कोथिंबीर - शिर्षक वाचून जरा विनोदी वाटत असेल पण कोथिंबीरीत इतकं पोटेन्शियल आहे की त्यावर एक अख्खा लेख लिहिता येईल. आम्हाला कुकिंग सकट एक डिश करायला कमीत कमी १ तास लागतो. कुकिंग, डिश क्लिन करून त्यात खाली कणिक भरून, ग्रेव्ही, पिसेस सेट करून प्लेसमेंट ठरवायची, पदार्थाचं फिनिशिंग करायचं, आजूबाजूचे प्रॉप्स ठेवायचे आणि फायनल क्लिक घेण्याच्या आधी कोथिंबीर किंवा पुदिना किंवा अजुन काही, जे गार्निश शोभतय ते ठेवायचं, टेकच्या लास्ट मिनिट ला हीरोइन एकदा आरशात बघून तीट पावडर ठीक करते तसंच!
(आयुष्यात अचानक आलेल्या वळणामुळे मैत्रीण वर यायला वेळच मिळत नाहिये. एका ग्रुपवर मैत्रिणींनी तू नक्की काय करतेस ते लिहून काढायला सांगितले. थोडक्यात लिहू म्हणत मोठाच लेख झाला. इथे प्रकाशित करतेय, म्हणजे इथल्या मैत्रिणींनाही कळेल.)
फूड स्टायलिंग प्रकाराशी ओळख भूषण (लेकाच्या मित्राचा बाबा) ने करून दिली. भूषण इनामदार हा पुण्यात बोटावर मोजण्याइतक्या फूड स्टायलिस्ट मधला एक होता. त्याची वेबसाईट http://www.bhushanfoodstyling.in/ जी आता आम्ही पुढे चालवतोय ती बघितली तर तो त्याच्या कामात किती अव्वल स्थानावर होता याची कल्पना येईल.