अर्मेनिया - २ राजधानी येरेवान

येरेवानच्या झावान्तोर एअरपोर्टवर पोचलो व्हिसा आदी प्रक्रिया होऊन बाहेर यायला साधारण पाऊण तास लागला. आम्ही आधीच कॅब सांगितलेली होती पण ती आम्ही पोचलो तरी अजून आली नव्हती त्यामुळे त्याला फोन करणे त्याची वाट बघणे आदी घोळात तिथे सीमकार्ड घ्यायच राहून गेल आणि लोकल सीम नसल्यामुळे पुढे अनेक अडचणींचा सामना करावा लागला ते पुढे त्या त्या वेळेला येईलच.

Keywords: 

आर्मेनिया - १ तयारी आणि प्रवास

जवळजवळ सात वर्षांनंतर आम्हा चौघांना एकत्र ट्रिपला जायची संधी मिळाली होती. जायच कुठे यावर कॉन्कॉल ( बेळ्गाव, पुणे, मुंबई आणि दुबई ) घेऊन खूप खलबतं, झाली निव्वळ टुरिस्ट डेस्टिनेशन असलेला देश बघायला जायच आम्हाला कोणालाच मान्य नव्हत त्यामुळे कुठे जायच हे ठरवण्यासाठी आमचा बराच रिसर्च झाला. इजिप्त, जॉर्जिया, अझरबैजान , मलेशिया असं करत करत शेवटी अर्मेनियावर शिक्कामोर्तब केलं गेलं. दोन्ही मुलं म्हणजे कौशल देविका आणि नवरा यांच जोरदार प्लॅनिंग चालल होत. ( मी जरा या सगळ्या प्लॅनिंगकडे तटस्थतेनी बघत होते. )

Keywords: 

Subscribe to armenia
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle