August 2017

हरवलेला पाऊस

थेंब टपोरू लागतात
खिडकीच्या दुधाळ काचेवर..
ढगांच्या काजळमायेत
उगवते एक तेजस्वी शलाका.
दिसते एक डहाळी काडकन मोडताना
समोरच्या गुलमोहराची..
शेवटी येतेच घसरत जमिनीवर
तिच्या खुळखुुळणाऱ्या शेंगांसकट.
कानात जमा होतो तडतडणारा पाऊस
शेतावरल्या गोठ्याच्या पत्र्यावर..
हुंगता येते ताजी कोरी हवा
बिनचष्म्याच्या बदामी डोळ्यांनी.
गडद करकरीत ढगांचा लागत नाही ठाव
आणि समोर उभे रहाते एक हरवलेले गाव..

Keywords: 

कविता: 

शोध / ओळख

हातापायाला मुंग्या आल्या.. दरदरुन घाम फुटला. मला ’त्याला’ शोधायलाच हवं. सकाळी घरातून निघाले तेव्हा सगळं ठिक होतं. दुपारी लंच मधे? नाही तेव्हाही सगळं आलबेलच होतं. बहुतेक संध्याकाळी बसमधे चढताना...येस तिथेच काही झालं असावं. आता कसं शोधायचं? हृदयाचे ठोके वाढले आणि मी कंट्रोल हातात घ्यायच्या आत, भितीने कंट्रोल तिच्या हातात घेतला. काळोखी पसरली आणि माझी शुद्ध हरपली.

कोणीतरी तोंडावर पाणी मारलं... "चॉकलेट आहे का कुणाकडे?" असा प्रश्न आजुबाजुला फ़िरला. कुठून तरी चॉकलेट आलं. कुठूनतरी पाण्याची बाटली आली.

लेख: 

प्रवास जोवर संपत नाही

कुठून आलो?, ठावूक नाही
कुठे जायचे ?, ठरले नाही
अनेक वाटा, अनेक वळणे
भुलभुलैय्या संपत नाही

करू पेरणी!, करू नांगरणी
कष्ट कुणाला टळले नाही
पण कष्टाला फळ लागावे
माती इतुकी सुपीक नाही

कशास करतो? धडपड सगळी
नश्वर क्षण हा नश्वर नाती
उधळून द्यावे क्षणात सारे
असे कुणी उरलेले नाही

तरी उगवते सकाळ नियमित
नदी वाहते, थांबत नाही
तसेच म्हणते चालावे मी
प्रवास जोवर संपत नाही

शंभर खिडक्या

ह्या गोल गोल ग्रीलच्या खिडकीतून ती आणि तो दिसतायत...
ती सोफ्यावर लोळत मोबाईलवर काहीतरी मिम्स बघत पडलेली... तो खालच्या कार्पेटवर झोपून इनटू दि वाइल्ड ओएसटी ऐकत सिलिंगकडे एकटक बघत असलेला...
मध्येच ती मोबाईल बाजूला ठेवून,

"ऐक... मला माहित्ये एक दिवस तू ठरवशील... तू जेव्हा ठरवशील तेव्हा सगळ्यात आधी येऊन मला सांगशील? तू असं ठरवतो आहेस म्हणजे कदाचित त्यावेळी आपण एकमेकांशी बोलतही नसू, मी कुचकट बनले असू शकेन, भांडखोर आणि शिष्टसुद्धा बहुतेक ... पण तरीही मला फक्त इतकं वचन हवं आहे कि तू आधी मला येऊन सांगशील. मी अडवेन किंवा नाहीही... मी मदत करेन किंवा नाही कदाचित पण आय जस्ट वांट टू नो, ओके?"

ImageUpload: 

विजयी विश्व तिरंगा प्यारा (२०१७) - डूडल मॅप

बरेच दिवस झाले पेन घेऊन डूडल करणे, गिरगिटने सुरु आहे..
भरपूर काही नवं बनवलयं पण दाखवायला म्हणजे धागा काढून इथे पोस्टायला वेळ मिळेना..
हा उपक्रम डिक्लेअर झाल्यावर एक डूडल तो बनता ही है म्हणुन नक्की केलं ते तुमच्या समोर ठेवते आहे..
म्हणायला खरतर काही नवं किंवा भारी असं नाही तयार केलय बस ठिपके आहेत आपले..

७१व्या स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने माझं हे काम मी तमाम स्वातंत्र्यसैनिकांना ज्यांनी भारत या कल्पनेला मुर्त स्वरुप दिलं आणि जवानांना जे त्या कल्पनेला जागृत ठेउन तिची रक्षा करत आहे त्यांना समर्पित करते.
जय हिंद.. जय हिंद कि सेना..

तळटिपः

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

आपलाची संवादु आपणासि ... सारं काही आलबेल

(खरं तर ही गोष्ट लिहायची. पण ते काही "मेरे बस की बात" नाही. कविन, मेघना दोघींनी छान टिप्स दिल्या खरं तर. पण कसय ना, जातीची कलाकार असल्याने एकदा लिहिलेल्यावर त्यावर संस्कार वगैरे जमत नाय आपल्याला :ड  106 खरं तर, आळशीपणा दुसरं काय? {) तरी थांबले बरं 10-15 दिवस. पण कायच सुचेना. मग म्हटलं जाऊ देत. लेख म्हणूनच खरडलेलं टाकूत. वाचतीलच काही मैत्रिणी Heehee साहित्याचे नियम बियम न लावता वाचा बाई :ड
तर ही घडलेली घटना. नावं अर्थातच बदललीत. मे बी काही उपयोगी पडेल, मेबी यावरून काही चर्चा रंगेल. प्रास्ताविक मजेचे झाले पण खालचा मजकूर मात्र मजेचा नाही)
---

१.

लेख: 

नारळीभात

साहित्य:
एक पूर्ण खोवलेला नारळ
दोन वाट्या तांदूळ, शक्यतो बासमती तुकडा किंवा सुरती कोलम
किसलेला गूळ दोन वाट्या ( फार गोड हवा असेल तर प्रमाण वाढवा)
लवंगा 2-4
जायफळ किसून अर्धा चमचा
सात आठ भिजवून सोलून तुकडे केलेले बदाम

कृती:

तांदुळ धुवून निथळत ठेवायचे.

नारळ खवणून मिक्सरमधून एक वाटी पाणी घालून वाटून घ्यायचा. मग त्यातलं दूध पिळून काढायचं. हे जाड दूध. मग पुन्हा चोथ्यात एक वाटी पाणी घालून पुन्हा वाटून घ्यायचं. मग पिळून दुध काढायचं अन चोथा बाजुला ठेवायचा. हा चोथा भातासाठी वापरणार नाही आहोत. त्याचा उपयोग शेवटी सांगते. तर हे दुसरं दूध पांतळ दूध. दोन्ही दुधं स्वतंत्र ठेवा.

Taxonomy upgrade extras: 

मृद्गंधी कुपी

हा असा पाऊस कोसळत असताना नीट ऐकावं. असं वाटतं खूप काही सांगायचंय त्याला. जेव्हा आपल्यालाही लिहीण्यासाठी आतून धडका मिळत असतात आणि मग विचार आणि हात यांची स्पर्धा लागल्यावर त्यांना सांधणार्‍या आपली जी गत होते ना, तीच त्रेधा मला या संततधार कोसळणार्‍या पावसात दिसते. गेले दहा बारा तास नुसता कोसळतोय. किती साचलं असेल मनात? आणि मग हे बांध फुटले अनावर होऊन.

Keywords: 

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle