गेल्या वर्षी श्रध्दाच्या खास ऑर्डरप्रमाणे 'फ्रिडा' पेडंट आणि ईअरिंग्ज सेटसाठी पहिल्यांदाच एम्ब्रोडिअरी करुन पाहिली. फ्रिडा म्हटलं की पहिलं डोळ्यासमोर येतात ती तिची केसातली रंगबिरंगी फुलं.. आणि त्यासाठी एम्ब्रोडिअरी हेच माध्यम त्याला जास्त न्याय देऊ शकेल असं मला वाटलं. त्यामुळे तेच निवडले.. आणि काय सांगू!! मलाच फार फार मजा आली करताना. चस्काच लागला जणू :ड आणि ठरवलं आता जरा पेपर माध्यम सोबत एम्ब्रोडिअरी मध्ये ही काही करुन पाहूया. आणि मग ही फ्लोरल ईअरिंग्ज करुन पाहिले. काही मोजकेच १३ डिझाईन्स केले होते.. आता बहुतेक सगळे विकले गेले आहेत. :)
मी काही वर्षांपूर्वी जरा दागदागिने करायला शिकले. मैत्रिणीकडे रहायला गेले होते मग थंडीच्या दिवसात दुपारी काहितरी उद्योग म्हणून शिकले. त्यानंतर एक छोटे प्रदर्षन्/सेल पण केले. प्रतिसाद बरा होता पण माझेच मन उडाले. उरलेले मटेरियल अजुन आहे. कधी कधी मैत्रिणींना भेट म्हणून करुन दिले तर तेवढेच राहिलेय आता काम. त्यातलाच हा एक पिस. मला अजुन तो पूर्ण वाटत नाही म्हणून वापरायला काढला नाही. ते रिकामे होल आहेत तिथे काय केले तर चांगले दिसेल ते कळत नाहिये. सुचवा तुम्हला काही वाटले तर. अजुन बरेच फोटो आहेत. बहुदा कुठेतरी फ्लिकरवर वगैरे. डाऊनलोड करुन टाकेन इथे.
अमेझॉन वरून बीड ज्वेलरी मेकिंग किट मागवले व बसून काय काय बनवले आहे. अजून शिकतेच आहे. परवा एक मण्यांची ओळ केश्वीला बनवून दिली. खिळ्यावर टांगली की शोभेची दिसेल अशी.
पूर्वी पडदे असत असे काचेचे. एक सेट आहे. वीकांताला काय काय बनवत असते.