112 INDIA

112 INDIA APP : तातडीच्या मदतीसाठी फोन व अँप

हैद्राबादची घटना ताजी असताना, काल व्हाट्सअप्पवर एक विडिओ आला. 112 India अँपची माहिती त्यात होती. काल शोधाशोध करत असताना मुंबई पोलिसांचे प्रतिसाद नावाचे अँप दिसले होते पण तिथे रजिस्ट्रेशन होत नव्हते. इथे बघूया काय अनुभव येतोय म्हणत अँप लगेच डाउनलोड केले. नाव, जन्मतारीख, फोन नंबर मागितल्यावर फोनवर ओटीपी आला. अँपने नेहमीसारखी माझे कॉन्टॅक्ट वाचण्याची, लोकेशन पाहण्याची, फोन वापरण्याची परवानगी मागितली. सहसा अँपला ही माहिती देणे मी टाळते व अँप काढून टाकते. पण ह्या माहितीशिवाय इच्छित काम करणे अप्पला अशक्य असल्याने परवानगी दिली. पुढच्या स्क्रीनवर अँप माझे लोकेशन दाखवू लागले.

Keywords: 

Subscribe to 112 INDIA
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle