फार फार वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा मी शाळेत होते आणि जेव्हा आम्ही डोंबिवली पश्चिमेला रहात होतो, तेव्हा स्टेशनजवळच्या फिश मार्केटपाशी एकजण संध्याकाळी गरमगरम बटाटा वेफर्स करत असे. ही माझी वेफर्सची पहिली ठळक आठवण आहे. याआधी वेफर्स केवळ हलवायाकडे काचेच्या बरण्यांतून पाहिले होते आणि तेच खाल्ले होते. पण लक्षात राहण्यासारखं काही नव्हतं त्यांत.
मग कधीतरी एकदा केळ्याचे वेफर्स खाल्ले. त्यांची ती काहीशी गोढीळ चव त्यावेळी आवडली नव्हती हे देखिल आठवतंय.
उरलेल्या उपिठाचे कटलेट:
भरपूर माणसांच्या जेवणाची सवय असली की दोन माणसांचा अंदाज कसा येणार? मग काय होतं जास्त... जास्त झालं तर त्यातून काहीतरी आवडीचं केलं तर संपणार! बघा कृती...कदाचित यासाठी उपीठ/ उपमा/ सांजा मुद्दाम उरवाल!
कच्चं केळं, बटाटा आणि कच्ची पपई उकडून घ्यायचं. त्यात मीठ, आलं, हळद, हवं असल्यास तिखट घालून कुस्करून गोळे करून घ्यायचे. लागलंच तर थोडं बेसन किंवा तांदुळाची पिठी लावायची गोळे वळण्यासाठी. कॉर्नफ्लोअर सुद्धा चालेल. कोफ्ते तळून घ्यायचे. तेल तापवून त्यात तमाल पत्र, किंचित आलं, जिरं, हळद, धने जिरे पूड, मिरची (ऑप्शनल) घालायचं. किंवा हवा तो मसाला घालायचा. पाणी घालून उकळी आली की कोफ्ते सोडायचे. हे कोफ्ते रस्सा शोषून घेतात त्याचा अंदाज घेऊन पाणी घालणे. तसेच जरा मऊ च असल्याने पटकन विरघळू शकतात