झुंजुमुंजु झालं. पहाट वारा स्वतःबरोबर केशरी देठाच्या पारिजातकाचा मंद सुवास वाहून आणत मन प्रसन्न करीत होता. काही वेळातच पूर्व दिशा उजळू लागली. चैतन्यमय अशा सोनेरी केशरी, गुलाबी रंगांनी. अहाहा ! निसर्गाने केलेली ही केशरी उधळण सार्या सॄष्टीच्या तनामनांत सळसळता उत्साह जागवते खरी. मी आहेच असा सार्या जगताला चैतन्य बहाल करणारा. केशरी रंग स्वतःवरच खूश होत विचार करत होता.
उन्हाळ्याच्या सुट्टीचा आळस झटकायला म्हणून शुक्रवारी घरात आहेत त्या फुलांमधे वेगवेगळ्या रचना करुन बघत होते.
नंतर लक्षात आलं की ह्यामधे केशरी, पांढरा आणि हिरवा रंग जास्तीत जास्त आहेत. आणि क्लिक झालं की ह्या रचना "तिरंगा" मधे टाकता येतील. :)
रचना करताना मला फक्त वेगवेगळ्या प्रकारची कॉम्बिनेशन्स करुन बघायची होती. त्यामुळे करताना सगळी "फ्री स्टाइल"च आहे. कोणतीही इकेबानाची तंत्र ह्यामधे वापरलेली नाहीत.