चांदणचुरा - ( लेखमालिका २)

(चांदणचुरा - लेखमालिका १)

हे असं चालणार नाही' आदित्य मनोमन ठरवत होता. उर्वी इथे अचानक येऊन थडकली हे त्याला अजिबात पटले नव्हते. ती दिसल्यावर तिला घरातच घ्यायचे नव्हते पण ती इतकी थकलेली, गारठलेली होती की शेवटी तिला उचलूनच न्यावे लागले. त्याच्यासमोर दुसरा ऑप्शनच नव्हता. ठीक आहे, घरात आली तर आली पण तो तिला कणभरही माहिती मिळू देणार नव्हता. ना तिच्याशी कामाशिवाय काही बोलणार होता. फक्त हो, नाही मध्ये उत्तरे द्यायची आणि वादळ जरा थांबले की लगेच तिला पिटाळून लावायचे हाच त्याचा प्लॅन होता.

आणि तरीही गेल्या २४ तासात तिला स्वतःबद्दल नको तितकी माहिती दिली गेली होती. त्याचे सगळे खाजगी आयुष्य, त्याचे नताशाबरोबरचे नाते, जे खूपच कमी लोकांना माहीत होते ह्या सगळ्या गोष्टी तिच्यासमोर उघड झाल्या होत्या. वर हे कमी की काय म्हणून आता त्याला तिच्या उद्यापासून तिथे नसण्याची हुरहूर लागली होती. तिचे केस, डोळे, ओठ, चेहरा राहूनराहून त्याला आठवत होता. संध्याकाळी तिला घट्ट मिठीत घेण्याची एवढी तीव्र इच्छा झाली होती की तो शेवटी सीडरला घेऊन घराबाहेर पडला.

काही किलोमीटर पळून मनातले सगळे विचार खोडून तो घरी पोचतो तोच ती त्याला खुर्चीवर उभी दिसली आणि थेट त्याच्या हातातच पडली. त्याने तिला पकडल्यावर तिने तिच्या त्या सोनेरी मधाळ डोळ्यांनी त्याच्याकडे असे पाहिले की त्याने स्वतःभोवती उभी केलेली मजबूत भिंत कधीच कोसळून गेली. पण पुढे न जाता त्याने पाऊल मागे घेतले कारण त्याला तिसऱ्यांदा पुन्हा तुटून पडायचे नव्हते. हृदयावर आधीच झालेल्या जखमा इतक्या खोल होत्या की आता एखाद्या ओरखड्यानेसुद्धा त्याचे तुकडे झाले असते. त्याने मन घट्ट केले पण तरीही त्याच्या हृदयात कुठेतरी खोलवर मऊ मऊ वाटत होते आणि आतून येणारी उबदार जाणीव काही कमी होत नव्हती.

मन ताळ्यावर ठेवायला म्हणून त्याने फुलीगोळा खेळून पाहिला, स्वयंपाक करून पाहिला, वाईनही उघडली. पण त्याला जेवणापूर्वी ती जेवढी सुंदर दिसत होती, त्याहून आता खळखळून हसताना ती अक्षरशः चमकत होती. इतकी जीवघेणी गोड दिसत असताना तो तिच्यावरुन डोळे अजिबात हटवू शकत नव्हता.

तो हातातल्या पिनो न्वा ला दोष देऊ शकत होता, पण तिच्या त्याच्याकडे बघून साध्या हसण्याची नशा त्याहून जास्त होती. काय घडतंय कळण्याचा आत त्याचा स्वतःवरचा कंट्रोल हळूहळू सुटत चालला होता. दिस इज बॅड! रिअली बॅड.

chandaNchura.jpeg

लेख: 

चांदणचुरा - ३२

तो खूप वेळ तिच्याकडे टक लावून बघत राहिला. त्याचे खांदे झुकले होते, चेहरासुद्धा उतरला होता. शेवटी एक लांब श्वास टाकून त्याने तोंड उघडले. "सॉरी उर्वी. आय डोन्ट लव्ह यू."

"आता कोण खोटं बोलतंय?" अर्धवट हुंदका देत ती बारीक आवाजात म्हणाली. तिच्या पायाखालची जमीन निसटून जातेय असा भास होत होता. जणू काही ती एखाद्या महापुरात सापडून कशीबशी तरून रहातेय.

"तुला काय समजायचं असेल ते समज."

त्याच्या शब्दांनी तिला अक्षरशः कुणीतरी एखाद्या दरीत ढकलून दिल्यासारखा झटका बसला. आपसूक दोन पावलं मागे जात ती ओट्याला धडकून थांबली. तिच्या पायातलं त्राणच नाहीसं झालं होतं. ती कशीबशी मागे ओट्याची कडा धरून उभं राहायचा प्रयत्न करत होती.

तो तिच्याकडे न बघता बाहेर दारापाशी निघून गेला. दारात जरा अडखळत थांबला.

"तुझं गिफ्ट घेऊन जा बरोबर" उर्वी आतून ओरडली.

"राहू दे इथेच" म्हणत पटकन लॅच उघडून तो बाहेर पडला, जसा काही त्याला त्या गिफ्टमुळे काही फरक पडत नव्हता. तिच्यामुळे काही फरक पडत नव्हता.

____

तो गेल्यापासून दिवसभर, रात्रभर ती अंगातली सगळी शक्ती निघून गेल्यासारखी सोफ्यावर पडून राहिली. संध्याकाळ झाल्यावर उठून दिवे लावायचेही कष्ट न घेता तशीच अंधारात बसून राहिली. दिवसभर रडून रडून शेवटी तिच्या डोळ्यातले पाणीही आटून गेले होते. तिने ती दिल्लीला रहायला जाताना आजीने हातशिलाई घालून दिलेली जीर्ण गोधडी अंगावर पांघरली होती. आता आजी नसली तरी आजीच्या मायेची थोडीशी का होईना उब तिच्या गारठलेल्या मनाला स्पर्श करत होती. दिवसभर आदित्यचा राग राग करून, त्याच्या वागण्याचा विचार करून ती पुन्हा त्याच निर्णयावर येत होती की त्याच्या बोलण्यात जराही तथ्य नव्हते. तो नक्की खोटं बोलत होता.

सहा वाजता गोधडी बाजूला करून ती उठली. आंघोळ करून, आवरून तशीच बिनझोपेच्या, तरवटलेल्या डोळ्यांनी ती ऑफिसला निघाली. भरपूर कन्सिलर लावूनसुद्धा तिच्या डोळ्याखालची काळी वर्तुळे लपत नव्हती.

ती ऑफिसला पोचली तेव्हा जनरली तिच्यानंतर उगवणारी अना आधीच येऊन बसली होती. काल अनाचे भरपूर कॉल्स, मेसेजेस येऊन गेले पण तिने बघितले नव्हते. तिला कोणाशी बोलायचीच इच्छा नव्हती.

तिला क्यूबिकलमध्ये बसलेली बघताच अना आत घुसली. "तुम कॉल्स क्यू आन्सर नही कर रही थी? मै कितना डर गयी थी, पता है! हमारे जाने के बाद क्या हुआ? बोलो.."

उर्वी समोर शून्यात बघत राहिली.

"आय एम सॉरी यार, आदित्य ने वो सब नही सूनना चाहीए था.." ती बारीक आवाजात म्हणाली.

अजून एक शब्दही बोलली तर तीला रडायला येईल हे समजून उर्वीने फक्त मान हलवली.

"उर्वी, मुझे बताओ प्लीज.. आय नो मैने बहुत रायता फैलाया है. आय एम रिअली सॉरी."

"तुम सही थी." गळ्यात येणारा जड गोळा गिळून टाकत ती म्हणाली.

"सही थी मतलब?" अनाने घाबरून विचारले.

"मतलब जैसा तुमने प्रेडिक्ट किया था वोही हुआ. वी आर ओव्हर! ही ब्रोक अप विथ मी." ती जास्तीत जास्त नॉर्मल दिसायचा प्रयत्न करत कम्प्युटर ऑन करायला खाली वाकली.

अनाचा चेहरा एकदम पडला. "यू आर किडींग, राईट?"

"हाऊ आय विश!" उर्वी तिच्याकडे न बघता म्हणाली.

अनाच्या डोळ्यात पाणी आलं होतं."सब मेरी वजहसे हुआ है. आय एम सो सॉरी यार.. आदित्य अभी कहां है? मै बात करू क्या?" ती बारीक आवाजात म्हणाली.

"कोई फायदा नही. उसनेही मुझे सेम वोही बाते कही जो तुमने कही थी. ये वर्कआऊट नही होता, ही वॉज प्लेइंग मी.. ब्ला ब्ला.."

"उसने कहां और तुमने मान लिया! हद है. सुनो, मै गलत थी. आय थिंक वो पागल है तुम्हारे लिए.. मै उसके साईडसे पास हुई तब वो तुम्हे जैसे देख रहा था वैसे कोई मुझे देखे तो मै भागकर शादी कर लूं! ऐसा कोई मिल जाए तो मै चॉकलेट खाना भी छोड सकती हूँ!" तिने उर्वीच्या हातात एक भली मोठी डेअरी मिल्क सिल्क दिली आणि "आय एम ट्रूली सॉरी" म्हणत तिला मिठी मारली.

"तुम्हारी कोई गलती नही है." म्हणत हसून उर्वीने डोळे पुसले.

हे खरं ठरावं असं उर्वीला मनापासून वाटत होतं पण खरं असेलही तरी त्याचा काही उपयोग नव्हता. तो तिला नाकारून निघून गेला होता. तरीही ती आशेचा एका धाग्याला धरून लटकत होती आणि तो धागाही तुटायच्या बेतात होता.

"तुम्हारे जाने के तुरंत बाद वो चला गया. जबसे वो गया है, उसने मुझे कोई कॉन्टॅक्ट नही किया. और मुझे लगता है अब कभी करेगा भी नही."

"फाईन!" अना तोंड वाकडं करत म्हणाली. "फिर तो तुमभी वह आर्टिकल लिख दो!" ती ताठ बसत म्हणाली. "तुम लिखोगी ना? डोन्ट बी अ फूल. तुमने मेहनत की है उस आर्टिकल के लिए."

सगळे पुन्हा पुन्हा त्या फालतू आर्टिकलवर का येत आहेत! तिला तो विचारच करायचा नव्हता. आदित्यला नक्कीच वाटत असेल, तो गेला की ती लेख प्रसिद्ध करणार म्हणून. "आर्टिकल की बात मत करो."

"अब क्या प्रॉब्लेम है? हद करती हो उर्वी!" अनाला तिचं म्हणणं समजतच नव्हतं.

"नो, आय डोन्ट वॉन्ट टू." म्हणत तिने माउस धरून लेटेस्ट इमेल वर क्लिक केले.

"पगला गयी हो क्या? अरे कोई डॉक्टर बुलाओ, उर्वी पागल हो रही है!" अना उठून हातवारे करत मोठ्याने म्हणाली. आजूबाजूच्या दोन तीन क्यूबिकलमधून हसायचे आवाज आले.

तिने अनाचा हात ओढून तिला खाली बसवले.
"तुम समझ नही रही, उसे एक्झॅक्ट्ली यही चाहीए की मै आर्टिकल पब्लिश करू."

"तो प्रॉब्लेम कहाँ है, उसे जो चाहीए कर दो. विन विन सिच्युएशन है. यही गोल्डन चान्स है, तुम डिमेलो के सामने तुम्हारी केपेबलिटी प्रूव्ह कर सकती हो."

"नही कर सकती."

"क्यू?"

"बीकॉझ आदित्य लव्ह्ज मी." दिवसरात्र वेगवेगळ्या शक्यता तपासून शेवटी हीच एक शक्यता तिला बरोबर वाटत होती. त्याने कितीही नकारघंटा वाजवली तरी तो खोटे बोलत आहे याची तिला खात्री होती. तिने त्याच्या प्रत्येक वाक्याचा भरपूर विचार केला तरीही तिचं मन तिला त्याचंही तेवढंच प्रेम आहे हेच सांगत होतं. तसं नसतं तर तिला त्याच्याबद्दल ज्या भावना होत्या त्या इतक्या तीव्र झाल्या नसत्या. त्याच्या वागण्यातून, तिची काळजी घेण्यातून तिला त्याचं प्रेम जाणवलंच होतं.

"किधर है वो? मुझे बात करने दो उससे." अना मान हलवत म्हणाली.

"वो चला गया."

"वापिस हिमाचल?"

उर्वीने खांदे उडवले. हिमाचल असो नाहीतर टिंबकटू, तो तिच्याइतकाच दुःखी, दयनीय मानसिक अवस्थेत असणार होता.

"तो अब क्या सोचा है?" अना पडलेल्या तोंडाने विचारत होती.

"कल से सोच ही रही हूँ. सब सोचने के बाद मुझे लागता है, की कुछ दिनोंमे उसे खुद की फिलिंग्स पता चलेगी और तब वो मुझे खुद कॉन्टॅक्ट करेगा."

"वो वापिस यहां, तुम्हारे पास आएगा?"

"नोप! ये उसका स्टाईल नही है."

"मुझे कुछ भी समझ नही आ रहा!" अना ओठ बाहेर काढत म्हणाली.

"उसने मुझे झूठ कहां है ये गिल्ट उसे परेशान करेगा. उस गिल्टसे बचने का उसके पास एक ही तरीका है."

"जलदी बोलो यार, वो सीआयडी के सालुंके जैसा फुटेज मत खा" अना हसत म्हणाली.

"वो सिर्फ मुझसे आर्टिकल पब्लिश करवाने का ट्राय करेगा. So that I will be the one who breaks his story."

"येय! सही है! तब तुम पब्लिश करोगी और..

"ना! पब्लिश नही करुंगी!" ती हसत म्हणाली.

"क्या? रुको रुको! ये कोई चेस खेल रही हो क्या? तुम्हारी चालें बहुत टफ है!" अना कपाळावर हात मारत म्हणाली.

"मेरे मना करनेसे उसे आगे की चाल खेलनीही पडेगी."

"मतलब?"

"खुद का काँसायन्स क्लीअर रखनेके लिए वो मुझे आर्टिकल अलाव करेगा. ये उसकी माफी मांगने का तरीका होगा, ऑब्विअसली टू शो दॅट ही लव्ह्ज मी. फिर मै वो पब्लिश ना करके उसे दिखाउंगी दॅट आय ऑल्सो लव्ह हिम. उसके लिए मेरी फिलिंग्स अभी भी वही है! यही एक तरीका है."  तिच्या चेहऱ्यावर आता समाधान होते.

"धन्य हो तुम माते! तुमने तो पूरा वॉर प्लॅन बनाके रखा है!" अना नमस्कार करत म्हणाली.

"इफ ही वॉण्ट्स अ वॉर, देन वॉर इट इज!" उर्वीने डोळा मारला.

अना इम्प्रेस होऊन 'बेला चाउ, बेला चाउ, बेला चाउ चाउ चाउ' गुणगुणत क्यूबिकलबाहेर पडली.

उर्वी समोर स्क्रीनकडे बघून गालात हसत होती.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

चांदणचुरा - ३३

ती खेळतेय तो एक जुगारच आहे हे तिला समजत होते. जोपर्यंत तिला आदित्यकडून काही कॉन्टॅक्ट होत नाही तोपर्यंत शांत बसावे लागणार होते. इतके करूनही ती पूर्णपणे चुकीची असण्याचीही शंभर टक्के शक्यता होती. सध्यातरी हा फक्त एक वेटिंग गेम होता. किती काळासाठी ते कोणीच सांगू शकत नव्हते.

डिसेंबरचा पहिला आठवडा आला आणि गेला. लांबलचक, कडू शांततेचे न संपणारे दिवस. अजूनही आदित्यचा काहीच पत्ता नाही. सोशल इव्हेंट्स, पार्ट्या, मुलाखती सगळं मागच्या पानावरुन पुढे सुरू आहे. कलिग्ज, मित्र मैत्रिणी सगळे लोक होते तेच आहेत तरीही.. दर थोड्या वेळाने कुणीतरी छातीत चाकू खुपसल्यासारखा एकटेपणा येतो. ती श्वास घेत असलेली नेहमीची प्रदूषित हवा अचानक लांब, तीक्ष्ण सुयांसारखी टोचायला लागते, वाचताना पुस्तकांची पाने रेझर ब्लेड्स बनून हात तासायची धमकी देऊ लागतात. रात्री साडेतीन वाजता सगळे जग झोपलेले असताना तिचा एकटेपणा छातीत खोलखोल रुतत जात मूळ धरत रहातो.

त्याचे नसणे तिला छेदून गेले होते. सुईतून धागा ओवल्यासारखे. आता ती जे काही करत होती, बनली होती त्या सगळ्याला त्याचा रंग, त्याचा गंध चिकटून बसला होता.

ती एका मित्राच्या बर्थडे पार्टीला गेली, काही वेळा प्रयत्न करून फोटोंसाठी हसलीसुद्धा. पण तिच्या ओठांवरचे हास्य डोळ्यांपर्यंत पोहोचत नव्हते. तरीही आतून ती किती दुःखी आहे ते एकाच व्यक्तीला दिसत होते ती म्हणजे अना.

"आय फील सो गिल्टी यार.. तुम्हे देख कर ही मुझे रोना आता है. तुम्हारी ये हालत मेरी वजह से है. सब मेरा फॉल्ट है." अना कोपऱ्यात तिच्याशी बोलत होती. 

"डोन्ट वरी, जिस वक्त जो होना है वो हो कर रहेगा." ती आत्मविश्वासाने म्हणाली खरी पण तिलाच या गोष्टीबद्दल आता शंका होती.

अजून एक सुन्न आठवडा येऊन गेला. तिचं शरीर ऑटो मोडवर काम करत होतं पण मन हरवलेलं होतं. क्वचित एखादी पूर्ण रात्र झोप लागली तर ती तिच्यासाठी मोठी अचिव्हमेंट होती. ऑफिस सोडता ती कशासाठीही बाहेर पडत नव्हती. घरातलं किराणा सामान संपत चाललं होतं. भाज्या तर कधीच संपल्या होत्या. ती कश्याबश्या रेडी टू इट गोष्टी खाऊन जिवंत होती. दिवसागणिक तिचं वजन कमी होत होतं.

तिची पुढे ढकललेली दहा दिवसांची मोठी सुट्टी ख्रिसमसच्या आदल्या दिवसापासून सुरू होणार होती. आई बाबाही त्याच दिवशी सुट्टीसाठी मुंबईत येणार होते. तेवीसच्या संध्याकाळी तिला ऑफिसनंतर ग्रोसरी शॉपिंगसाठी जायचं होतं, ती निघायच्या गडबडीत असतानाच ऑफिस बॉय येऊन 'आपको डिमेलो सर बुला रहे है ' म्हणाला.

ती नॉक करून डिमेलोच्या केबिनमध्ये शिरली. नेहमीप्रमाणे मोठा चष्मा लावून डिमेलो समोर स्क्रीनमध्ये घुसलेलाच होता. त्याने वर न बघता इशाऱ्याने तिला बसायला सांगितले.

"अभी मुझे पेज पॅल्ससे किसी पब्लिसिटीवाली लडकी का कॉल आया था." फायनली तो तिच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाला. तीही उत्सुकतेने ऐकत होती.

"हाउ डू यू नो आदित्य संत? द ऑथर?

"हू सेज सो?" तिने तिचा प्रश्न विचारला.

"ऍज आय रिकॉल, यू वर डिटरमाईंड टू फाइंड हिम." तो तिचा अंदाज घेत म्हणाला.

"हम्म, आय वॉज." ती थरथरणारे हात एकमेकांत गुंतवून टेबलाखाली लपवत थंडपणे म्हणाली.

"वेल, काँग्रॅट्स देन! इट सीम्स यू गॉट हिम. उस लडकीने कहां है की मि. संत इंटरव्ह्यू के लिए रेडी है. बट व्हॉट आय फाईंड सरप्रायझिंग इज दॅट ही हॅज स्पेसिफिकली गिव्हन युअर नेम. ही सेज ओन्ली यू कॅन हॅव द इंटरव्ह्यू बीकॉझ यू ऑलरेडी नो एव्हरीथींग अबाउट हिम. उसने सिर्फ तुम्हे ये पीस लिखने के लिए अलाव किया है, नो वन एल्स." त्याच्या खडूस चेहऱ्यावर जरासं का होईना हसू दिसत होतं.

तिने डोळे मिटून घेतले, ती इतके दिवस वाट बघत असलेली गोष्ट शेवटी घडत होती. हा निरोप म्हणजे जसे काही त्याने तिला लिहिलेले प्रेमपत्रच होते. गळ्यात दाटून येणारा हुंदका रोखायला तिने तोंडावर हात ठेवला.

"आय सी यू आर सो हॅपी! मुझे भी खुषीसे रोना आ जाता. दिस इज द बिगेस्ट स्कूप वी हॅव इन अ लॉंग टाइम. आय डोन्ट नो हाऊ यू मॅनेज्ड इट! हाऊ सून कॅन यू स्टार्ट? संडे एडिशनमे एक फुल पेज रखता हूँ. व्हॉट से?" तो उत्साहात म्हणाला.

"सॉरी सर, पेज पॅल्सको किसी और से पूछना पडेगा."

"व्हॉट?!!" डिमेलो ओरडून खुर्चीतून पडतापडता राहिला. "इज धिस अ जोक टू यू?"

आपल्या निर्णयावर ठाम राहायची हीच वेळ होती. "सॉरी टू डिसअपॉइंट यू सर. बट यू नीड टू फाइण्ड समवन एल्स."

"बट दे वॉन्ट ओन्ली यू, नो वन एल्स!" डिमेलो आता त्रागा करत स्वतःचे केस उपटेल असं वाटत होतं.

हे अगदी तिने ठरवल्याप्रमाणे होत होते. "सॉरी" ती कशीबशी म्हणाली.

डिमेलो आता चिडला होता. " ट्रीट दिस ऍज अ वॉर्निंग उर्वी. दिस न्यूजपेपर कॅन नॉट अफोर्ड टू लूज दिस अपॉर्चुनिटी. यू नीड टू चेंज युअर माईंड. यू हॅव वन डे टू डिसाईड."

तिने प्लॅन करताना नोकरी जाऊ शकणे या बाजूचा विचारच केला नव्हता. ती थोडीशी गडबडली. आवंढा गिळत तिने विचार पक्का केला. "वन डे ऑर वन मंथ वोन्ट मेक एनी डिफ्रन्स. आय एम नॉट चेंजिंग माय माईंड."

डिमेलोने रागात मान हलवली.

"फ्रॉम टूमॉरो, आय एम ऑन माय हॉलिडे." ती शांतपणे म्हणाली. बहुतेक ही सुट्टी नोकरी शोधण्यातच जाणार. पण आदित्यसाठी ते ही करायला ती तयार होती.

"ठीक है जाओ, फॅमिलीके साथ ख्रिसमस एन्जॉय करो!" तो दाराकडे हात दाखवत म्हणाला. "बट यूज दिस टाइम टू थिंक सिरीयसली. राईट द पीस अँड कीप युअर जॉब, अदरवाईज क्लीअर योर डेस्क व्हेन यू रिटर्न." तो गंभीर चेहऱ्याने म्हणाला.

"अँड इफ आय राईट, व्हॉट अबाउट युअर प्रॉमिस देन?" ती खुर्चीतून न उठता म्हणाली.

"कौनसा प्रॉमिस?"

"अबाउट एनी असाईनमेंट आय वॉन्ट." तिने तिचा मुद्दा पुढे केला.

"दॅट वी विल डिसाईड वन्स यू राईट द पीस." डिमेलो जरा विचार करून म्हणाला.

ती डेस्कवर परत येताना अनाच्या क्यूबिकलमध्ये डोकावली. सगळे मिळून ब्रेकमध्ये ऑफिस डेकोरेट करत होते. अना त्यातली एक चमकती रिबन डोक्याला बंडानासारखी बांधून बसली होती.

"ओ हवा हवाई!" अनाच्या डोक्यात तिने टपली मारली.

"तो? क्या कहां डिमेलोने?" उत्सुकतेने लगेच खुर्ची घुमवून अनाने विचारले.

तिने सगळी स्टोरी सांगितल्यावर अनाने हवेत एक पंच मारला. "येस्स! सेम जैसा तुमने कहा था!
तो अगली चाल क्या है?"

"पता नही."

"क्या मतलब? तुमने तो सब प्लॅन करके रखा था."

"अब आगे आदित्य क्या सोचता है उसपर सब डिपेंड है." ती गंभीर होत म्हणाली.

---

बऱ्याच दिवसांनी सकाळी लवकर उठून आवरून ती शेजारच्या मॉलमध्ये जायला निघाली. आईबाबा दुपारपर्यंत येणार होते.

लिफ्टमधून बाहेर पडतानाच अचानक मोबाईल वाजला म्हणून तिने पर्समधून काढून नंबर बघितला. कुठल्यातरी अननोन नंबरवरून कॉल होता. चालता चालता तिने कॉल रिसीव्ह केला.

"हॅलो उर्वी? मै फतेबीर बात कर रहा हूँ, शिमला से.."

"फते?" तो कॉल करेल अशी तिने कधी कल्पनाही केली नव्हती. आदित्यला तर काही झालं नाही ना? तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. "सब ठीक है ना? आदित्य ठीक है??" फोन घट्ट धरत तिने विचारले.

"हम्म, ठीक तो नही बोल सकते लेकीन हाँ वो घर पर ही है. वैसे तुम दोनोंके बीच हुआ क्या है?" त्याने काळजीने विचारले.

ती थोडी रिलॅक्स झाली. "वो तुम अपने दोस्तसे ही पूछ लो."

"मजाक मत करो! वो जबसे मुंबईसे वापीस आया है, अजीब बर्ताव कर रहा है. मैने उसको ऐसे कभी नही देखा. आतेही कुछ दिन गायब रहा, किसीके कॉल्स नही उठा रहा था. फिर एक दिन वो सांगलामे दिखा ऐसा किसीने बताया, तो मै मिलने चला गया. वो घर पर ही था लेकीन उसने इतनी पी रखी थी की वो होश मे नही था. और माईंड यू, वो पहले कभीभी इतनी पीता नही था. अब मुझे छोडके वो किसीसे बात नही कर रहा, घर के बाहर नही निकल रहा. खा नही रहा, सो नही रहा.. पता नही क्या चल रहा है उसके दिमाग मे.." तो धांदलीत बोलत सुटला होता. "और हाँ, उसको पता नही की मैने तुम्हे कॉल किया है. प्लीज उसे मत बताना, नही तो वो मुझे कच्चा चबा जाएगा"

"मेरी हालत कुछ अलग नही है.. तुम्हे मेरा नंबर कहाँ से मिला?"

"उसका फोन कही पडा हुआ था तो मैने उठाके तुम्हारा नंबर कॉपी किया."

तिच्या हृदयात कळ आली. "क्या वो इतनी पी रहा है?

"नही, पी तो नही रहा. लेकीन पता नही लास्ट टाइम वो कब सोया था. वो सिर्फ बेडपर पडा रहता है. मै जब टाइम मिलेगा तब जबरदस्ती उसे खाना खिलाता हूँ. सीडर अभीभी मेरे घरपर ही है, वो उसे भी नही देख रहा. मुझे ये डर है की कहीं वो खुदको कुछ कर ना ले.." तो घाबरत म्हणाला.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

चांदणचुरा - ३४

"अगर उसे बात करनी है, तो वो मुझे कॉल कर सकता है." ती शांतपणे म्हणाली.

"ये मै तो उसे नही कहनेवाला."

हम्म बरोबर, तो कुणाचे सल्ले ऐकतच नसणार.

"तुम जो उसका इंटरव्ह्यू लेने गयी थी, ये सब उसके बारेमे तो नही है? क्यूँकी वो कल, मैने उसे एक चान्स दिया था, उसका करियर सेट हो जाता लेकीन उसने ना कहां.. ऐसे कुछ बडबडा रहा था. मेरी कुछ समझमे नही आया."

"हम्म, उसीके बारेमे है सब. मै अभी सब तो बता नही सकती लेकीन तुम्हे पॉसिबल हुआ तो उसे मेरा इक मेसेज जरूर दे देना. उससे कहना मै एक भी वर्ड तब लिखुंगी जब वो मेरे सामने बैठकर मुझे फेस टू फेस आन्सर्स देगा. नही तो फर्गेट इट."

"तो ये फायनल है?" फतेने विचारले.

"हाँ!" म्हणून तिने कॉल कट केला.

कित्येक दिवसांत पहिल्यांदा ती स्वतःशीच मनापासून हसली.

आठवणीने लिस्ट पुन्हा पुन्हा बघत दोन तास फिरून तिने शॉपिंग पूर्ण केली. घरात सगळे डबे रिकामे बघून आईने गदारोळ माजवला असता. तेवढ्यात फोन पिंग झाला, आईने रस्त्यात कुठेतरी पोचल्याचा मेसेज केला असेल म्हणून तिने लगेच पाहिला नाही. एस्कलेटरवरून खाली जाताना सामानाच्या पिशव्या एका हातात धरून तिने फोन काढला. आदित्यचा टेक्स्ट! ती इतकी शॉक झाली की फोनच हातातून उडून पलीकडे पडला. वर जाणाऱ्या जिन्यातल्या बाईने पटकन दोन पायऱ्या वर जात तो उचलला आणि तिला आणून दिला.

"थँक यू सो मच, यू सेव्हड मी!" ती हुश्श करत म्हणाली. ती बाई गेल्यावर सामान खाली ठेवत धडधडत्या हृदयाने तिने मेसेज उघडला.

A: Why won't you write that article?

U: I would love to write. लिहिताना तिची बोटं आनंदाने सळसळत होती.

A: nice.

U: once you give me an interview. Face to face. तिचा आत्मविश्वास परत आला होता.

A: Not gonna happen. त्याचा लगेच रिप्लाय आला.

U: Then find someone else.

रिप्लाय येणार नाही हे तिला अपेक्षितच होतं. त्याचा भडका उडाला असणार. तो समोरासमोर मुलाखतीला कधीच तयार होणार नाही. कारण तिच्या प्रश्नांची उत्तरं देणं कठीण असेल आणि तिला परत मुंबईला पाठवणे त्याहून महाकठीण.

ती पिशव्या उचलून बाहेर येऊन ऑटोत बसली. घरी पोहोचून पाणी प्यायला आत गेली तोच फोन पुन्हा पिंग झाला. तिने पळत बाहेर येऊन मेसेज उघडला.

A: why are you being so difficult?

पटापट टाईप करताना तिच्या चेहऱ्यावर नकळत एक हसू पसरलं होतं.

U: Coz you lied to me. Fact is you love me.

त्याचा हो किंवा नाही काहीच रिप्लाय आला नाही. तिला ते अपेक्षितही नव्हतं. तिने थोडा वेळ वाट बघून फोन टेबलवर ठेवला आणि किचनमध्ये सामान लावायला सुरुवात केली. तिच्या हृदयातली कळ परत आली होती. कारण हे संभाषण कदाचित त्यांच्यात शेवटचं ठरू शकतं हे तिला जाणवत होतं.

तेवढ्यात खालून हॉर्न वाजला. आले वाटतं, म्हणून ती लिफ्टमधून उतरून पळत पार्किंगमध्ये गेली. बाबा कार पार्क करून बॅगा काढतच होते. तिने पटकन त्यांच्या हातातली मोठी बॅग घेतली. "आई, एवढ्या तीन तीन बॅग कशाला आणल्या? इथे कपाटभर कपडे आहेत तुझे."

"बघ मी तिला कधीचा सांगतोय एवढ्या सामानाची गरज नाही, तरी लाडक्या लेकीसाठी तिने बॅग भरून काय काय पदार्थ करून आणलेत." बाबा कंटाळून म्हणाले.

"मग लागतातच ते आणायला, बघा माझी लेक किती वाळली ते." आई तिचं निरीक्षण करत म्हणाली.

"अरे हो हो.. आधी वर तर चला, मग भांडा किती भांडायचं ते." उर्वी हसत म्हणाली. तिचा पन्नास टक्के ताण कमी झाला होता.

वर आल्याआल्या हातपाय धुवून आईने बॅगमधून छोले, पुऱ्या, दही, लसूण चटणी आणि आम्रखंड वगैरे सगळं काढून त्यांना जेवायलाच बसवलं.

"उर्वी, आत्ता तू जास्तच बारीक झालीस हं, आता ते डायटिंग फियटिंग पूर्ण बंद काही दिवस. खूप झालं, आता काही दिवसांनी दिसेनाशी होशील. आणि तोंड बघ कसं झालंय. जाग्रण वगैरे सगळं बंद. जाईपर्यंत बघ तुला कशी टामटूमित करून जाते."

आईची बडबड ऐकताना ती आणि बाबा मिळून जाम हसत होते.

दुपारची झोप आणि चहा झाल्यावर आईने आपली सिरीयल लावली आणि उर्वीला भाज्या निवडायला बसवले. तिने वाकडं तोंड करून मेथी निवडायला घेतली.

"एवढया पिशवीभर भाज्या आणायची काही गरज? एवढ्या पालेभाज्या, एकेक किलो मटार, ओले हरभरे, वांगी, टोमॅटो आणि हा भलामोठा फ्लॉवर! गावजेवण आहे की काय!"

"अग काल गंगेवरच्या बाजारात गेले होते ना, एवढ्या छान टवटवीत भाज्या दिसल्या. तिथे डायरेक्ट शेतकऱ्यांकडून येतात हल्ली. म्हटलं आठवडाभराच्या घेऊन जाते. इथे कुठे अश्या मिळायला. इथे नुसते ते गटारांवर उगवलेले पालक!"

"ओ हॅलो, आई? तू लहानपणापासून तेच पालक खाऊन मोठी झाली आहेस. आत्ता कुठे नाशिकला गेलीस म्हणजे काय तिथलीच झालीस का!" ती खुसखुसत म्हणाली.

"तू निवडायचं काम कर!" आई हसू दाबत रिमोट उचलत म्हणाली.

---

रात्री जेवणं झाल्यावर टीव्ही बघता बघता आई तिच्या डोक्याला तेल लावून मसाज करत होती. बाबाही शेजारच्या खुर्चीत बसले होते. आदित्य निघून गेल्याच्या दिवशीच ती आईला फोन करून खूप रडली होती, अर्थात काही डिटेल्स वगळून. बाबांनीही फोनवर तिला खूप समजावले होते.

"खरंच किती वाळली आहेस उर्वी! गाल आत गेलेत, डोळ्याखाली केवढं काळं झालंय.. झोपत नसणार तू नीट.. हे सगळं आदित्यमुळे ना?" आई म्हणाली.

"उर्वी हे बघ मला सांग, आम्ही जाऊन त्याच्या आईला भेटू का?" बाबांनी पुस्ती जोडली.

"बाबा! प्लीज. तो त्याच्या आईशी बोलत नाही, सांगितलं ना मी. तो मलाच परत भेटेल की नाही तेसुद्धा माहीत नाहीये." ती म्हणाली.

"हा संत मला कुठे भेटला ना तर उलटा टांगून फटकवेन त्याला." बाबा म्हणाले.

"बाबा!" कल्पना करून उर्वी आणि आई हसत सुटल्या.

"अहो, पण तुमचा आवडता लेखक आहे ना तो?" आई मुद्दाम चिडवत म्हणाली.

"लेखक असला म्हणून काय झालं! माझ्या मुलीला त्रास देतोय तो!"

"हो, हो बाबा. कळलं आम्हाला. शांत व्हा आता. मी तुमचे पाय चेपून देऊ का? खूप वेळ ड्राईव्ह करून दुखतात ना?" उर्वीने विचारले.

"बघ बघ कसा विषय बदलतेय!" ते हसत बायकोकडे बघून म्हणाले.

"बाबा, तुम्ही दोघं उद्या घरीच आहात ना? मी कार घेऊन जाऊ?"

"तू काय तिकडे बर्फात वगैरे पळून नाही ना जाणार?" बाबांनी डोळे मोठे करत विचारले.

"अहो!" आईने डोळे दाखवून त्यांना गप्प करायचा प्रयत्न केला.

"हुं! अजिबात नाही. दोन तीन तासांचंच काम आहे. मला ट्रेनने जायचा कंटाळा आलाय."

"पण मी काय म्हणतो, जर हिला त्याच्याशी ब्रेकअप करायचाच आहे तर आधी एकदा आम्हाला भेटव तरी! मग कर काय करायचं ते ब्रेकअप." ते डोळा मारत म्हणाले.

"बाबा, प्लीज चिडवू नका ना."  तिने पाय चेपताना हळूच लहानपणीसारख्या त्यांच्या तळपायांना गुदगुल्या केल्या.

थोड्या वेळाने गुड नाईट म्हणून ती तिच्या बेडरूममध्ये झोपायला गेली. आता न राहवून शेवटी तिने कपाटातले गिफ्ट बाहेर काढलेच. उत्सुकतेने थरथरत्या बोटांनी तिने रिबनची गाठ सोडली. आत बॉक्समध्ये स्नो ग्लोबसारखं काहीतरी होतं. तिने तो तळहातात मावणारा काचेचा गोल उचलून पाहिला. तळाशी एक काळ्या ओबडधोबड दगडाचा बेस होता, त्याच्यावर हिरव्या गवताची पाती, मधोमध एक छोटंसं खोड आणि त्याच्या मुळाशी एकमेकांना टेकलेल्या दोन खारकांसारखं काहीतरी होतं. ह्या सगळ्या देखाव्यावर ओतलेली घट्ट, धुरकट गोल काच होती, ज्यामुळे धुक्याचा भास व्हावा. तिने तो ग्लोब उलटा करून पाहिला तर त्या दगडावर स्वर्लिंग लेटर्समध्ये काहीतरी कोरलेलं होतं. तिने ग्लोब जवळ धरून ते वाचलं.

You are summer
    to my winter heart

शेवटी तिच्या डोळ्यातून पाणी ओघळलंच. डोळे पुसत तिने त्या काचेवर ओठ टेकले.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

चांदणचुरा - ३५

सकाळी उठल्याबरोबर उर्वीने पहिलं काम कुठलं केलं असेल तर माया कासेकरांना कॉल करून त्यांना भेटायची वेळ ठरवली. सकाळपासून आईबाबांबरोबर मजेत वेळ कसा गेला ते तिचे तिलाच कळले नाही. आईच्या हातचे चविष्ट खाणे-पिणे, गप्पा आणि झोप एवढाच एक कलमी कार्यक्रम रिपीट मोडवर सुरू होता.

चार वाजता भेटायची वेळ होती त्यामुळे ती साडेतीनला घरातून निघाली. कार पार्क करून येईपर्यंत मायाकाकू दार उघडून पायरीवर तिची वाट बघतच थांबल्या होत्या. बाहेर अरोकारीयाच्या पाच फुटी झाडाला त्यांनी बारीक पिवळे फेअरी लाईट्स गुंडाळले होते. उर्वी आल्यावर तिच्या खांद्यावर थोपटून त्या आत घेऊन गेल्या.

"Wow! झाड न तोडता असं लाईव्ह ख्रिसमस ट्री बनवायची आयडिया मस्त आहे." उर्वी म्हणाली.

त्या आतून चहा आणि घरी केलेल्या कुकीज घेऊन आल्या.

"हम्म, आदित्य लहान असताना मी घराबाहेरचं मोठं पाईन ट्री असं सजवत असे. तेवढीच त्या जंगलातल्या एकांतवासात मजा. ह्या ख्रिसमस स्पेशल कुकीजसुद्धा मी आदित्यला मदतीला घेऊन करत असे. त्याला खूप मजा यायची लुडबुड करायला. बंगल्यात एक भट्टी होती त्यामुळे तिथल्या कूककडून मी बरंच बेकिंग शिकले होते. आदित्य सारखा माझा डोळा चुकवून कच्चं कुकी डो तोंडात कोंबायचा पण त्याला शेप्स कापायला भारी मजा वाटायची. आदित्यला कुकीज करताना बघून त्याच्या बाबाला राग यायचा, ह्या कसल्या गर्लिश गोष्टी शिकवतेस, बाहेर खेळायला पाठव म्हणायचा. बट आदित्य वॉज जस्ट अ बेबी, तीन चार वर्षांचा असेल तो तेव्हा."

"ह्या डबल चॉकलेट पेपरमिंट कुकीज त्याच्या अगदी आवडत्या होत्या. एकदा दुपारी आम्ही झोपून उठलो तर हा कुठे दिसत नव्हता. सगळे शोधून शोधून दमले, तर हा कुठे सापडावा? दिवाणाखाली अक्खा डबा मांडीवर घेऊन एकेक कुकी तोंडात कोंबत बसला होता!" आठवणी सांगताना त्यांच्या थकलेल्या डोळ्यात थोडी चमक आली होती.

किती गोड! तिला बेबी आदित्यची कल्पना करून मजा वाटत होती. हसून मान डोलवत तिने एक कुकी उचलली.

"मग हल्ली तुझा काही कॉन्टॅक्ट झाला का त्याच्याशी?" त्यांनी उत्सुकतेने विचारले.

"थोडासाच." कालच्या टेक्स्टपासून काहीच नाही.

"हम्म त्याच्या बाबावर गेलाय अगदी. अडेलतट्टू!" त्या मान हलवत म्हणाल्या.

"मॅम, खरं तर इथे मी त्या अंगठीबद्दल तुम्हाला सांगायला आले, कारण ते न सांगता मला चैन पडत नव्हते आणि फोनवर सांगणं मला योग्य वाटत नव्हतं." तिने अंगठी आदित्यने बर्फात फेकून देणे आणि तिने शोधण्यापर्यंतची सगळी कहाणी त्यांना सांगितली.

त्यांचा फुरंगटलेला चेहरा बघून ती पुढे बोलत राहिली, "खरं म्हणजे मी तिथे पोहोचताच त्याला अंगठी दाखवून चूक केली. थोडं थांबून दिली असती तर कदाचित त्याने ठेवली असती. तुमची खूप मौल्यवान आठवण नाहीशी झाली म्हणून मला इतके दिवस खूप गिल्टी वाटत होतं. आय एम रिअली सॉरी."

"तू वाईट वाटून घेऊ नको. उलट त्या अंगठीमुळे तुला तिथे पोहोचता आलं हेही काही कमी नाही. अंगठीहून महत्वाचा आदित्य आहे, त्याला निदान मी माझ्या बाजूने त्याच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते आहे हे तरी कळले. तू मला समजावून सांगितलं ते बरं केलंस नाहीतर माझ्या डोक्याला उगीच भुंगा लागून राहिला असता. हो आणि मला मॅडम वगैरे म्हणू नको, काकू म्हटलं तरी चालेल." त्या हसून म्हणाल्या.

"बरं. तुम्हाला सगळं सांगून आता बरंच हलकं वाटतंय मला." म्हणून ती ही हसली.

"कुकीज आवडल्या का तुला? अजून देऊ?"

"खरंच खूप मस्त झाल्यात, पण पोट भरलंय माझं. अरे हो, अजून गोष्ट मला विचारायची होती." ती पर्समधून काचेचा ग्लोब बाहेर काढत म्हणाली. "हे मधे खारकेसारखं काय आहे ते माहिती आहे का तुम्हाला?"

त्यांनी ग्लोब हातात घेऊन चष्म्यातून निरखून पाहिले. "ओह! हे पण आदित्यने दिलेलं दिसतंय तुला?" त्यांना मजा वाटत होती हे त्यांच्या मिश्किल डोळ्यांतून दिसत होतं.

"हो" ती नकळत जरा लाजत म्हणाली.

"त्या खारकांसारख्या आहेत ना त्या वाईल्ड मश्रूम्स आहेत. 'गुच्छी' म्हणतात त्यांना. त्या फक्त हिमालयातल्या जंगलातच उगवतात आणि त्यांची शेती नाही करता येत. त्यामुळे दुर्मिळ आणि भरपूर महाग असतात. ही तिथली डेलिकसी आहे. त्यांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्या जंगलात झाडांच्या मुळाशी कायम जोडीने उगवतात. ही एकटी मश्रुम कधीच दिसणार नाही. ह्यासुद्धा त्याने जंगलातून शोधून आणल्या असणार."

"ओह!" ती कान देऊन ऐकत होती.

"So it is as good as declaration of his love for you." त्या हसून तिच्याकडे बघत म्हणाल्या.

ती हसली खरी पण तिला आता भीती वाटत होती. कालच्या टेक्स्टनंतर तो आता तिच्यापासून कायमचा लांब जातो की काय असे राहून राहून वाटत होतं. तिने तिचे सगळे पत्ते उघड केले होते, सगळा प्लॅन पूर्ण केला होता, तरीही तो पाऊल पुढे टाकत नसेल तर कशालाच अर्थ रहात नव्हता. तो तिच्या समोर यायला कचरत होता. त्या दिवशी किचनमध्ये जे सांगायचे अधुरे सोडून तो गेला होता ते कधीच पूर्ण होणार नव्हते.

त्यांचा निरोप घेऊन ती घरी परतली तेव्हा ड्रॉईंग रूममध्ये आईच्या सोसायटीतल्या मैत्रिणींचा घोळका जमला होता. तिला बघून बाबांनी टेरेसमध्ये बसायला बोलावलं.

"हां उर्वी! बरं झालं तू आलीस. ह्या बायकांनी डोकं उठवलं होतं." ते कपाळ दाबत म्हणाले.

ती हसत टेरेसचं दार सरकवून त्यांच्याशेजारी जाऊन बसली.

"मला जरा हे प्रेझेंटेशन बनवायला मदत कर, दोन तारखेला ऑफिसमध्ये एक सेमिनार घ्यायचा आहे त्याची तयारी करत होतो आणि नेमक्या ह्या बायका कलकल करत आल्या." ते समोरचा लॅपटॉप तिच्याकडे सरकवत म्हणाले.

"ओके, लेट्स सी.." म्हणून तिने प्रेझेंटेशनमध्ये डोके घातले.

---
रात्री जेवल्यावरसुद्धा बाबांची सेमिनारचीच तयारी सुरू होती म्हणून ती आईबरोबर टेरेसमध्ये बसली होती. तिने आईजवळ सरकून तिच्या गळ्यात हात टाकत खांद्यावर डोके ठेवले.

"तुला हे वर्ष किती वाईट गेलं ते जाणवतंय बेटा.. तुझं दुःखही कळतंय मला." आई तिच्या पाठीवर थोपटत म्हणाली.

"माझं त्याच्यावर खरंच खूप प्रेम आहे आई."

"माझ्याशी बोल ना मग, आत आत सगळं दाबून ठेवू नको. त्याच्याबद्दल तुला काय वाटतं ते सांग सगळं. मोकळी झालीस की दुखणार नाही असं." आई समजावणीच्या सुरात म्हणाली.

तिच्या मनातल्या भावना कुणालातरी उघडून दाखवायच्याच होत्या. आईबाबा आल्यापासून तिला आठवून वाईट वाटेल म्हणून आदित्यचा विषय शक्य तितका टाळत होते. त्याचं नाव आलं की नकळत विषय बदलला जात होता. त्याच्याबद्दल न बोलता नुसतंच सगळं छान छान असल्यासारखं तिच्याने आता वागलं जात नव्हतं. ते दोघे तिला जपायला बघत होते पण आदित्यबद्दल न बोलून ती आतून अजून पोखरली जात होती.

"आई, मी आदित्यसारखा कुणीच माणूस अजूनपर्यंत बघितला नाही. वेगळाच आहे तो. बाहेरून तो एकदम टफ गाय असल्याचं दाखवत असला तरी आतून खूप मायाळू आहे. आधी त्याच्या थंड प्रतिसादामुळे लोक त्याला घाबरून असतात पण एकदा त्याला ओळखायला लागलं की तो अगदी दिलदार होतो. त्याचे जवळचे लोक अगदी थोडे असतात पण जे असतात ते अगदी घट्ट असतात. त्याला बघून अजिबात वाटणार नाही पण त्याच्याकडे अगदी सटल सेन्स ऑफ ह्युमर आहे, तो बरोबर असला की मी पूर्ण वेळ हसत असते."

आई गालावर हात ठेवून लक्ष देऊन तिचे म्हणणे ऐकत होती.

उर्वी पुढे सांगत होती. "तो तुला खूप रुक्ष, जंगली वाटतो ना तसा अजिबात नाहीये. पण ते त्याच्याबरोबर राहिल्यावर हळू हळू कळतं. इव्हन मी सगळ्या नातेवाईकांशी इतकी क्लोज आहे बघितल्यावर त्यालाही त्याची माणसं हवीशी वाटत होती. तो मला म्हणाला तसं."

"त्याची फॅमिली? त्याच्या घरी कोण कोण असतं?" आईने पुढे विचारलं.

"त्याचे वडील सात आठ वर्षांपूर्वी वारले आणि आई इथेच आहे पण तो तिच्याशी बोलत नाही. हिमाचलमध्ये सांगल्याला घर आहे, तिथे तो एकटाच रहातो. तुला मागे म्हटलं होतं ना आई, की त्याला त्याच्या आईबद्दल प्रचंड राग आहे. पण मनातून तिची तेवढीच काळजीही आहे, फक्त तो अजून ते स्वतःशीच मान्य करत नाहीये. तो स्वतःशीच झगडतोय.." ती त्याचा आईबद्दल चौकशी करताना मऊ झालेला चेहरा आठवत म्हणाली.

"हम्म, तो एकाच वेळी बऱ्याच गोष्टींसाठी झगडतोय असं दिसतंय.." आई गंभीर होत म्हणाली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

चांदणचुरा - ३६ (समाप्त)

"खरंच! त्याचा खरा झगडा स्वतःशीच आहे."
तिने मान्य केले होते. तिच्याइतक्याच त्रासातून तोही जात होता. तिला दिवाळीत झालेल्या त्यांच्या गप्पा आठवत होत्या. एकमेकांना सांगितलेली त्यांची स्वप्नं कितीही वेगळ्या वातावरणात राहिले तरी एकमेकांसारखीच होती. त्यांच्यात न सांगता येण्यासारखा एक बंध निर्माण झाला होता. तरीही ती कदाचित त्याच्या प्रेमात वेडी झाल्यामुळे असा विचार करायची शक्यता होती. पण जर आदित्यला मनापासून ह्या नात्याबद्दल शंका असेल आणि तिच्यापासून लांब रहायचे असेल तर ती त्याच्या वाटेत येणार नव्हती. ती विचारात पडली होती.

"मला भीती वाटतेय की तो पुढे माझ्याबरोबर नसेल तर? त्याच्यानंतर बाकी कोणावरच मी तेवढं प्रेम नाही करू शकणार." ती बारीक आवाजात म्हणाली.

"ओह डिअर.." आई तिच्या पाठीवर थोपटत म्हणाली. "आत्ता तुला जेवढा त्रास होतोय तो हळूहळू कमी होत जाईल. प्रेम रहातंच गं पण त्याची तीव्रता कमी होत जाते. बऱ्याच काळाने तुला दुःख असेल पण त्यातली वेदना निघून गेलेली असेल."

"आई तुला माहितीये, मी खरंच त्याच्या प्रेमात पडतेय हे मला कधी जाणवलं? मी चिटकुलला गेले तेव्हा खूप बर्फ पडत होता. तो थांबल्यावर आम्ही रात्री केबिनबाहेर पडून आकाश बघत होतो. हिमाचल मधलं आकाश इतकं मॅजिकल असतं! आकाश असं वेल्वेटसारखं घट्ट काळं आणि त्यात स्पार्कल पावडर उधळल्यासारखे पसरलेले चांदणे.
पायाखाली चमकता पांढराशुभ्र बर्फ. हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं होतं, तेव्हा मला खरंच जाणीव झाली की तो मला किती आवडायला लागलाय." तेव्हाच त्यालाही ते जाणवलं होतं, तिला नक्की माहीत होतं. त्या क्षणापासून त्यांच्यात सगळं बदललं. तिच्याभोवती लपेटलेल्या त्याच्या हातांमध्ये काहीतरी जादू, काहीतरी अद्भुत गोष्ट होती ज्याने तिचं अस्वस्थ मन अगदी मऊ, शांत शांत झालं होतं. त्याने कबूल केलं नाही तरी त्या चांदणक्षणी तोही हलला होता.

ती आईच्या मांडीवर डोकं ठेऊन आडवी झाली. आई हळूच तिला थोपटत होती. थोड्या वेळाने आत जाऊन झोपताना तिला आईबरोबरचे संभाषण आठवत होते. त्याच्या कॉल किंवा मेसेजची ती आसुसून वाट बघत होती. पण नाहीच.. उत्तराची फार आशा नव्हती, तरीही तिने फोन हातात घेतला आणि टेक्स्ट पाठवून दिला.

U: Look at the stars tonight. Merry Xmas!

पुढचे पाच दिवस घराची साफसफाई, आईबरोबर शॉपिंग, आईच्या मैत्रिणी, एका लांबच्या नातेवाईकांकडचे लग्न असे माणसांनी भरगच्च होते पण आदित्यसाठी तुटणारे तिचे मन काही शांत होत नव्हते. ३१ च्या संध्याकाळी बाबांचे एक मित्र सहकुटुंब भेटायला आले होते. जेवून सहज बाहेर बसल्यावर बाबांनी कवितांचा विषय काढला आणि त्यांनी मिळून काही आवडत्या कविता वाचायची टूम निघाली. त्यांच्या आग्रहामुळे उर्वीनेही बासरीवर काही मराठी भावगीतं वाजवली. सगळ्यात शेवटी त्यांनी ग्रेस वाचायला घेतला.

'कंठात दिशांचे हार, निळा अभिसार वेळूच्या रानी

झाडीत दडे देऊळ, गडे येतसे जिथून मुलतानी.

लागली दरीला ओढ, कुणाची गाढ पाखरे जाती

आभाळ चिंब, चोचीत बिंब पाऊस जसा तुजभवती.

गाईंचे दुडूदुडू पाय, डोंगरी जाय पुन्हा हा माळ

डोळ्यांत सांज, वक्षांत झांज गुंफिते दिव्यांची माळ.

मातीस लागले वेड, अंगणी झाड एक चाफ्याचे

वाऱ्यात भरे, पदरात शिरे अंधारकृष्ण रंगाचे.'

ऐकताना मनातली कालवाकालव असह्य होऊन, ती काहीतरी कारण काढून तिच्या खोलीत गेली. काही वेळाने ते लोक निघून गेल्यावर बाबा तिच्या खोलीत आले. ती खिडकीतल्या खुर्चीत बसून उदास, कोरड्याठक्क डोळ्यांनी बाहेर बघत होती.

"उर्वी? बरं वाटतंय का?" बाबांनी काळजीने विचारलं.

"बरी आहे." ती त्यांच्या पोटाला मिठी मारत म्हणाली. "हळूहळू अजून बरी होणारे."

"नक्की होशील. मला माहिती आहे." बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले.

---

सकाळी उठल्यापासून किचनमध्ये आईची गडबड सुरू होती. उद्या पहाटे निघायचं म्हणून उर्वीसाठी गुळाच्या पोळ्या बनवून ठेवायचा घाट घातला होता आणि कोथिंबिरीच्या भल्यामोठ्या दोन जुड्या संपवायला कोथिंबीर वडी. मध्येच चहा आणि बटाटेपोह्यांचा नाश्ताही करून झाला. उर्वी थ्री फोर्थ टाईट्स आणि वर लूज टीशर्ट घालून न्हायलेले केस फॅनखाली वाळवत होती. बाबा सोफ्यावर बसून सुडोकू सोडवत होते. तेवढ्यात डोअरबेल वाजली. "थांबा थांबा, मी बघते, ती खालची अर्चना मला चिक्कीचा गूळ आणून देणार होती." आई आतून ओरडत बाहेर आली. बाबांनी उर्वीकडे पाहून कठीण आहे! असा लूक दिला.

पण आत आलेली व्यक्ती अर्चना नव्हतीच.

"सॉरी मी अशी अचानक न कळवता आले, पण मी कुणाला तरी बरोबर घेऊन आले आहे. मी माया, आदित्यची आई." त्या तिच्या आईकडे बघून हसत म्हणाल्या.

"सॉरी कशाला, या ना. मी अपर्णा, उर्वीची आई."

तेवढ्यात आदित्य शूज काढून त्याच्या आईशेजारी येऊन उभा राहिला. बाबा उठून त्यांच्याशी बोलायला लागले.

उर्वीच्या तोंडाला कोरड पडली होती. तोंडातून एक शब्दही निघत नव्हता. नॉट अ सिंगल वर्ड! नुसत्या डोळ्यांनी ती आदित्यला पिऊन टाकत होती. केस थोडेसे वाढले होते, चेहऱ्यावर एक दोन दिवसांची खुरटी दाढी होती, प्लेन व्हाइट शर्ट आणि ब्लू डेनिम्स. वजन बरेच कमी झालेले दिसत होते पण चेहरा! त्याचा चेहरा इतका आनंदाने फुललेला तिने कधीच पाहिला नव्हता. त्याच्या डोळ्यांत चमक होती आणि त्याचा एकंदर मूडच रिलॅक्स, हलका झालेला दिसत होता. आत आल्यापासून त्याचे डोळे तिला शोधून तिच्यावरच खिळले होते.

तिला अचानक आठवलं की तो तिला सोडून गेला म्हणून ती चिडली होती. लगेच तिने रागाने त्याच्यावरची नजर वळवून टेबलावरची बॉटल उचलून पाणी प्यायले. तो अजूनही चमकत्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत ओठ चावून हसत होता.

उफ्फ आदी.. तिच्या अंगातून विजेची एक लहर सळसळत गेली. ती मुद्दाम मोठे डोळे करून, न हसता त्याच्याकडे बघत राहिली. त्याने ओठांनी सॉरीचा अविर्भाव करून बाकीच्यांना दिसू न देता, एका हाताने कानाची पाळी पकडली. तिने मोठ्ठ हसून डोळे मिचकावले. आईबाबा त्याच्या आईशी काय बोलतायत याकडे तिचे लक्षच नव्हते.

"मला वाटतं, या दोघांना जरा बोलू द्यावं का?" मायाकाकू त्या दोघांकडे मिश्कीलपणे बघून हसत म्हणाल्या.

"ओके. पण आदित्य, मला नंतर तुझ्याशी थोडं बोलायचंय." त्याच्याकडे बघून बाबा म्हणाले.

"हो काका, त्यासाठीच तर आलोय मी!" तो त्यांच्याकडे हसून बघत म्हणाला. तिने भुवया उंचावून त्याच्याकडे बघितले. सगळी पेरेन्ट कंपनी टेरेसमधल्या सोफ्याकडे गेल्याचं बघून दोन पावलात तो उर्वीपर्यंत पोचला. घट्ट मिठीत घेत त्याने तिला सवयीने जमिनीवरून उचललं. तिच्या ओल्या केसांतून त्याच्या खांद्यावर पाणी टपकत होते. "आदी, तुझा शर्ट.. म्हणायला तिने तोंड उघडले आणि त्याने लगेच ओठांनी तिचे तोंड बंद करून टाकले. इतक्या दिवसांचे सगळे दुःख, सगळा विरह तो त्याच्या ओठांनी शांत करत होता. शेवटी बऱ्याच वेळाने तो श्वास घ्यायला थांबला तेव्हा त्याने तिला खाली ठेवले.

ती सोफ्यावर त्याला बिलगून बसल्यावरही दोन्ही हातात त्याचा चेहरा घेऊन प्रेमाने त्याच्या डोळ्यात बघत होती. "तू आलास! तू खरंच आलास." ती कुजबुजली. त्याने मान हलवली. एखाद्या तहानलेल्याला पाण्याचा झरा सापडावा अश्या नजरेने तो तिला न्याहाळत होता. "तू माझ्यावर कसली जादू केली आहेस उर्वी?" तो पुटपुटला.

"मी फक्त तुझ्यावर प्रेम केलंय." ती फिल्मी स्टाईलने पापण्या फडफडून हसली.

"मी तुझ्या करियरसाठी एवढा चांगला चान्स देत होतो तर तू नाही का म्हणालीस?" त्याने तिच्या गालाला चिकटलेले ओले केस बाजूला करत विचारले.

तिच्या निर्णयाचे तिलाही आश्चर्य वाटत होते पण तिचा निर्णय पक्का होता. "कारण माझं करियर मला तुझ्याइतकं महत्वाचं वाटत नाही."

"हा किती वेडेपणा आहे उर्वी? आपल्यात काहीच कॉमन नाही. तू मुंबईत, मी सांगला.. कसं मॅनेज-

"श्श.. ती त्याच्या तोंडावर बोट ठेवत म्हणाली. "मी तुझ्याकडे शिफ्ट होईन." पुढे होत त्याचा श्वास रोखून किस करत ती म्हणाली. "वी विल मेक इट वर्क!" ती डोळे मिटून त्याच्या मानेवरून खांद्यावर बोट फिरवत म्हणाली. ती शेवटची त्याच्या मिठीत असल्याला कितीतरी काळ लोटल्यासारखा वाटत होता. त्याचा स्पर्श ती किती जास्त मिस करत होती ते तिच्या आत्ता लक्षात येत होते.

"तू असं किस करतेस तेव्हा आपोआप विश्वास ठेवला जातो."

तिने त्याच्याकडे बघून डोळा मारला. "मग? आईला कधी भेटलास तू?" तिने उत्सुकतेने विचारले.

त्याने एक खोल श्वास घेतला, "मी तुला माझ्या आयुष्यातून दूर करूनच गेलो होतो. मला वाटलं आधीही मी एकटाच होतो, आताही एकटाच राहीन. पण ह्या वेळचे एकटेपण जीवघेणे होते. माझी पूर्णपणे भिगी बिल्ली झाली होती. तुला 'क्राऊन शायनेस' माहिती आहे? जंगलात झाडं उंच वाढतात तेव्हा पुरेसा उजेड मिळून सगळी झाडं वाढावीत म्हणून ती एकमेकांमध्ये थोडी जागा सोडून फांद्या पसरतात. एकमेकांना स्पर्श न करता ती मोठी होतात. मलाही तसंच वाटत होतं. माझ्यामुळे तुला त्रास होऊ नये म्हणून मी लांब जात होतो. असाच विचार करता करता मला तुझे शब्द आठवले."

"माझे? काय?" तिने भुवया उंचावल्या.

"मी आईला काही हवंय का विचारलं होतं, तेव्हा तू म्हणाली होतीस की आईला फक्त तिच्या मुलाची गरज आहे. बराच विचार करून शेवटी मी आईकडे जायचं ठरवलं. आता तिचा एकटेपणा मी समजू शकतो." त्याच्या आईने त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाल्याचं तिला का सांगितलं नाही? ती विचारात पडली.

"आईला माहीत नव्हतं. मी कॉल वगैरे न करता काल सकाळी तिच्या दारात जाऊन थडकलो. तिच्या घरासमोर जाऊन बेल वाजवेपर्यंत मला तिथून पळून जावंसं वाटत होतं. मी स्वतःला आईच्या ओढीने मुंबईला चाललोय असे सांगत होतो. पण खरं कारण म्हणजे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आता अजून एक मिनिटसुद्धा नाही."

"आणि मीही!" म्हणून ती अजूनच त्याच्या मिठीत घुसली.

टेरेसच्या दारातून त्याच्या आईच्या बोलण्याचा आवाज येत होता, "May be she needed someone to show her how to live and he needed someone to show him how to love."

समाप्त

Keywords: 

लेख: 

चांदणचुरा : वादी के उस पार - १

या आधीची गोष्ट

कांगडा टीच्या चौकोनी डब्यातून आदित्यने किटलीत चहा घातला. उकळत्या पाण्यात हलकेच पसरणारा सोनसळी रंग पहात त्याने आलं ठेचून दोन तुकडे घातले आणि खूष होत किटलीवर दरवळणाऱ्या वाफेत नाक खुपसून खोलवर श्वास घेतला. किटलीवर झाकण ठेवताना समोर काचेतून त्याची नजर लांबवर पसरलेल्या हिरव्यागार देवदारांच्या दाटीतून खळाळत्या बस्पाच्या प्रवाहापर्यंत गेली. उन्हात चमकत्या पाण्याकडे पाहता पाहता त्याला तो दिवस आठवला...

तिचे दार ओढून घेताना झालेला लॅचचा हलकासा क्लिक, रेंगाळण्याचा मोह होताना चटचट उचललेली त्याची पावले, अवकाळी काळोख भरून कोंदटलेला रस्ता आणि गर्दीवर कोसळणारा मुंबईचा जाडजूड पाऊस. पावसाची जराही तमा न बाळगता मिळेल ती फ्लाईट आणि मिळेल त्या वाहनाने तो दुसरा दिवस संपता संपता घरी पोहोचला होता. संपूर्ण प्रवासात डोके बधिर होते पण नदीवरच्या त्या छोट्याश्या पुलापाशी उतरताना त्याच्या सगळ्या आठवणी फसफसून वर आल्या. बर्फातून तसाच ओलेत्या शूज अन कपड्यांनिशी केबिनमध्ये जाऊन तो सोफ्यावर आडवा पडला आणि वर टांगलेला आकाशकंदील दिसताच त्याने दुखरे डोळे मिटून घेतले.

त्याने तडकाफडकी घेतलेला निर्णय चूक की बरोबर ते उमजत नव्हते पण तो निर्णय दोघांच्या पुढच्या आयुष्यासाठी गरजेचा आहे हे त्याचे मत ठाम होते. पण तरीही ही बेचैनी कशी शांत करावी याचा काहीएक उपाय त्याच्याकडे नव्हता. एक अक्खा दिवस त्याने केबिनमध्येच कोंडून घेऊन घालवला पण तो दडदडीत सोफा ते डायनिंग टेबलपासून अगदी फोन आणि बेडपर्यंत तिच्याच आठवणी पताका लावल्यासारख्या फडफडत होत्या. असेच किती दिवस गेले कुणास ठाऊक, शेवटी असह्य होऊन तो सरळ केबिनला कुलूप ठोकून सांगल्याला निघून गेला.

पण तिथे जाऊन काही खास बदल झालाच नाही उलट त्याच्या लहानपणच्या सगळ्या कडवट आठवणींनी त्याच्या मनात घर केले. एकीकडे त्याला त्या दिवसांतले आई बाबामधील शीतयुद्ध, अबोला, उघड भांडणही न होता एकमेकांपासून तुटत जाऊन शेवटी आईचे निघून जाणे नि नंतर बाबाचे कित्येक वर्षे चिडचिडत रहाणे दिसत होते आणि आपण हे आपल्या बाबतीत होऊ दिले नाही हे लॉजीकली पटत होते. पण बाकी सगळं काही झाकोळून टाकणारी उर्वी आणि तिच्या आठवणी त्याला स्वस्थ बसू देत नव्हत्या. दुपारी बाबाच्या कपाटात सापडलेली ओल्ड मंक उघडून त्याने सगळं काही विसरून जायचा प्रयत्न केला पण बाटली हलकी झाली तरी त्याचे मन अजूनही तितकेच जड होते. तारवटलेल्या डोळ्यांनी एकटक छताकडे पहात तो तसाच पडून राहिला. उर्वीपासून दूर गेल्याने तिचीही त्याच्यासारखीच अवस्था असेल हे जाणून निदान तिची इंटरव्ह्यू छापायची इच्छा तरी पूर्ण करावी या हेतूने त्याने शेजारीच पडलेला सेलफोन उचलून पेज पॅल्स पब्लिशिंगला कॉल केला. बस्स, आता सगळं नीट होईल म्हणून तो पुन्हा बेडवर पडला.

सलग वाजणाऱ्या डोअर बेलने तो भानावर आला तेव्हा दुसऱ्या दिवशी दुपारचे दोन वाजले होते. जडावलेल्या पापण्या कशाबशा उघड्या ठेवत त्याने दार उघडले. दरवाज्याच्या चौकटीवर हात रोवून फते उभा होता. त्याला बघून आदित्यने परत दार लावायचा प्रयत्न केला पण तो सरळ दार ढकलून आत घुसला.

"ओ प्पाजी की हाल? अंदर तो बुलाओ यार! कैसी रही ट्रिप? भाब्बी कैसी है?" आत येता येताच हसत हसत त्याने सरबत्ती सुरू केली.

"मत पूछ." आदित्य पुन्हा जाऊन सोफ्यावर आडवा होत मिटल्या डोळ्यांनी म्हणाला.

"क्या हुआ यार, इतना मूड क्यू ऑफ करके बैठा है?" फते त्याच्या शेजारी बसत म्हणाला. उत्तरादाखल आदित्यच्या कपाळावर फक्त आठ्या उमटल्या होत्या. "ठीक है, मत बता. मुझे पता है तुने कुछ खाया भी नही होगा. देख बीजीने तेरे पसंदीदा मदरे आलू, खट्टामीठा कद्दु, रोटी, डुबका और मोटा भात भेजा है!" हातातला भलामोठा पाच पुडी टिफिन उचलून दाखवत तो म्हणाला. "और सीडरभी तुम्हे याद कर रहा है, लेके आऊ क्या?"

सीडरच्या उल्लेखाने आदित्यच्या डोळ्यात चमक आली पण त्याने लगेच नकारार्थी मान हलवली. "अभी तुम्हारे पास ही रखो, मैं बाद मे लेके जाऊंगा."

सीडरलाही नकार दिल्याने प्रकरण बरंच मोठं आहे हे फते समजून गेला. "ठीक है फिर.. मै निकलता हूँ. खाना याद से खा लेना. कल आता हूं, मुझे टिफिन बिल्कुल खाली दिखना चाहीए." टिफिन डायनिंग टेबलवर ठेवता ठेवता तिथे पडलेला मोबाईल उचलून त्याने पटकन उर्वीचा नंबर आपल्या फोनमध्ये डायल करून ठेवला. "चलता हूँ फिर!" म्हणत दरवाजा ओढून तो बाहेर गेला.

टिफिन उघडून एव्हाना गार होत आलेले मदरे आलू आणि एक रोटी खाल्ल्यावर त्याच्या जरा जीवात जीव आला. बाकी टिफिन फ्रिजमध्ये ढकलून त्याने मोबाईल उचलला. अपेक्षेप्रमाणे पेज पॅल्सची ईमेल आलेलीच होती. पण मजकूर अनपेक्षित होता. उर्वीने नकार दिला होता! कसं शक्य आहे? ज्या गोष्टीसाठी तिने इतके प्रयत्न केले ती गोष्टच नकोशी कशी होऊ शकते? तिच्या करियरसाठी हा एवढा गोल्डन चान्स आहे तरीही? तो कोड्यात पडला होता, एकीकडून त्याला बरं वाटत होतं की ती त्याला काय वाटतं याला महत्व देते आहे पण तिच्या कष्टाचं चीज व्हावं असंही वाटत होतं. तिच्या अटीवर तो खूप वेळ विचार करत राहिला. तिला परत भेटून तो नक्की वितळेल हे त्याला चांगलंच ठाऊक होतं त्यामुळे तो पर्यायच नव्हता. काय करावं ज्याने उर्वीपासून लांब राहता येईल आणि त्याचवेळी तिच्या दुःखात भर पडणार नाही असा काही फॉर्म्युला त्याला सुचत नव्हता.

विचारांमधून बाहेर येण्यासाठी तो कोपऱ्यातली काठी घेऊन बाहेर पडला. मळलेल्या डोंगरी पायवाटेवरून सफरचंदाच्या बागेत पोहोचेपर्यंत कडेकडेने पिवळे पडलेले गवत तेवढे त्याच्या सोबतीला होते. नवीन रुजवात करायला हारीने खणलेले खड्डे आणि आणि बहर संपून अर्धवट छाटणी केलेली मोठी विरक्त झाडे त्याची वाट बघत होती. दोन तीन महिन्यांपूर्वी लालभडक, रसाळ फळांनी ओथंबलेली झाडे आता ओकीबोकी पाने गाळताना बघवत नव्हती. पण हे कायम थोडंच आहे लवकरच पुन्हा गुलाबी फुलोऱ्याने ती लदबदून जातील, एका वठलेल्या खोडावर हात फिरवीत तो थोडासा हसला. काठीने वाळक्या फांद्या, काटक्या तोडत, वाटेतले चुकार दगड धोंडे दूर ढकलत शेवटपर्यंत पोहोचला तरीही त्याचे मन अजून उर्वीपाशीच घोटाळत होते. पानापानांतून काळोखाची शाई दाट होऊ लागल्यावर काही पर्याय नसल्यासारखा तो घराकडे वळला. घरी येऊन हॉलमध्ये येरझारा घालताना काहीतरी आठवून तो बेडरूममध्ये गेला. बॅग उघडली आणि उर्वीने कधीतरी वाचायला दिलेलं ग्रेसच्या कवितांचं पुस्तक बाहेर काढलं. पहिल्या पानावर निळ्या शाईने लिहिलेल्या उर्वीच्या नावावर हळुवार बोट फिरवत त्याने मिळेल ते पान उघडलं.

या व्याकुळ संध्यासमयी
शब्दांचा जीव वितळतो,
डोळ्यात कुणाच्या क्षितिजे
मी अपुले हात उजळतो...

तू आठवणीतून माझ्या
कधी रंगीत वाट पसरशी,
अंधार व्रताची समई
कधी असते माझ्यापाशी...

त्याच्या कोरड्याठक्क डोळ्यांत पाणी साचायला सुरुवात होताच पुस्तक मिटून त्याने उशीखाली सरकवले आणि तसाच आढ्याकडे पहात झोपायचा प्रयत्न करू लागला.

छताच्या नक्षीदार काचेतून ऊन्हाचा कवडसा थेट डोळ्यांवर पडल्यावर आदित्यला जाग आली. डोळे चोळत उठून ब्रश करता करता तो विचार करत होता. बाहेर येऊन त्याने कॉफी केली. हातातला मग टेबलवर ठेऊन मोबाईल उचलला आणि उर्वीला पटापट टेक्स्ट केला.

A: Why won't you write that article?
फोन हातात घट्ट धरून तो रिप्लायची वाट बघत होता. दहा मिनिटांनी निराश होऊन त्याने फोन खाली ठेवला. रिकामा मग उचलून तो सिंककडे वळताच मेसेजचा आवाज आला. गर्रकन वळून त्याने घाईत मेसेज वाचला.

U: I would love to write.

त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं.
A: nice.

U: once you give me an interview. Face to face.
तिचा रिप्लाय बघून लगेच ते हसू मावळलं.

A: Not gonna happen.

काही सेकंदात तिचा रिप्लाय आला.
U: Then find someone else.

रागाने त्याने ओठ घट्ट मिटून घेतले आणि फोन खाली ठेवला. कमॉन यार छापून टाक ना तो इंटरव्ह्यू! मी कशाला समोर यायला पाहिजे. तिला परत भेटलो तर तिच्यापासून कधीच लांब जाता येणार नाही हे त्याला जाणवत होतं आणि त्यामुळेच आपण घेतलेला निर्णय खरंच योग्य होता का हा प्रश्न पुनःपुन्हा पडत होता. त्याने घटाघट पाणी पिऊन ग्लास टेबलवर ठेवला आणि पुन्हा मोबाईल उचलून टाईप केले.
A: why are you being so difficult?

थोड्या वेळाने तिचा रिप्लाय आला.
U: Coz you lied to me. Fact is you love me.

त्याने डोळे मिटून घेतले.

क्रमशः

FB_IMG_1619684163337.jpg
फोटो कर्टसी: इंटरनेट

Keywords: 

लेख: 

चांदणचुरा : वादी के उस पार - २

भाग १

'आपल्यामधली मौनाची दरी पसरतच चालली आहे आणि मी त्या गर्तेत खोल खोल जातोय.'

आदित्यने डायरीचे पहिलेच पान उघडले होते. दुपारचा चहा झाल्यावर बाबांच्या कपाटातली पुस्तके खालीवर करून बघताना मध्येच त्यांची डायरी त्याच्या हाती लागली होती. त्यांच्या वैयक्तीक गोष्टी वाचू नये असा एक विचार एकवार त्याच्या मनात चमकून गेला पण आता बाबा नाहीत तर काय हरकत आहे म्हणून त्याने डायरी बाहेर काढलीच. बाबांच्याच आरामखुर्चीत बसून त्याने डायरी उघडली.

आई मुंबईला निघून गेली त्यानंतरच्या दिवसांपासून डायरी सुरू झाली होती. सुरुवातीचा प्रचंड संताप, एकटेपणाची भावना, आदित्यला एकट्याने वाढवण्याचा ताण, फॉरेस्ट गार्डस् ची लाचखोरी, जंगलात वाढलेल्या लाकूडचोऱ्या आणि शिकारी, अधेमधे लिहिलेले फॅक्टरीतले हिशेब ह्या सगळ्या आठवणी त्याला त्या फिकुटलेल्या पिवळसर जाड कागदावरच्या काळ्या ठळक अक्षरात लिहीलेल्या नोंदींमध्ये विखुरलेल्या सापडत होत्या. आई निघून गेल्यामुळे त्यांच्या रागाचा पारा भयंकर होताच पण तो जसजशी पाने उलटून पुढे गेला तसतसा त्यांचा रागही निवळत गेलेला वाटत होता. कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतरच्या एकटेपणात तर त्यांना आईची आठवण येत होती पण आपल्या इगोपायी त्यांनी तसे आदित्यला कधीच जाणवू दिले नव्हते.

तुरळक दोन चार ओळी लिहिताना मध्येच एक पान भरून लिहिलेले दिसले म्हणून आदित्य उत्सुकतेने वाचू लागला.

१० मार्च २०१०

ह्या काजव्यांनी भरलेल्या रात्री तुझी आठवण माझ्या मनात एखाद्या झगझगीत दिव्यासारखी चमकते आहे. तू मला दिसतेस.. नेहमीच. जशी तू मला पहिल्यांदा दिसली होतीस. कॉलेजच्या ट्रिपमध्ये सगळे घोरत असताना मी नेहमीप्रमाणे लवकर जाग येऊन बाहेर आलो आणि लांबवर उगवतीच्या कोवळ्या प्रकाशात, नदीच्या स्तब्ध भासणाऱ्या पाण्यात पाय बुडवून तू बसली होतीस. तुझ्या बॉयकट केलेल्या धिटूकल्या केसांवर सूर्यकिरण चमकत होते. गुलाबी ओढणीचे एक टोक पाण्यात बुडाले होते. वरचे निरभ्र आकाशसुद्धा त्या शांततेत तुझ्यासोबतीने ध्यान लावून बसले होते. अचानक तू वळून पाहिलेस आणि तुझ्या चमकत्या घाऱ्या डोळ्यांसकट खळखळून हसलीस. वाऱ्याच्या लकेरींवर ते हास्य माझ्यापर्यंत पोहोचले आणि त्या उबदार ताजेपणात मला जिवंतपणा सापडला.  I came alive in that moment!'

पण तू नाहीस. आता फक्त कधीतरी पाठ केलेल्या बोरकरांच्या कवितेतल्या ह्या ओळीच माझ्या असतात.

लाडके श्वानसे दुःख माझे मुके
फिरता घोटाळे आगे नि मागे
लागता झापड होऊन लाकूड
पाळत करीत बसते जागे

असता चौघांत सुखांच्या ओघात
पडून राहते मिटून डोळे
डोळस परी तो उरता एकटा
टाकीत राहते कटाक्ष ओले

स्मृतींच्या घळीत स्वप्नांचे चांदणे
दाटून जेधवां लाविते लळा
वेगात धावून दूरात जाऊन
पिसाट होऊन काढिते गळा...

वाचता वाचता आदित्यने दाटून आलेला आवंढा गिळला. आईबाबांची ऍनिवर्सरी..

आजारपणात अशाच एका वेळी त्यांनी आईला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल त्यांना समजले. चिडून ते अजूनच आपल्या कोषात गेले आणि तेव्हाच त्यांनी ती अंगठी आईला पाठवून दिली. तरीही शेवटी शेवटी ते खूप हळवे होत गेले होते. रिटायरमेंट पर्यंत आदित्य आणि त्यांच्यात वेळेअभावी जो दुरावा निर्माण झाला होता तो भरून काढायचा हे ठरवून आदित्यबरोबर शक्य तेवढा वेळ त्यांनी घालवला होता. तरीसुद्धा बाबांनी जाण्यापूर्वी अनुत्तरित ठेवलेल्या आईबाबांच्या कितीतरी गोष्टी त्याला आत्ताच कळत होत्या.

डायरीच्या तळाशी एका मोठ्या लिफाफ्यात त्याला आईने पाठवलेली पत्रे ठेवली होती. न उघडलेली. लहानपणी पहिल्यांदा जेव्हा तिचे पत्र आले, ते वाचायला नकार देऊन, रुसून तो आपल्या खोलीचे दार लावून बसला होता. तेव्हापासून पुढली पत्रे बाबांनी कधी दिलीच नाहीत. त्याने ती उघडून वाचायला सुरुवात केली. त्याचे उत्तर आले नाही तरी आईने त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी त्याला पत्र लिहिले होते. प्रत्येक वाढदिवस, परीक्षा, निकाल, दहावीत हिंदी आणि इंग्लिशमध्ये सेंट्रल बोर्डात मेरिट मिळवल्याबद्दल कौतुक. कितीतरी पत्रं. आपल्या वागण्याची त्याला आता लाज वाटायला लागली. आपण तरी आईला वर्षानुवर्षे शिक्षा का देत आहोत? ती वागली ते योग्य नसेलही पण तिचं प्रेम तर होतेच ना कायम..

वाचता वाचता सहज त्याने खिडकीबाहेर पाहिले तर चांगलाच अंधार झाला होता. आकाशात पिठूर चांदण्याचा सडा होता. रात्र कधी झाली तेच समजले नव्हते. आईच्या बाजूने विचार करायला लागल्यावर त्याला हळूच तिची बाजू पटायला लागली होती तरीही त्याचे मन अजूनही तिला माफ करायला तयार नव्हते. पण उर्वी? उर्वी आईपेक्षा खूप वेगळी आहे आणि मीही बाबांपेक्षा वेगळा माणूस आहे. आम्ही मिळून कधी भविष्याचा विचार केला नाही पण अजूनही करायला काय हरकत आहे? जर आम्ही एकत्र असणं बाकी गोष्टींपेक्षा महत्वाचे असेल तर मिळून काहीतरी उत्तर शोधता येईल. तिच्याबरोबर असतानाचा प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यांसमोर तरळून गेला. विचार करतच त्याला भुकेची जाणीव झाली म्हणून त्याने फ्रिजमधला डुबका आणि भात गरम करायला ठेवला. टेबलावर पडलेला फोन उचलून त्याने रँडम प्लेलिस्ट सुरू केल्यावर अर्धवट थांबलेली गजल सुरू झाली.

नए परिंदो को उड़ने में वक़्त तो लगता है
प्यार का पहला खत लिखने में वक़्त तो लगता है

जिस्म की बात नही थी, उनके दिल तक जाना था
लंबी दूरी तै करने में वक़्त तो लगता है

गाँठ अगर लग जाए तो फिर रिश्ते हो या डोरी
लाख करे कोशिश खुलने में वक़्त तो लगता है..

गॅसवरचा डुबका ढवळताना मध्येच गाणं बंद होऊन मेसेज पिंग झाला म्हणून त्याने टेबलापाशी जाऊन फोन उचलला.

U: Look at the stars tonight. Merry Xmas!

आश्चर्याने डोळे विस्फारून तो बघतच राहिला आणि मागून डुबका चुररर जळल्याचा वास आल्यावर गॅस बंद करायला पळाला.

---

पहाटेच्या गच्च धुक्यात तो पळायला बाहेर पडला होता. थंड हवा, पायाखाली दवाने भिजलेला मातीचा रस्ता, आजूबाजूची दवाने भिजलेली हिरवीगार झाडी आणि बऱ्याच दिवसांनी शरीरात वाहणाऱ्या अड्रेनलिन मुळे त्याच्यात एकदम उत्साह संचारला होता. चार किमी पळून झाल्यावर तो बागेजवळच्या झऱ्यापाशी पोहोचला होता. जरा दम खाल्ल्यावर वाकून ते बर्फासारखे थंडगार नितळ पाणी ओंजळीने तोंडावर, हातापायांवर सपासप मारल्यावर तो तरतरीत झाला. पाणी पिऊन परत गावात शिरल्यावर त्याने घरी जाऊन टिफिन घेतला आणि सरळ फतेच्या घराकडे निघाला.

घराभोवतीच्या मातीने लिंपलेल्या भल्यामोठ्या भिंतीतलं लहानसं लाकडी दार नुसतंच लोटून ठेवलेलं होतं. कडी न वाजवता दार ढकलून तो सरळ आत गेला. सारवलेल्या मोठ्या अंगणात दोरखंडाच्या चारपाईवर म्हातारी बीजी गोधडी लपेटून बसली होती, समोरच मोठ्या चुल्ह्यावर भरभक्कम तपेल्यात पाणी तापत होते. डोक्यावर केसांची पुरचुंडी बांधून अंगात रंगीबेरंगी ऊनी स्वेटर घातलेला पाच सहा वर्षांचा गुटगुटीत गुरप्रीत चुलीसमोर उकिडवा बसून जोर लावून लावून फुंकणीने चूल्हा फुंकत होता. आदित्य दिसताच "बीजीss आदित्य अंकल!" म्हणून ओरडत येऊन त्याने आदित्यच्या पायाला मिठी मारली. त्याचे गाल ओढत सोडवून आदित्य बिजीच्या पायाला हात लावून "बीजी पाय लागू" म्हणत शेजारी जाऊन बसला.

"आदित्य? खोत्ते इत्ते दिन बाद बीजी याद आयी तुझे?" त्याचा कान धरत बीजी म्हणाली.

"सॉरी बीजी, बडे दिनो बाद सांगला आया हूं इसलीए मिल नही पाया." आदित्य हसत म्हणाला. "की हाल? अब घुटनोंमे दर्द नही है ना?"

"अब ठीक हूँ बेटा, तुमने पिछले साल जो मरहम दिया था उससे काफी ठीक हो गया. अभी फते नई बोतल भी ले आया."

इतक्यात बाहेरून पम्मी आंटी सीडरला घेऊन अंगणात आल्या. आल्याआल्या आनंदातिशयाने त्यांना हिसडा मारून सीडर भुंकत येऊन आदित्यच्या खांद्यावर पाय ठेऊन उड्या मारायला लागला. त्याचे मनसोक्त लाड करून झाल्यावर गुरप्रीत बॉल घेऊन सीडरला खेळायला घेऊन गेला.

"आदी बेटा, कब वापस आए? सब ठीक? पम्मी आंटीने हसत विचारले.

"हां आंटी दो हफ्ते पहलेही वापस आया, लेकीन चितकुल मे था. बस दो तीन दिन पहलेही यहा आया हूँ. सीडर ने ज्यादा तंग तो नही किया?" त्याने काळजीने विचारले.

"तंग किथे? हमे तो पसंद है सीडर. ये बच्चे तो उसे अकेला छोडते ही नही. पडोस के भी सब बच्चे खेलने आ जाते है. मै उसको सिर्फ अपने साथ सुबह घुमाने ले जाती हूँ" चून्नीने कपाळावरचा घाम टिपत त्या म्हणाल्या.

"अच्छा है, नही तो फते तो आठ बजे से पहले कभी उठेगा नही. मॉर्निंग वॉक तो भूलही जाओ" तो हसत म्हणाला. त्या दोघीही मान डोलवत हसल्या. "वैसे है किधर? दिख नही रहा?" त्याने विचारले.

"अरे वो हमारे शिमलावाले तायाजी की बेटी याद है? डिंपल? उसकी शादी है, लडका दिल्ली का है तो उनको शादी भी वही पर करानी थी. हम तो जा नही सके, सिर्फ प्रितो के ममीपापा और फते गये है. बैठो, मै चाय लाती हूँ" म्हणून त्या आत गेल्या.

"ओ पम्मी, चाय नही वो बादामवाला दूध भेज. मेरा बच्चा कैसा सूख गया है!" बीजी ओरडून म्हणाल्या. बीजी बरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना आतून गुरप्रीत मसाला दुधाचा मोठा स्टीलचा ग्लास दोन्ही हातानी धरून सांभाळून घेऊन आला. "प्रित्तो! देख तो, तेरे लिए कुछ है उस टिफिन मे.." आदित्य त्याचे गाल ओढत म्हणाला. "येय! चॉकलेटss" म्हणत टिफिन घेऊन तो आत पळाला.

"और बेटा, मैने कुछ सुना तेरे बारे मे. कुडी दी गल! होर दस्स, सच है क्या?" बीजी मिश्कीलपणे भुवया उडवत म्हणाल्या.

"हां है तो सही बीजी.. अब आपसे क्या छुपाना! लेकीन वो बॉम्बे मे पलीबडी है. यहां नही रह पाएगी." तो नजर चोरत म्हणाला.

"धत तेरे की! कैसा पहाडी मुंडा है तू, यहां रहना है या नही ये उसको सोचने दे. तू क्यूँ बोल रहा है वो नही रहेगी?" त्याच्या पाठीवर थाप मारत त्या म्हणाल्या.

"लेकीन.. मेरे मम्मीपापा जैसा भी हो सकता है इसलीए मैने सोचा दूर ही रहेंगे तो अच्छा."

"देख!" समोरच्या धुराळलेल्या चुल्ह्याकडे बघत त्या म्हणाल्या. "दूरीयां हवा जैसी है! लकडीमे जरासी आग होगी तो हवासे कुछ नही होगा, बुझ जाएगी. लेकीन लकडी का दिल अगर जल रहा होगा तो हवा लगतेही आग झट से जलने लगती है."

समोर धडाडून पेटलेल्या आगीत बघत त्याने ग्लास खाली ठेवला.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

चांदणचुरा : वादी के उस पार - ३ - समाप्त

#16, Sea Rock Society, Yari Road, Versova, Mumbai 400061

हातात सेलफोनवरचा पत्ता आणि डफल बॅग घेऊन तो त्या लहानश्या काळ्या लोखंडी गेटकडे तोंड करून उभा होता. टॅक्सी त्याला सोडून जाऊन पाच मिनिटे तरी झाली होती. कंपाउंड वॉलवर लपेटलेल्या गणेशवेलीवर लालचुटूक फुले बहरली होती. दारासमोरच्या झाडाला फेअरी लाईट्स गुंडाळून सजवले होते. दुसरीत असतानाचा ख्रिसमस! आठवून नकळत तो हसलाच.

मुंबईत असूनही तिथे भरपूर शांतता होती. कोणी तुरळक दूधवाला, पेपरवाला सायकलवर जातायेता दिसत होता. त्याच्या मनात अजूनही डोअरबेल वाजवावी की निघून जावं हे ठरत नव्हतं. अचानक समोर दार उघडलं आणि दाराला अडकवलेल्या कापडी पिशवीतून आईने दुधाची पिशवी आणि पेपर बाहेर काढला. आईमध्ये काहीच बदल नव्हता. पायात सपाता, पांढरी सुती सलवार, वर नाजूक फुलांच्या चिकनकारीचा आकाशी कुर्ता, आता पूर्ण पांढरा झालेला सिल्की बॉयकट! फक्त चेहऱ्यावर सुरकुत्यांचे प्रमाण वाढले असले तरी डोळ्यांत पहिल्यासारखेच तेज होते.

आत वळणार तोच गेटपलिकडे उभा आदित्य त्यांच्या नजरेस पडला. सात वर्षांपूर्वी जसा होता तसाच फक्त आता दाढीऐवजी गाल स्वच्छ होते, हेअरकट केलेला वाटत होता आणि त्याचे बाबासारखेच वेध घेणारे तीक्ष्ण डोळे जरा सौम्य झालेले दिसत होते. जीन्स आणि गुबगुबीत विंटर जॅकेटमध्येसुद्धा थोडा वाळलेला वाटत होता.

"आदी?!" त्या आनंद आणि आश्चर्याने एकदम उद्गारल्या.

तो काय करावे न उमजून मान वरखाली हलवून हसला आणि लहानसे गेट उघडून आत शिरला.

आई बाहेर आली आणि ये ये म्हणत हात धरून त्याला आत घेऊन गेली. "बस, मी चहा ठेवलाय. बाथरूम डावीकडे कॉरिडॉरच्या शेवटी आहे."

बॅग सोफ्याच्या पायाशी ठेऊन तो बाथरूममध्ये गेला. हातपाय धुवून, ब्रश करून, तोंडावर पाणी मारल्यावर समोरच्या नक्षीदार पितळी फ्रेमच्या चकचकीत आरश्यात बघताना त्याला आपण खरंच आईच्या घरात उभे असल्याची जाणीव झाली. केसांवरून हात फिरवून तो बाहेर येईतो आई सेंटर टेबलवर दोन कप ठेऊन वाट बघत होती.

"आदी, तू चहा पितोस ना? मी माझ्या पद्धतीने केलाय. चहा आणि आलं जास्त, साखर आणि दूध अगदी कमी. तुला कसा आवडतो ते सांग, पुढच्या वेळी करू." आई मान वर करून त्याच्याकडे बघत म्हणाली.

"परफेक्ट!" तो कप उचलून आईसमोरच्या सिंगल सोफ्यावर बसत म्हणाला. कपाशेजारी एका बशीत कुकीज ठेवल्या होत्या. त्याने एक कुकी उचलली आणि भुवया उंचावून आईकडे बघितलं.

"यप! त्याच आहेत!" आई गालात हसत म्हणाली.

"डबल चॉकलेट पेपरमिंट..." जिभेवर एक तुकडा घोळवत तो हळूच म्हणाला. "हम्म पण हसनचाचाइतक्या कुरकुरीत नाहीत." तो चिडवत म्हणाला.

"हो बाबा, मला बिचारीला नाही जमत तश्या." तिने अनपेक्षितपणे कबूल केले.

एकदोन क्षण उगीच कपामध्ये पाहून त्याने नजर वर करून आईकडे बघितले. आई त्याच्याकडेच एकटक बघत होती. तिचं एकटेपण, त्याच्यावरचं तिचं प्रेम आणि इतक्या वर्षांची त्याला भेटण्याची ओढ सगळं त्याला त्या पाणावलेल्या डोळ्यामध्ये दिसत होतं. तो कसा रिऍक्ट करेल या भीतीने ती खूप काठावरून त्याच्याशी बोलतेय हेही जाणवत होते.

"अम्मा!" म्हणून तो सरळ आईजवळ जाऊन बसला आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेऊन तिचे सुरकुतलेले, हिरव्या शिरा टचटचलेले दोन्ही हात हातात घेतले. "आय मिस्ड यू सो मच.."

"अँड आय मिस्ड बीइंग युअर 'अम्मा' सो मच." आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.
"आदी, मला माहिती आहे मी तुझ्याबाबतीत फार वाईट वागलेय. विश्वास ठेव मला तुला कधीच सोडून जायचं नव्हतं पण मी माझं सगळं विश्व, माझ्या करिअरबाबतीतल्या अँबिशन्स हे सगळं सोडू शकत नव्हते रे. तुझ्या बाबाला मी खूप समजावून सांगायचा प्रयत्न केला पण तो हे तेव्हा समजूच शकत नव्हता. तो त्याच्या कामात इतका गर्क होता की माझं काहीही ऐकायच्या मनःस्थितीत नव्हता. शेवटी माझ्यासमोर काही पर्यायच उरला नाही."

"I know. तू मला न्यायला तयार होतीस, पण मलाच बाबाबरोबर रहायचे होते. माझी शाळा, माझे मित्र, बडी माँ कुणालाच सोडून जायचे नव्हते." तो तिच्या हातांकडे बघत म्हणाला.

"This is all so emotionally draining.. तू आता थोडा आराम कर, आपण जेवताना बोलू. पण आत्ता तू माझ्याकडे आलास म्हणून खूप बरं वाटतंय. हे सगळं उर्वीमुळे! तिचे किती आभार मानू असं झालंय मला. गोड आहे तितकीच स्मार्ट आहे मुलगी! तुला इथे ओढून आणलं म्हणजे कणखरच म्हटलं पाहिजे तिला. काय?" आई हसत त्याच्याकडे बघत म्हणाली.

उत्तरादाखल तो फक्त ओठ चावून हसला.

----

प्रवासाचा शीण, आईच्या हातच्या भाजणीच्या दमदमीत थालिपीठांबरोबर लोण्याचा गोळा आणि खूप दिवसांनी शांत झालेलं मन हे सगळं जुळून आल्यामुळे तो जो झोपला तो सरळ दुपारी चार वाजताच उठला. त्याला उठून बाहेर आलेला बघून आईने हातातली क्रोशाची सुई आणि विणकाम बाजूला ठेवलं.

"अम्मा? तू आणि विणकाम?" त्याने आश्चर्याने विचारले.

"हाहा! हो. रिटायर्ड झाल्यावर लागला हा नाद. हे गणित सोडवल्यासारखं आहे, मेंदूत एकदा टाक्यांचा क्रम फिट बसला की न बघताही विणता येतं. तुझ्यासाठीच विणतेय... सीडरचे पॉ प्रिंट्सपण आहेत त्यात, बघ!" म्हणून त्यांनी अर्धवट विणलेला एका टोकाला देवदार वृक्षांचे बारीक पांढरे जॉमेट्रिक डिझाइन असलेला ग्रे मफलर उचलून दाखवला.

"कूल!" तो मफलर हातात घेऊन त्याच्यावरच्या पॉ प्रिंट्सची छिद्र न्याहाळत हसला.

"आदी, चार वाजले. कॉफी करू का?" आई उठता उठता म्हणाली.

"नाही, थांब थांब.." तिला परत खाली बसवत तो म्हणाला. "इथे डिसेंबरमध्ये सुद्धा इतकं गरम होतंय, कॉफी नकोच. मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय."

त्याने किचनमध्ये जाऊन काहीतरी खुडबुड केली आणि बर्फाचे खडे घातलेल्या लालचुटूक सरबताचे दोन उंच ग्लास घेऊन आला.

"टा डा! पेश है ऱ्होडोडेंड्रॉन शरबत! लेटेस्ट सीझन. बाटली मी फ्रिजमध्ये ठेवलीय."

"बढीया! हम्म आता बोला. तू नक्की मला काहीतरी विचारायला, बोलायला आला आहेस, हो ना?" एक घोट घेऊन आई म्हणाली.

"अं.. अम्मा मला तुला हे विचारायचं होतं की तू आम्हाला सोडून इकडे येण्याच्या निर्णयापर्यंत कशी आलीस? खरं खरं सांग, मला आता राग नाही येणार." आदित्य तिच्याशेजारी बसत म्हणाला.

"हम्म सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न!" चष्मा काढून बाजूला ठेवत त्या जराशा हसल्या. "विजय माझा सिनियर. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो तेव्हा कॉलेजमध्ये होतो. पुढच्या दिशा काही स्पष्ट झालेल्या नव्हत्या पण ग्रॅज्युएट झाल्यावर लगेच त्याने यूपीएससी प्रिपरेशन सुरू केले.  तो पास होईपर्यंत माझे मास्टर्स संपले होते. मला मुंबईतच राहून पीएचडी करून रिसर्चमध्ये काम करायचे होते. त्याचे ट्रेनिंग संपून तो हिमाचल केडरमध्ये नोकरीवर रुजू झाला. त्या काळानुसार वडिलांनी लगेच लग्न झालेच पाहिजे म्हणून आग्रह केला आणि मीही वेड्यासारखी त्याच्या प्रेमात असल्यामुळे लग्नाला हो म्हणाले."  ग्लास उचलून एक घोट घेऊन त्या पुढे बोलायला लागल्या.

"सुरुवातीचे काही महिने स्वप्नवत होते, लगेच तुझा जन्म झाला. तुझ्या लहानपणात काही वर्षे निघून गेली. तोपर्यंत विजयचे काम खूप वाढले होते त्याच्याकडे ना माझ्यासाठी वेळ होता ना तुझ्यासाठी. महिन्यातले जेमतेम चार दिवस तो घरी असायचा. बाकी सोयी असल्या तरी फोनची सोय नव्हती, पत्रसुद्धा पोचायला महिनाभर लागायचा अशी दुर्गम जागा, थंडी पावसात वीज जायची, बाहेरच्या जगाशी काही संबंधच नसायचा आणि मला माणसांची, गोतावळ्यात राहायची सवय होती, हिमाचली लोकांशी मला धड बोलता यायचे नाही, त्यामुळे येणारा एकटेपणा ह्या सगळ्या गोष्टी एकदम अंगावर पडल्याने मी फार डिप्रेस झाले होते. मी बऱ्याचदा महाराष्ट्रात परतण्याबद्दल विषय काढला तरी विजयला त्यात काही इंटरेस्ट नसायचा. माझ्या पीएचडी करण्याबाबतही तो उदासीन होता. त्याच्या मते मला बाकी सगळा आराम आहे फक्त मुलाला तर वाढवायचं आहे मग इतका का त्रास होतोय. मला शिक्षणात पुढे करियर करण्यात इंटरेस्ट होता, फक्त संसार, स्वयंपाक, मुलेबाळे यात आयुष्य घालवायचे नव्हते. पण त्याला माझे म्हणणेही ऐकून घ्यायला वेळ नव्हता."

"तुझ्यावरची माया माझे पाय बांधून ठेवत होती पण शेवटी मी मनावर दगड ठेवून निर्णय घेतला. युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घेतली आणि मुंबईला निघून आले, तुलाही माझ्याबरोबर घेऊन येणार होते पण विजयने तुला पाठवायला नकार दिला. मला वाटलं होतं काही काळाने तो शांत होईल आणि तुला माझ्याकडे पाठवेल पण माझ्याकडे आली ती डिवोर्स नोटीस! नंतरही मी त्याला बऱ्याच विनवण्या केल्या तरी तो बधला नाही. शेवटी काय जे झालं ते झालं."

"हम्म, इतकी वर्षे बाबाची बाजू ऐकत आलोय, मला तुझी बाजू पण समजून घ्यायची होती." तो आईकडे पाहात म्हणाला.

"उर्वीबद्दल तू काय ठरवलं आहेस?" आईने उत्सुकतेने विचारले.

"तुला कसं कळलं?" त्याने अवाक होऊन विचारले.

"माँ सब जानती है बच्चे!" त्या हसत म्हणाल्या.

" I am not so sure.. माझं प्रेम तर आहे तिच्यावर पण हिमाचलमध्ये माझ्या पहाडी लाईफस्टाईलशी ती मॅच करू शकणार नाही. आपण तिघांनी जे दुःख भोगलं ते तिच्या वाट्याला येऊ नये असं वाटतं."

"अरे! असा एकतर्फी निर्णय घेऊन मोकळा नको होऊ. प्रत्येक रिलेशनशिप वेगळी असते, प्रत्येकाची ध्येय, आयुष्याकडून अपेक्षा वेगळ्या असतात. तसाही आता काळ बदललाय, संपर्काची साधनं भरपूर आहेत. शहरातल्या सगळ्या सोयी आता सांगल्याला असतील. तू ठाम असशील तर तिचा निर्णय तिला घेऊदे. ती धाडसी मुलगी आहे, तिने जर तिकडे यायचं ठरवलं तर ती माझ्यासारखी कच नक्की खाणार नाही. तुमच्या दोघांच्या एका निर्णयावर पुढचं सगळं अवलंबून आहे. Life can make you bitter or better. Choose better!" त्याच्या खांद्यावर थोपटत त्या म्हणाल्या.

"डन! सकाळी जायचं का आपण तिला भेटायला?"
त्याने उत्साहात विचारले.

----

४ महिन्यांनंतर...

चहूकडे उमललेला सफरचंदाचा गोडगुलाबी फुलोरा, हिरवेगार सळसळते उंच देवदार, जमिनीवर खुरट्या गवतात डोलणारी निळी जांभळी रानफुले आणि मधूनच येणारी थंड वाऱ्याची झुळूक.. बागेतल्या लहानश्या मोकळ्या जागेत लाल बो बांधलेल्या तीसेक पांढऱ्या खुर्च्या मांडल्या होत्या. समोरच उर्वीचे आईबाबा, आदित्यची आई, दोघांचे जवळचे नातेवाईक, खास मित्रमंडळी आणि सांगल्यामधले काही परिचित लोक बसले होते.

"उहूं, उहूं"  खोटं खोकून रजिस्ट्रारने बोलायला सुरुवात केली. "आज हम आदित्य और उर्वीकी शादीमे शरीक हुए है. यहां दोनोने साइन करना है और दो विटनेस साइन करेंगे. विटनेस आगे आ कर बैठ जाइये." त्याचं बोलणं संपल्यावर उर्वीचे बाबा आणि आदित्यची आई रजिस्ट्रारच्या शेजारी जाऊन बसले. तो पुढे आवाज कमी करून बोलू लागला.

"आदित्य का दोस्त हूँ इसलीए ऑफिस छोडकर यहां आया हूँ, कोई उपर मेरी शिकायत मत करना!" सगळ्यांचे जोरदार हसून झाल्यावर त्याने रजिस्टर आदित्यसमोर सरकवले.

आदित्यने एकदा उर्वीला निरखून बघितले. चेहऱ्याच्या दोन्हीबाजूने बारीक वेण्या मागे नेऊन बांधलेला भरगच्च अंबाडा, त्यावर मोगऱ्याचा गजरा, कपाळावर लाल टिकली, अनाने केलेला हलकासा मेकअप आणि "कही मेरीही नजर ना लग जाए" म्हणून हनुवटीच्या कोपऱ्यात लावलेली छोटीशी काळी तीट, कानात सोन्याचे झुमके, गळ्यात पाणीदार मोत्यांचा तन्मणी आणि हातात हिरव्या चुड्याबरोबर आदित्यच्या आईने दिलेले तोडे, सुबक चापून चोपून नेसलेली गडद हिरवी लाल काठांची पैठणी आणि चेहऱ्यावर त्याला प्रेमात पाडणारं तेच मिश्कील हसू! त्याने तिच्याकडे बघून मग? काय करू? अश्या अर्थी भुवया उंचावल्या, तिने बघ बाबा! म्हणून खांदे उडवले. त्याने हसून रजिस्टरवर सही केली. मागोमाग तिनेही लगेच सही करून टाकली.

टाळ्यांच्या गजरात एकमेकांना हार घालून झाल्यावर तिच्या गळयात नाजूक सोनेरी साखळीत गुंफलेले दोन काळे मणी आणि मध्ये सोन्याचा जाळीदार मोठा मणी असलेले मंगळसूत्र घालताना तो हळूच तिच्या कानात म्हणाला, "ह्या मंगळसूत्रात बाबांचे आशीर्वाद आहेत!" तिने आश्चर्याने मान वळवून त्याच्याकडे पाहिले. "सीडूने ती रिंग शोधून काढली होती!" तो हसत म्हणाला. "येय!" म्हणून तिने त्याच्या गालावर ओठ टेकले. नेमका तो क्षण फतेने आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केला आणि खाली बसलेल्या सीडरच्या पंजावर हाय फाईव्ह दिला.

समाप्त.

Keywords: 

लेख: