चेबुराश्का चेबुराश्काची आणि माझी पहिली भेट झाली ती रशियन क्लासमधे. अगदी पहिल्याच दिवशी. 'मला ना नाव-गाव, माझ्याकडे तर कुणी वळूनही बघत नाही' असं गोड-गोंडस बिच्चार्या आवाजात गाणारा... चेबुराश्का... डोळ्यात भोळा आशावाद लुकलुकवणारा... चेबुराश्का... दिशाहीन उत्साहात फिरणारा ...चेबुराश्का... असहाय्य खटपट करणारा ...चेबुराश्का... त्याच्या गंभीरतेतही कमालीचा गोंडसपणा भरलेला... चेबुराश्का सोव्हिएत युनियन ऐन बहरात असताना जन्मलेला आणि त्यामुळेच की काय निराशेत आशावाद घेउन फिरणारा.. चेबुराश्का... आणि बघताच क्षणी प्रेमात पाडणारा... चेबुराश्का...लेख: लेख Read more about चेबुराश्काLog in or register to post comments