मैत्रिणींनो खूप दिवस इथे आले नव्हते मधेच डोकावून जात होते पण घरबसल्या एका कामात व्यस्त होते. माझ्या रेसिपी ब्लॉगवर 400 च्या पुढे रेसिपीज लिहून झाल्यात. अनेकांनी आग्रह केला होता तुझं युट्यूब चॅनल सुरू कर. पण मला त्याची शून्य माहिती त्यामुळे जमत नव्हतं. आज आत्ते सासूबाईंनी त्यांचं किचन उपलब्ध करून दिलं आणि लॉक डाऊन मध्ये लेकाने आणि नवऱ्याने सम्पूर्ण मदत केली आणि चुकतमाकत का होईना आज पहिला व्हिडिओ शेअर केलाय!सरबत
कांगडा टीच्या चौकोनी डब्यातून आदित्यने किटलीत चहा घातला. उकळत्या पाण्यात हलकेच पसरणारा सोनसळी रंग पहात त्याने आलं ठेचून दोन तुकडे घातले आणि खूष होत किटलीवर दरवळणाऱ्या वाफेत नाक खुपसून खोलवर श्वास घेतला. किटलीवर झाकण ठेवताना समोर काचेतून त्याची नजर लांबवर पसरलेल्या हिरव्यागार देवदारांच्या दाटीतून खळाळत्या बस्पाच्या प्रवाहापर्यंत गेली. उन्हात चमकत्या पाण्याकडे पाहता पाहता त्याला तो दिवस आठवला...