चेन्नईच्या शुभश्री नटराजन यांची मूळ कल्पना आणि जगभरातील हजारो भारतीय स्त्रियांनी उचललेले शिवधनुष्य म्हणजे, गिनिज वर्ड रेकॉर्ड:लार्जेस्ट ब्लँकेट.
आता पर्यंत हे रेकॉर्ड आफ्रिकेतील आहे आणि ते ३३७७ स्क्वेअर मीटरचे आहे. हे रेकॉर्ड मोडून ५०००, हो पाच हजार स्क्वेअर मीटरचे अजस्त्र ब्लँकेट विणण्याचा विडा भारतीय स्त्री शक्तीने उचलला आहे.
एका मैत्रिणीच्या मुलीचे लग्न आहे. तिला शुभेच्छा म्हणून हा सेंटर पीस विणला. सहाही ऋतु हातात हात घालून, तिच्या संसारात छान फुलू देत :-)
सिल्किश बारीक दोऱ्याने, क्रोशाने विणलेला हा सेंटर पीस साधारण अडिच फुटाचा आहे. नेटवर त्याचा ब्लर फोटो बघितलेला. माझ्या मैत्रिणीला फार आवडलेला. मग जरा डोकं लढवून बसवलं डिझाईन.भाचीच्या नव्या घरातील टिपॉयवर शोभून दिसेल ना ?