नऊ - दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या कंपनीत आमचा एक ट्रेक करणारा ग्रुप होता. पुण्याच्या आसपास छोटे मोठे ट्रेक करायचो. कधी सकाळी जाऊन संध्याकाळी परत तर कधी मुक्कामी. फार भारी वाटायचं. कुठंही ट्रेकला जाताना नवीन कोणी सोबत येत असेल तर त्याला काय काय सोबत घ्यायचं , काय करायचं , कसं वागायचं याच्या असंख्य सुचना आम्ही द्यायचो. ट्रेकिंग म्हणजे 'अपने बायें हात का खेल'' असं झालं होतं. अशातचं एका मित्राने बातमी आणली कि नाशिक जवळ कुठेतरी दहा पंधरा दिवसांनी एक ट्रेकिंगची स्पर्धा होणार आहे. स्त्री, पुरुष आणि मिश्र अश्या तीन गटांत स्पर्धा होणार होत्या. मग काय आमची ग्रुप जुळवा जुळवीची तयारी सुरु झाली.
ट्रेकिंग करणाऱ्या सगळ्यांकडे वेगवेगळ्या सुरस कहाण्याकिश्यांची पोतडी भरलेली असते.कधी नुसतीच धमाल असते तर कधी घाबरवणारा अनुभव असतो, तर कधी अकल्पित काही.
चला, आपले अनुभव, ऐकलेले किस्से ऐकवू या इथल्या मैत्रिणींना पण.
तर इथे 'आपली मैत्रीण' चालू असताना मी लिहिले होते की, मला एक तरी हिमालयातला ट्रेक करायचा आहे. इथल्या मैत्रिणींनी शुभेच्छाही दिल्या होत्या, आणि अगदी लगेचच देवाने "तथास्तु" म्हटले असावे...
जानेवरीच्या शेवटच्या आठवडयातच ह्या ट्रेकबद्दल एका मैत्रिणीने वाचले. हो-नाही करता-करता माझे जायचे ठरले, आडोलासुध्दा गळ घातली होती, पण तिला आत्ता जमणार नव्हते...
तर १२ मार्च - १७ मार्च असा कुआरी पास ट्रेक करून मी शनिवारी परत आले, आणि खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली.
त्या आधी १.५ दिवस ऋषिकेशला होतो, त्यात गंगा-आरती, व्हाइट-वॉटर-राफ्टींग, आणि गंगेवर झिप लाइनही केले.
मी आणि कविन सह्याद्रि नावाच्या एका अनरजिस्टर्ड नो प्राॅफीट नो लाॅस बेसिसवर चालणार्या ट्रेकींग संस्थेशी असोसिएटेड आहोत. सह्याद्रि ग्रुप हौशी ट्रेकर्ससाठी दर महिन्याला एक किंवा जास्त ट्रेक्स अरेंज करतो. या धाग्यात आम्ही अशा ट्रेक्सची माहीती देत जाउ. कुणाला यायचं असेल तर मला किंवा कविनला काँटॅक्ट करु शकता.