गोल्डन स्टेट पार्कमध्येच मी जेथे शेल्टर बुक केले होते त्या भागाचे नाव आहे 'Forgotten Valley'. नाव कसे पडले ठाऊक नाही पण त्या परिसरात आजुबाजुच्या ट्रेल्स केल्यावर मी जे अवशेष पाहिले त्यावरुन वाटते की पुर्वी म्हणजे साधारण १०० वर्षांपुर्वी येथे कुणीतरी वास्तव्यास होते. त्यांनी एक Homestead बांधलेले आहे तळ्याकाठी. मी जवळ जाऊन पाहिले तेव्हा जरा पडझड झालेले दिसले. तरीही सुंदरच दिसते. तळ्याकाठी असे १०० वर्षांपुर्वी राहण्यास त्या लोकांना किती मजा आली असेल! तेव्हा प्राणीही जास्तच असतील.
सध्या मैत्रीणवर वसंत ऋतु फुललाय! त्यात माझीही भर.. ही बागेत सध्या फुललेली फुलं.. वेल, मोस्टली गुलाबच आहेत. बाकीची झडं कॅचप करतायत अजुन, पण गुलाब म्हणजे काय सांगू? बागेचा गुलकंद झालाय अगदी!