शाळेच्या ग्रुपवर माझ्याच माहेरच्या कॉलनीत रहाणार्या मित्राने जेव्हा सांगितले की तू या वर्षी ५० वर्षांचा झालास, त्यानिमित्त मोठ्ठं सेलिब्रेशन असणार आहे, तेव्हा काय वाटलं कसं सांगू तुला? ५० नसले तरी २२-२३ वर्षे नक्कीच तुझ्या सान्निध्यात होते मी. तू यायचास तेव्हाचे १०-१२ दिवस म्हणजे मंतरलेले दिवस असत. अजुनही त्याचं गारुड आहे मनावर. लोक उन्हा-पावसाची तमा न बाळगता पायी चालत पंढरीला जातात, शिर्डी गाठतात. काय मिळतं त्यांना असा त्रास सोसून? माझ्या लेखी या प्रश्नांचं जे उत्तर तेच तुझ्यासमवेतचे दर वर्षीचे १०-१२ दिवस जगतानाचे उत्तर....निव्वळ आनंद.