नऊ - दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या कंपनीत आमचा एक ट्रेक करणारा ग्रुप होता. पुण्याच्या आसपास छोटे मोठे ट्रेक करायचो. कधी सकाळी जाऊन संध्याकाळी परत तर कधी मुक्कामी. फार भारी वाटायचं. कुठंही ट्रेकला जाताना नवीन कोणी सोबत येत असेल तर त्याला काय काय सोबत घ्यायचं , काय करायचं , कसं वागायचं याच्या असंख्य सुचना आम्ही द्यायचो. ट्रेकिंग म्हणजे 'अपने बायें हात का खेल'' असं झालं होतं. अशातचं एका मित्राने बातमी आणली कि नाशिक जवळ कुठेतरी दहा पंधरा दिवसांनी एक ट्रेकिंगची स्पर्धा होणार आहे. स्त्री, पुरुष आणि मिश्र अश्या तीन गटांत स्पर्धा होणार होत्या. मग काय आमची ग्रुप जुळवा जुळवीची तयारी सुरु झाली.
मागे माझ्या मैत्रिण ओळख मध्ये मैत्रिणींनी मला माझ्या ट्रेक्स बद्दल लिहायला सांगितलेलं. हल्ली तेवढे ट्रेक्स करणं होत नाही. त्यातून गेले दोन वर्ष शाळा चालू होती. पण आज बर्याचे दिवसांनी एका सोलो हाईकला जाऊन आले. त्याची चित्ररूपी झलक दाखवते इथे. आमच्या वायव्य अमेरिकेत ज्याला pacific northwest region म्हणतात, तिथला कुठलाही ट्रेक घेतला तरी हेच फोटो खपतील. सर्व ट्रेक्स सुंदर आणि असेच दिसतात :) त्यामुळे एक के फोटो देखो - सौ ट्रेक्स का आनंद ले लो! :ड