कच्चं केळं, बटाटा आणि कच्ची पपई उकडून घ्यायचं. त्यात मीठ, आलं, हळद, हवं असल्यास तिखट घालून कुस्करून गोळे करून घ्यायचे. लागलंच तर थोडं बेसन किंवा तांदुळाची पिठी लावायची गोळे वळण्यासाठी. कॉर्नफ्लोअर सुद्धा चालेल. कोफ्ते तळून घ्यायचे. तेल तापवून त्यात तमाल पत्र, किंचित आलं, जिरं, हळद, धने जिरे पूड, मिरची (ऑप्शनल) घालायचं. किंवा हवा तो मसाला घालायचा. पाणी घालून उकळी आली की कोफ्ते सोडायचे. हे कोफ्ते रस्सा शोषून घेतात त्याचा अंदाज घेऊन पाणी घालणे. तसेच जरा मऊ च असल्याने पटकन विरघळू शकतात