काल सखेग व्हॉट्सअप ग्रुपवर अवलने तयार केलेले अतिशय सुरेख रंगीत कानवले हा विषय चर्चेत होता. अर्थातच ते कसे करतात टीपा, टेपा, टप्पा आणि टीपी असं सगळं रीतसर झालं. त्यात वर्षाने (आपली मँगो रसमलई केक करणारी गोमू ) शक्कल लढवली की तोंडात विरघळणाऱ्या करंजीसाठी एवढा घाट घालायची काही गरज नाही, साधी करंजी खाऊन पाणी प्यावे. यावर व्हायचा तो संसद गदारोळ झालाच. मग तिला मैत्रीचा हात पुढे करत संघमित्राने 'तू कानवले कर. मी येईन खायला' असं आश्वासन दिलं. त्यात अवलने चाणाक्षपणे पुढील शंका रिडायरेकत करण्यासाठी एक युट्यूब व्हीडिओ ची लिंक दिली ज्यात अगदी छान प्रकारे हीच कृती समजवली आहे.