क्विलिंगची घड्याळे

क्विलिंगची घड्याळे

दीड वर्शापूर्वी बहिणीला वाढदिवसाला काहीतरी वेगळी भेटवस्तू द्यावी असे डोक्यात होते. आणि नेटवर भेटवस्तू शोधता शोधता मला दिसली क्विलिंगची घड्याळे. किंमत होती १२०० ते १५०० अगदी माझ्या बजेटच्या बाहेर आणि . मग विचार केला, आपल्याला येतच क्विलिंग करायला, तर मग आपणच घड्याळ एक बनवुन द्यावे. आणि मग शोध सुरु झाला क्विलिंगसाठी मोकळ्या घड्याळाचा.

आणि फेविक्रिल हॉबी आयडियाजच्या दुकानात मिळालं एक घड्याळ. आणि भेट दिलं बहिणीला मी बनवलेलं क्विलिंगचं पहिलं घड्याळ. आणि ते पाहून तिच्याच ऑफिसमधल्या मैत्रिणींनी काही ऑर्डर्स दिल्या.

Keywords: 

कलाकृती: 

Subscribe to क्विलिंगची घड्याळे
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle