गेल्या वर्षी श्रध्दाच्या खास ऑर्डरप्रमाणे 'फ्रिडा' पेडंट आणि ईअरिंग्ज सेटसाठी पहिल्यांदाच एम्ब्रोडिअरी करुन पाहिली. फ्रिडा म्हटलं की पहिलं डोळ्यासमोर येतात ती तिची केसातली रंगबिरंगी फुलं.. आणि त्यासाठी एम्ब्रोडिअरी हेच माध्यम त्याला जास्त न्याय देऊ शकेल असं मला वाटलं. त्यामुळे तेच निवडले.. आणि काय सांगू!! मलाच फार फार मजा आली करताना. चस्काच लागला जणू :ड आणि ठरवलं आता जरा पेपर माध्यम सोबत एम्ब्रोडिअरी मध्ये ही काही करुन पाहूया. आणि मग ही फ्लोरल ईअरिंग्ज करुन पाहिले. काही मोजकेच १३ डिझाईन्स केले होते.. आता बहुतेक सगळे विकले गेले आहेत. :)
आधीच्या नेकपीसची ऑर्डर पूर्ण व्हायच्या आतच श्रद्धाने बहावा आणि पलाश फुलांचा नेकपीस हवा आहे ही ऑर्डर देऊन ठेवली होती.
आणि तो कसा हवाय ते ही डिट्टेल्वार सांगितलेले. :) फुलांचे डिझाईन असलेल्या ज्वेलरीची संकल्पना मला भन्नाट वाटली.
मनात मग खूप डिझाईन्स गिरक्या घेऊ लागल्या. पण हातातल्या ईतर ऑर्डर्स पूर्ण करुन हे काम हातात घ्यायला अंमळ उशीरच झाला. :sheepish:
काही मैत्रिणींनी फक्त नेकपीस करशील का विचारले होते त्यासाठी पेपर, वायर आणि रेझिन वापरुन हे पेंडट्स नेकपीस करुन पाहिले. एका मैत्रिणीने दुसरा ढग आणि पाऊसवाला आणि शेवटचा घेतला :) अजून काही डिझाईन्स आहेत तेही टाकते लवकर.