नवरात्र आणि सणासुदीसाठी नी चे स्टेटमेंट इअरिंग्ज कलेक्शन.
खोकला, मनगटाची जुनी इंजरी, सायटिका अश्या सगळ्यांनी एकाच वेळेला हल्ला करायचे ठरवल्याने कलेक्शन यायला जाहिर केल्यापेक्षा तब्बल ४-५ दिवस उशीर लागला. पण कलेक्शन आले ना बहिणींनो! :)
हे सगळे कलेक्शन आणि इतरही अजून वस्तू प्रत्यक्ष बघणे, ट्राय करणे आणि मग आवडल्यास खरेदी किंवा आपल्या मनाप्रमाणे काही बदल करून नवीन दागिना बनवून घेण्याची ऑर्डर देणे वगैरेमधे इंटरेस्ट असेल तर पुढच्या वीकेंडला मी ठाण्यात येऊ शकते. नंतर पुण्यातही येणार आहे.
काही मैत्रिणींनी फक्त नेकपीस करशील का विचारले होते त्यासाठी पेपर, वायर आणि रेझिन वापरुन हे पेंडट्स नेकपीस करुन पाहिले. एका मैत्रिणीने दुसरा ढग आणि पाऊसवाला आणि शेवटचा घेतला :) अजून काही डिझाईन्स आहेत तेही टाकते लवकर.