कोकणात आंब्याच्या मोसमात आमच्याकडे कोयाडे खूपदा केले जाते, पण त्याचा हा गोवन चुलतभाऊ एकदा करून बघायचा होता. 'घोट ' म्हणजे रायवळचे लहान गोलसर आंबे. पिकल्यावर आंबटगोड चव लागणारे आणि बाठीला भरपूर रेषा असणारे कुठलेही लहान गावठी आंबे चालतील. हापूस चुकूनही नको. (तोतापुरी तर नकोच नको, त्याला मी आंबाच म्हणत नाही. आंब्याच्या बाबतीत आहे बाबा मी रेसिस्ट!!)
सध्या घरी मला आवडतात म्हणून आलेली एकच पायरीची पेटी सगळ्या हापूसमधून टुकटुक करत होती. मग त्यातलेच तीन आंबे घेतले. खाणारी दोनच माणसं म्हणून!
आंबा रसगुल्ले:
आंबा पुराण वाचलंत ना मंडळी त्यात केलेले पदार्थ पाहिलेत का? ते सगळे पदार्थ मी स्वतः केलेले आहेत. आता आंबा सिझन चालू झालाच आहे तर एकेक पदार्थ चालू होतील. आंबा रसगुल्ले
आज त्यातलाच एक सोपा पदार्थ करून दाखवलाय आंबा रसगुल्ले.
आंबा रसगुल्ले अतिशय छान लागतात. ह्याची तुम्ही रसमलई करू शकता, व्हॅनिला आईस्क्रीम सोबत सर्व्ह करू शकता. एकदा नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.