दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी आम्ही सेरेंगिटीमध्येच 'इन टू द वाईल्ड' नावाच्या नेचर लॉजमध्ये राहणार होतो. इथे टेंट कॅम्पिंग म्हटलंय पण खरंतर हे ग्लॅम्पिंग होतं. दोन मोठ्या बेडरूम्स, सिटींग रूम, मागे मोठा डेक आणि आजूबाजूला जंगल, अंधार पडल्यावर टेंट मधून बाहेर पडायचं असेल तर वॉकी टॉकी वर कॉल करून कोणालातरी एस्कॉर्ट करायला बोलावून घ्यायचं. आम्ही संध्याकाळी जेवून आमच्या टेंटमध्ये जात असतानाच विचित्र गुरगुरीचे आवाज येत होते, आमच्या सोबत येणारा म्हणाला की हायना/तरस आहेत टेंटच्या आसपास, पण घाबरु नका ते टेन्ट जवळ येणार नाहीत.