कविता चमत्कार वाट आठवण पाऊस

आनंदयात्री...

Miracles take place... If you have faith....

चालत जावं कधीतरी नुसतंच... दिसेल..
डोळ्यासमोर रस्ता कसा 'वाट' बनतो ते...

बसावं कधी निवांत.. जुन्या आठवणींसोबत... कळेल...
आठवणींनाही आपली आठवण येते कधी कधी...

द्यावी मोकळीक स्वतःला।... जखमा नव्याने अनुभवायची...
जाणवेल मग.. वेदना कशी स्वतःच मलम होते ...

दर वेळी कशाला स्वतःला सावरायच? दाटू द्यावा कंठ... वाहू द्यावे अश्रू...
उमगेल मग.. भरून आलेल्या आभाळाच बरसून मोकळं होणं...

द्यावी स्वतःचीच सोबत स्वतःला... आपलीच हरवलेली रूपं भेटतील नव्याने पुन्हा...

घेत तसं सततच असतो काही न काही... कधीतरी द्यावी भेट.. समाधानी असण्याची...

Keywords: 

कविता: 

Subscribe to कविता चमत्कार वाट आठवण पाऊस
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle