परवाच पाली महागाव रस्त्यावर ही अग्निशिखा भेटत राहिली. घनदाट जंगल, सभोवताल हिरवागार निसर्ग,मोठाले वृक्ष आणि पसरलेल्या वेली, हिरवागार गवत चारा, देशी गाईंची खिल्लारे आणि अशा पाचुबेटांमधून मधेच डोकावणारी अग्निशिखा मन वेधून घेत होती.
अग्निशिखा, तामिळनाडूचे राज्यपुष्प ट्रॉपिकल हवामानात फुलणारी ही औषधी वनस्पती लिली म्हणून पण ओळखली जाते. मोठ्ठाली ठळक रेषांची पाने,हिरव्याचाफ्यासारखी आत मोदक करणारी पाकळ्यांची रचना,पराग कणांचा बाहेर पसरता फेर फार लोभस दिसतो.