ऑगस्ट २०१६ - क्रीडा जगत

सृजनाच्या वाटा - क्रीडा जगत - आठवणी, आठवणी आणि आठवणी

सर्वप्रथम मैत्रीण टीमचे आभार 'सृजनाच्या वाटा' अंतर्गत 'क्रीडा जगत' या उपक्रमात जे विषय सुचवले आहेत त्यातील ५ नं. बद्दल - लहानपणीचे खेळ आणि आठवणी. ही ओळ वाचूनच मी लहनपणात मस्त बागडून आले आणि हे सारे इथे लिहावेसे वाटले.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

खेळ आणि मी

लहानपणीचे आठवतंय तेव्हापासून खेळ माझ्या आयुष्यातला आविभाज्य भाग आहे.
आमची पुण्यातील एरंडवणे भागातील पांडुरंग कॉलनी. २०-२५ सोसायट्या असलेली कॉलनी. अर्थात ७५-८०च्या दरम्यान इतक्या सोसायट्या नसणार. जेव्हा कर्वे रोड हा भाग जंगल होता, तेव्हा ह्या अशा निर्जनच भागात हळूहळू कुटुंबं जमू लागली व पांडुरंग कॉलनी वाढत गेली. त्या पहिल्या पिढीची मुलं ह्या नात्याने आमची माकडसेना प्रचंड होती तेव्हा. जिकडे तिकडे मुलंमुली.. एक माझ्या दादाच्या वयाचा गृप. तर एक माझ्या वयाचा.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

खेळण्याचे दिवस (भाग १)

खेळण्याचे दिवस (भाग १)

https://www.maitrin.com/node/1066 (भाग २)

दोन भावांबरोबर वाढल्यामुळे की काय माझ्यात टिपिकल "बायकी" समजले जाणारे गुणधर्म निदान त्या काळात तरी खूपच कमी असावेत. कारण "जरा तरी मुलीसारखं वागत जावं गं!" अश्या कळकळीच्या विनंत्या घरातल्या मोठ्या बायका.........म्हणजे आई, मावश्या, काक्या, माम्या, आत्या यांच्याकडून मिळायच्या.
लहानपणापासून हुंदडण्यात खूपच रस!

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

माझे क्रीडा-जगत!

मी खेळ/ क्रीडा या विषयावर लिहीणं यापेक्षा मोठा जोक नाही. आयुष्यात मी कधी कुठलाही खेळ फार हौशीने खेळले नाहीये. समस्त क्रीडाप्रकारांचा मला जन्मजात कंटाळा. माझ्या मते या जगात एकच क्रीडाप्रकार - तोंड चालवणे. गप्पा मारणे हा माझ्या मते एक क्रीडाप्रकार आहे - आणि सर्वांत उत्तम क्रीडाप्रकार आहे.

मला आठवतय - फारा-फारा वर्षापूर्वी आपल्या मामीनी कुठेतरी निबंध लिहीला होता - माझा आवडता छंद - गप्पा मारणे Lol . (कधी नव्हे ते) फार आवडलेला आणि पटलेला तो निबंध मला. (हे बहुदा मामीशी झालेलं पहिलं आणि शेवटचं एकमत!)

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

Subscribe to ऑगस्ट २०१६ - क्रीडा जगत
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle