नावात काय ठेवलंय असं शेक्सपियर साहेब बोलुन गेलेत. पण नाव हवंच नाही का प्रत्येक सजीव, निर्जीव गोष्टीला? त्याशिवाय ओळखणार कसं हो? आणि कसं आहे ना, नावागणिक त्या त्या पदार्थ/व्यक्ती/वस्तूची एक खास अशी ओळख असते. आता पुरणपोळी हे नाव उच्चारलं की ती न खाताही जीभेवर तिची चव रेंगाळतेच की नाही? तर असं हे 'नाममाहात्म्य'. पण काही अभागी जीवांच्या वाटेला हे नावदेखील येत नाही हो..
काही विशेष नाही.
कांदा टोमॅटो काकडी बटाटा ह्याच्या चकत्या टाकून केलेले सँडविच.
(बटाटा पातळ स्लायसेस करून पाण्यात टाकून मायक्रोवेव्ह केले १ मिनिट.)
ब्रेडच्या एका साईडला हिरवी चटणी, दुसर्या साईडला मेयॉनिज.
हिरवी चटणी रेसिपी :
भरपूर कोथिंबीर,
एक मिरची,
लसूण २ पाकळ्या,
खोबर्याचा तुकडा,
जिरेपूड,
मीठ, साखर,
थोडंसं दही..
हे सगळं वाटून घ्यायचं.
कांटोकाब सँडविचचा कंटाळा आला (की/तर) ही चटणी नुसती ब्रेडला लावून मार्झ-ओ-रिन स्टाईल चटणी सँडविचेस भन्नाट लागतात!
नुसता फोटो काय टाकायचा म्हणून इतक्या बेसिक पदार्थाची कृती लिहीली आहे, ती गोड(तिखट) मानून घ्या.
मी 2004 मध्ये फाईन आर्ट्स चा फाउंडेशन कोर्स केला. वर्षभर असाईनमेंट्स घोटून घोटून हातावर सॉलिड हुकूमत आलेली. अगदी कशाचंही स्केच मी यु काढत असे. 2005 ला इंटिरियर ला ऍडमिशन घेतली आणि स्केचिंग जरा कमी झालं. मग जॉब , मग लग्न , मग मूल यात 12 -13 वर्ष कशी निघून गेली ते कळलं ही नाही . रेहा चा जन्म झाल्यावर मी नोकरी सोडली. असं वाटलं खूप पैसे कमावले आता थोडं थांबुया !
गणपतीपुळे येथे फिरायला जायचा प्लॅन आहे. Mtdc रेसॉर्ट कसे आहे रहायला? तसचं आजूबाजूची अजून पहाण्यासारखी ठिकाणे कोणती आहेत? आणि जेवणाची उत्तम सोय कुठे होऊ शकते? लहान मुले बरोबर असणार आहेत.
मैत्रीणींनो, तुमचे अनुभव आणि माहिती शेअर कराल का?
तिळी चतुर्थीचा दिवस. आम्ही अशोकनगरवासी ( म.प्र. ) महाराष्ट्रीयन मंडळी जवळील 'शाढोरा'
गावातील गणपती मंदिरात बाप्पाच्या दर्शनास अगत्याने जायचो.ज्यास ज्या बसने, ट्रेनने किंवा स्वत:च्या
वाहनाने जसे जमेल तसे. क्धीत्यास छोट्या सहलीचे रूप यायचे. मंदिर पेशवेकालीन आहे. जवळ मंदिराची
शेतजमीन ,आमराई पण आहे.
त्यावर्षी मुलांच्या शाळेत परीक्षा व ह्यांना सुती घेता येणार नव्हती.मुलं व त्यांचे वडील घराबाहेर पडल्यावर
आपण 'श्री गजानन विजय 'या ग्रंथाचे पारायण करावे असे मी मनातच ठरविले.त्याप्रमाणे तयारीस लागले.