आधीच्या नेकपीसची ऑर्डर पूर्ण व्हायच्या आतच श्रद्धाने बहावा आणि पलाश फुलांचा नेकपीस हवा आहे ही ऑर्डर देऊन ठेवली होती.
आणि तो कसा हवाय ते ही डिट्टेल्वार सांगितलेले. :) फुलांचे डिझाईन असलेल्या ज्वेलरीची संकल्पना मला भन्नाट वाटली.
मनात मग खूप डिझाईन्स गिरक्या घेऊ लागल्या. पण हातातल्या ईतर ऑर्डर्स पूर्ण करुन हे काम हातात घ्यायला अंमळ उशीरच झाला. :sheepish:
नवरात्र चालू आहे आणि लवकरच दिवाळी सुद्धा येईल. खरेदी चालू झाली असेल ना? साड्यांवर मॅचिंग दागिने नकोत का मग? बघा बरं आवडताहेत का? कोणाला हवे असतील तर सांगा. वेगळे कलर सुद्धा मिळतील. आत्ता जे तयार आहेत ते इथे अपलोड केलेत. जसजसे बनवेन तसे इथे अपडेट करेन.
गेले पावणे दोन वर्षे मी हाताने बनवलेल्या आर्टिफिशियल ज्वेलरीचा व्यवसाय करते आहे. फेसबुकवर अवनि आर्ट नावाने माझे पेज आहे. https://www.facebook.com/avaniarts
मी बनवलेले काही ज्वेलरी पीसेस तुम्हाला पाहण्यासाठी इथे टाकत आहे.
मी काही वर्षांपूर्वी जरा दागदागिने करायला शिकले. मैत्रिणीकडे रहायला गेले होते मग थंडीच्या दिवसात दुपारी काहितरी उद्योग म्हणून शिकले. त्यानंतर एक छोटे प्रदर्षन्/सेल पण केले. प्रतिसाद बरा होता पण माझेच मन उडाले. उरलेले मटेरियल अजुन आहे. कधी कधी मैत्रिणींना भेट म्हणून करुन दिले तर तेवढेच राहिलेय आता काम. त्यातलाच हा एक पिस. मला अजुन तो पूर्ण वाटत नाही म्हणून वापरायला काढला नाही. ते रिकामे होल आहेत तिथे काय केले तर चांगले दिसेल ते कळत नाहिये. सुचवा तुम्हला काही वाटले तर. अजुन बरेच फोटो आहेत. बहुदा कुठेतरी फ्लिकरवर वगैरे. डाऊनलोड करुन टाकेन इथे.