वर्कशॉप

माझा पहीला अनुभव - पेपर क्विलींग वर्कशॉप

पिढ्यान पिढ्या रक्तातून धावणारे टिचिंगचे जीन्स आणि क्विलिंगने लावलेलं वेड. त्यात उन्हाळी सुट्टी म्हणजे मुलांसाठी मोकळा वेळ. माझ्या क्विलिंग उद्योगाचा पसारा लोकांपुढे यावा आणि अशा प्रकारची वर्कशॉप्स घेता येतात का याचाही ंदाज यावा म्हणून मी एका शनिवार रविवारी एक वर्कशॉप घेतलं. जाहीरात अर्थातच सुरवातीला अजाबात पैसा खर्चून पदर मोडून काही करायचं नाही म्हणून व्हॉटसॅप, इमेल इ. माध्यमातून केली. मेंबर्स तयार होणं, मग गळणं मग परत नवीन मेंबर मिळणं अस अगदी साग्रसंगीत होऊन माझं वर्कशॉप फक्त २ मुलं येऊन संपूर्ण झालं. २ च काय पण एक जरी मुल असतं तरी मी घेणार म्हणजे घेणारच यावर ठाम होते.

Keywords: 

कलाकृती: 

Subscribe to वर्कशॉप
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle