आंबा रसगुल्ले:
आंबा पुराण वाचलंत ना मंडळी त्यात केलेले पदार्थ पाहिलेत का? ते सगळे पदार्थ मी स्वतः केलेले आहेत. आता आंबा सिझन चालू झालाच आहे तर एकेक पदार्थ चालू होतील. आंबा रसगुल्ले
आज त्यातलाच एक सोपा पदार्थ करून दाखवलाय आंबा रसगुल्ले.
आंबा रसगुल्ले अतिशय छान लागतात. ह्याची तुम्ही रसमलई करू शकता, व्हॅनिला आईस्क्रीम सोबत सर्व्ह करू शकता. एकदा नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
भटकेपणा पक्का मुरलेला आहे माझ्यात. अन वर्ष सहा महिन्यातल एखादं भटकण काही मनाला पुरेस वाटेना. आणि अचानक धनलाभ म्हणतात तसा अचानक सायकल लाभ झाला मला. एका मैत्रीणीची, तिला उंच वाटणारी सायकल उर्फ रेड रायडींग बडी उर्फ रामप्यारी माझ्या घरी आली. It is said Car is too fast and walking is too slow , so cycling is the best way to see the world! रामप्यारी बरोबर ते अगदी पटायला लागल! पुणं चाकाक्रांत करता करता सिमोल्लंघनाचे वेध लागले. २०२१ च्या दसर्याच्या दिवशी कारला सायकल लटकवून मी अन रामप्यारी नाशकात पोचलो.एका ग्रुप बरोबर नाशकाच्या आजूबाजुचे रस्ते फिरले, विनयार्ड्स पाहिली , वाईन टेस्टिंग केल.
असं धाडकन कुणी मृत्यू बद्दल लिहीत नसतं. पण तो तसाच येतो, अंगावर, न सांगता. कोणी कितीही सांगितलं की अंतिम सत्य आहे, असंच होणार, त्याचं येणं धक्काच असत. अचानक आला तरी, वाट पाहून आला तरी. जवळच कोणी असो किंवा अनोळखी. धक्का आणि हळहळ असतेच.
गेली २ वर्षे घरात बसून काढली. त्यामुळे तिसरी लाट ओसरायला लागल्यावर सहलीला जाण्याचे वेध लागले. मला कधीपासून काझीरंगाला जायचं होतं. १ मे ला ते बंद होतं त्यामुळे एप्रिलमधे जायचं ठरवलं. आसाम बरोबर मेघालय करण्याचं ठरवलं. अजून एक मित्र-मैत्रीण कुटुंब पण बरोबर होते.
मग सुरू झाली सहलीची तयारी. सुट्ट्या टाकून दिल्या आणि मग सुरू झालं प्लॅनिंग. कुठे किती दिवस घालवायचे, काय काय बघायचं ह्यासाठी गूगल हाताशी होतचं. इ त के ब्लॉग्ज, व्लॉग्स बघितले की न जाताही सगळ्या ठिकाणांची खडानखडा माहीती गोळा झाली. ४-५ वीकांत चर्चा करून प्लॅन ठरला. मग हॉटेल, विमान, टॅक्सी बुकिंग्ज पार पाडली.
भारताच्या पूर्वेला असल्याने ४:३०-५ पासून उजाडायला सुरूवात होत होती त्यामुळे रोज ५ लाच उठून बसायचो. ६:३० ला जीप येणार होती.
काझीरंगामधे ४ रेंजेस आहेत - सेंट्रल, इस्टर्न, वेस्टर्न आणि बुर्हापहार
आम्हाला आधी २ हत्ती आणि १ जीप सफारी हव्या होत्या - त्या नाही मिळाल्या हे बरं झालं हे नंतर कळलं. आम्ही सेंट्रल आणि ईस्टर्न जीपने केल्या आणि वेस्टर्न हत्तीवरून.
सेंट्रल रेंज - गेंडे, जंगली म्हशी (wild buffalo), हरिणं, हत्ती दिसले. indian roller हा अतिशय सुंदर पक्षी ५-६ वेळा उडताना दिसला. आम्हा ७ जणांत २ दुर्बिणी होत्या. त्यामुळे छान बघता आले प्राणी-पक्षी.
आजचा दिवस तसा आरामाचा होता. सकाळी उठून आवरलं आणि घरीच सँडविचेस खाऊन पॅक करून घेतले.
पहिले laitlum canyon ह्या ठिकाणी गेलो जे शिलाँगपासून २० किमीवर आहे. पाचगणी सारखं पठार आणि दरी. इतकं धुकं होतं की आम्हाला दरी अज्जिबात दिसली नाही. छान गार वारा आणि आजूबाजूला हिरवळ, धुकं.
शिलाँगचं एअर बीनबी सोडून आज चेरापुंजीला रहायला जाणार होतो. आवराआवरी आणि ऑम्लेट-ब्रेड नाश्ता करून निघालो.
पहिला थांबा होता mawphlang sacred forest. हे ठिकाण शिलाँगपासून तासाच्या अंतरावर आहे. खासी जमातीची देवराई म्हणता येईल. एक पठार आणि त्याला लागून जंगलाचा भाग आहे. जंगलाच्या बाहेरच ३ मोनोलिथ्स आहेत.