कॉलेज काळात आणि नंतरही आमचं पडीक असण्याचे ठिकाण म्हणजे चांदणी चौकातील कॅफे कॉफी डे. लग्नानंतर तिकडे जाणं आपोआप थांबलंच. तिथला एक आठवण येणारा आवडीचा पदार्थ म्हणजे कॉर्न स्पिनच सँडविच. इतक्या वर्षांनी अचानक मूड झाला म्हणून करून टाकलं. निळूनेही मिटक्या मारत खाल्लं. (हो, त्याला आता शेवटच्या दाढा सोडून सगळे दात आणि चवी आल्यात ). अगदी सोपी कृती आहे. यासाठी मी पालकाची भाजी चिरताना कपभर चिरलेला पालक फ्रीजमध्ये टाकला होता.
काही विशेष नाही.
कांदा टोमॅटो काकडी बटाटा ह्याच्या चकत्या टाकून केलेले सँडविच.
(बटाटा पातळ स्लायसेस करून पाण्यात टाकून मायक्रोवेव्ह केले १ मिनिट.)
ब्रेडच्या एका साईडला हिरवी चटणी, दुसर्या साईडला मेयॉनिज.
हिरवी चटणी रेसिपी :
भरपूर कोथिंबीर,
एक मिरची,
लसूण २ पाकळ्या,
खोबर्याचा तुकडा,
जिरेपूड,
मीठ, साखर,
थोडंसं दही..
हे सगळं वाटून घ्यायचं.
कांटोकाब सँडविचचा कंटाळा आला (की/तर) ही चटणी नुसती ब्रेडला लावून मार्झ-ओ-रिन स्टाईल चटणी सँडविचेस भन्नाट लागतात!
नुसता फोटो काय टाकायचा म्हणून इतक्या बेसिक पदार्थाची कृती लिहीली आहे, ती गोड(तिखट) मानून घ्या.