किस्से

ट्रेकमधले सुरस किस्से

ट्रेकिंग करणाऱ्या सगळ्यांकडे वेगवेगळ्या सुरस कहाण्याकिश्यांची पोतडी भरलेली असते.कधी नुसतीच धमाल असते तर कधी घाबरवणारा अनुभव असतो, तर कधी अकल्पित काही.
चला, आपले अनुभव, ऐकलेले किस्से ऐकवू या इथल्या मैत्रिणींना पण.

Keywords: 

या दु ... कानात उ

बॅंकेत काम होतं म्हणून भर पावसात चाकंतोड करत दीपक टॉकीजजवळच्या बॅंकेत गेले होते. नेहमीप्रमाणे एका दगडात अनेक पक्षी मारायचे म्हणून त्या त्या एरीयातली दोन्-चार कामं असतातच बरोबर. म्हणून कालच आणलेल्या चिनी बनावटीच्या टेबललँपच्या प्लगला अ‍ॅटॅचमेंट, बॅटरीवर चालणार्‍या मेणबत्त्यांकरता छोट्या बॅटर्‍या असे इलेक्ट्रीकच्या दुकानाशी संबधित कामं होती. बँकेशेजारीच एक इलेक्ट्रीक आणि हार्डवेअरचे दुकान दिसले. हे कॉम्बिनेशनमध्ये दुकान का बरं चालवत असतील? हा मला नेहमीच पडणारा सनातन प्रश्न आहे. तो पुन्हा डोक्यात पिंगा घालायला लागला.

Keywords: 

लेख: 

फॅमिली क्रॉनिकल्स २ : श्रीगणेशा - अर्थातच सुरुवात!

या महिन्याचा सृजनाच्या वाटाचा विषय बघितला आणि म्हटलं, अरे, हा तर आपल्या स्पेशलायझेशनचा विषय... सुरुवात - म्हणजेच श्रीगणेशा.

'आमचे येथे कशाचीही 'सुरुवात' करून मिळेल, म्हणजेच कशाचाही 'श्रीगणेशा' करून मिळेल, पुढचे तुमचे तुम्ही बघा' - अशी आमची फॅमिली टॅग लाईनच ठरेल!

कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्याचा आमचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. मग ते व्यायाम करणं असो, एखाद्या विषयावर वाचन असो, डायटिंग असो, घर स्वच्छ ठेवण्याचा उपक्रम असो. त्यातून त्या उपक्रमाला पैसे घालायचे असतील तर मग उत्साह अधिकच असतो. कुठलीही गोष्ट नुस्तीच न करण्यापेक्षा ती पैसे भरून नाही केली की कसं बरं वाटतं.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

Subscribe to किस्से
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle