holiday

हॉलिडे स्पेशल मुव्हीज

थँक्सगिव्हिंग संपला आणि डिसेंबर आला की ख्रिसमस डेकोरेशन, व्हेकेशन, हॉलिडे प्लॅनिंग, काही नाही तर नुसतं सुस्त होऊन थंडीचा आस्वाद घेणे याबद्दल माझे डेड्रिमिंग सुरू होते. थंडी स्पेशल खाऊ तर आठवतोच(माझ्यासाठी क्रॉसाँ+देसी पॅटी) पण हॉलिडे स्पेशल मुव्हीज व पुस्तकंही आठवायला लागतात. हा धागा मुव्हीसाठी. मला वाटतं पुस्तकांचा पण काढावा! :)
तर- ख्रिसमस, थंडी म्हटलं की मला पुढील मुव्हीज आठवतातच! आणि मी ते दरवर्षी न चुकता पाहते. होम अलोन, जिंगल ऑल द वे, लव्ह अ‍ॅक्चुअली, ख्रिसमस विथ द क्रँक्स, लास्ट हॉलिडे आणि हल्ली हल्लीच मैत्रीणवर कळलेला पण या यादीत आलाय- द हॉलिडे.

Keywords: 

Subscribe to holiday
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle