प्रत्येक गावात असा एक हलवाई असतो ज्याचे एखादे पक्वान्न फारच प्रसिद्ध असते जसे आमच्या नाशिक रोडला वास्को हॉटेलजवळचे घी स्टोअरमधले श्रीखंड, नाशिकला पांडेचे खव्याचे गुलाबजाम, मंगेश धन्नालाल अग्रवालची बर्फी, तसेच बासुंदी म्हटली की बुधा हलवायाचीच रबडी बासुंदी. घट्ट रबडी असलेली, चव निव्वळ अप्रतिम अशी अजूनही जिभेवर रेंगाळणारी.मला बासुंदीतली रबडी तशी फारशी आवडायची नाही मग माझी आई ती गाळून फक्त बासुंदी द्यायची.