आमच्या ऑफिसमध्ये HR तर्फे फिटनेस करता त्रैमासिक उपक्रम राबवले जातात. प्रत्येक फिटनेस चॅलेंजला काही पॉइंट्स आहेत, आणि तीन महिन्यात काही पॉइंट्स जमवले की अॅमेझॉनचं गिफ्ट कार्ड बक्षिस म्हणून मिळतं. :) कर्मचार्यांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता हा उपक्रम आहे. काही काही थोडे चॅलेंजिंग तर काही काही, अगदी सोपे प्रकार यात आहेत. उदाहरणार्थ ५-७-१०के स्टेप्स, दिवसभरात १०-१२ ग्लास पाणी पिणे (इथे सोडा आणि कॉफी पिणार्यांकरता हे फार अवघड चॅलेंज आहे), फाईड-फास्ट फूड सोडणे (घरुन डबा आणणे), अॅन्युअल डॉक्टर व्हिजिट, फ्लु शॉट घेणे वगैरे आणि अजुनही बरेच ...