मी खेळ/ क्रीडा या विषयावर लिहीणं यापेक्षा मोठा जोक नाही. आयुष्यात मी कधी कुठलाही खेळ फार हौशीने खेळले नाहीये. समस्त क्रीडाप्रकारांचा मला जन्मजात कंटाळा. माझ्या मते या जगात एकच क्रीडाप्रकार - तोंड चालवणे. गप्पा मारणे हा माझ्या मते एक क्रीडाप्रकार आहे - आणि सर्वांत उत्तम क्रीडाप्रकार आहे.
मला आठवतय - फारा-फारा वर्षापूर्वी आपल्या मामीनी कुठेतरी निबंध लिहीला होता - माझा आवडता छंद - गप्पा मारणे . (कधी नव्हे ते) फार आवडलेला आणि पटलेला तो निबंध मला. (हे बहुदा मामीशी झालेलं पहिलं आणि शेवटचं एकमत!)
ऑगस्टमध्ये क्रीडा जगतातला सर्वात मोठा सोहळा होतो आहे. समर ऑलिंपिक्स! ५ ऑगस्टला रिओ, ब्राझिल इथं उद्घाटन सोहळा आणि त्यानंतर क्रीडाप्रेमींना पर्वणीच असे दोन आठवडे! यानिमित्त मैत्रीणवर सोहळ्याचे, त्यातल्या स्पर्धांचे धागे निघतीलच पण "सृजनाच्या वाटा" उपक्रमामध्ये ऑगस्ट महिन्यासाठी यानिमित्ताने खालील विषयांवर मैत्रीणींनी लेखन/रेखाटन करावं असं आवाहन करत आहोत-
१. शाळा- कॉलेजात खेळलेला/खेळत असलेला खेळ
२. आवडता/आवडते खेळ
३. आवडता/आवडते खेळाडू
५. लहानपणीचे खेळ, आठवणी
४. स्वतः तयार केलेला खेळ
५. खेळांची चित्रे, फोटो.
६. खेळ आणि पैसा
७. खेळातलं राजकारण