माझ्या डायरीला आज एक वर्ष पूर्ण झालं पण! दिवस फारच पटापट पुढे सरकत आहेत.. जॉब सुरू होऊन मागच्या महिन्यात एक वर्ष पूर्ण झालं, तेंव्हाही असंच आश्चर्ययुक्त सुखद फिलिंग होतं. त्या दिवशी बॉस भेटल्या आणि त्यांनाही सांगितलं, की मला आज (११ मार्चला) इथे १ वर्ष पूर्ण झालं. त्यांनी 'हो ना गं! खरंच!' असं म्हणून मला (FFP2 मास्क दोघींनी लावलेला होता.) एकदम मिठीच मारली..
दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला जातांना सगळ्या डिपार्टमेंट्ससाठी चॉकलेट्स घेऊन गेले आणि सर्वांना (जर्मन भाषेत) एक कॉमन इमेल लिहिली,
प्रत्येक गावात असा एक हलवाई असतो ज्याचे एखादे पक्वान्न फारच प्रसिद्ध असते जसे आमच्या नाशिक रोडला वास्को हॉटेलजवळचे घी स्टोअरमधले श्रीखंड, नाशिकला पांडेचे खव्याचे गुलाबजाम, मंगेश धन्नालाल अग्रवालची बर्फी, तसेच बासुंदी म्हटली की बुधा हलवायाचीच रबडी बासुंदी. घट्ट रबडी असलेली, चव निव्वळ अप्रतिम अशी अजूनही जिभेवर रेंगाळणारी.मला बासुंदीतली रबडी तशी फारशी आवडायची नाही मग माझी आई ती गाळून फक्त बासुंदी द्यायची.
डायरी लिहायला सुरुवात करून एक वर्ष पूर्ण झालं, ह्यावर ६ एप्रिलला पोस्ट लिहिली आणि त्या वेळेपासूनच मन डायरी लेखनाकडे ओढ घेऊ लागलं होतंच आणि कालच अशा काही अजब, सुखद धक्के देणाऱ्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या, ज्या सांगितल्यावर बहीण म्हणाली, "ताई प्लिज, लगेच हे लिहून काढ ना गं!" आईनेही त्याला दुजोरा दिला. मग आता हातातली सगळी कामं बाजूला ठेवून लिहायला सुरुवात केली.
"परवाचा स्ट्रेसफूल तरीही नोंदवायला हवा, असा दिवस आणि कालचा अनपेक्षित सुखद दिवस, असा मोठा भाग आज लिहिते आहे."
असं कालच्या भागात लिहिलं आणि विचारांच्या गाडीने ट्रॅक बदलला. आज मात्र तसं होऊ देणार नाही. प्रॉमिस! मात्र स्ट्रेसफुल भाग मोठा झाल्याने अनपेक्षित सुखद भाग पुढच्या भागात लिहीन.
परवा मी चौथ्या मजल्यावर ड्यूटीला होते. मागे एका भागात उल्लेख केलेला एक खेळ "मेन्श एर्गेरे दिश निष्त" काही आज्या तिथल्या सिटिंग कॉर्नरवर बसून खेळत होत्या.
माझाही खेळण्याचा मूड झाला, म्हणून मी त्यांना जॉईन झाले.
माझ्या नी या छोट्याश्या ब्रॅण्डला काल सहा वर्षे पूर्ण झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ऍनिव्हर्सरी कलेक्शन केले आहे.
यावर्षीच्या कलेक्शनमध्ये एकूण तीन सिरीजमधले दागिने आहेत.
१. म्हादेई सिरीज -2018 मध्ये ही सिरीज सुरू केली होती. त्यातलीच काही नवीन डिझाइन्स असतील यावर्षी.
कडक हिवाळ्यानंतर येणार वसंत ऋतू नेहमीच चैतन्य घेवून येतो. यावर्षी तर या चैतन्याची मनाला फारच गरज होती. सुदैवाने ही चैतन्याची उधळण शोधायला फार लांब जायचे नव्हते. आमच्या काउंटीतल्या निसर्गप्रेमी आणि उदार कुटुंबाच्या द्र्ष्टेपणामुळे ४८ एकराचे रान मौल्यवान निसर्गठेवा म्हणून जपले गेले आहे. दिड्शे वर्षांपेक्षाही जास्त काळ कसलीही मानवी ढवळाढवळ न झालेले रान - ओल्ड ग्रोथ फोरेस्ट . १८५७ मध्ये जॉन मेल्तझर यांनी शेती करण्यासाठी १६० एकराची जागा खरेदी केली. पुढे त्यात त्याच्या मुलाने आणि नातवाने भर घालून जागेची मालकी २८० एकरापर्यंत विस्तारली.
कवितेचा आणि माझा परिचय तसा लहानपणापासूनचा (माझ्या). पुढे 'आमच्या घराच्या उजवीकडे एक घर सोडून ती राहत असे' हे वाक्य आपोआप लिहिलं गेलं होतं ते खोडलं. (तिचा आणि माझाही परिचय लहानपणापासूनचा. पण बाहुलीच्या लग्नावरून भांडणं झाल्याने आम्ही नंतर एकमेकींशी बोलत नसू.) तर ही कविता म्हणजे काव्य वगैरे बरं का! त्या प्रकाराचा आणि माझा परिचय लहानपणापासूनचा. पण लिखाणाची सुरुवात मी कवितेने नाही केली बरं! कविता ही गद्यापेक्षा आकाराने छोटेखानी असूनही माझ्या लेखनप्रवासाची सुरुवात झाली गद्यापासून. मी जादूगार, राजकुमार आणि परी वगैरे असलेली परिकथा लिहिली होती पहिल्यांदा.
हा एक मजेशीर आणि करायला सोपा प्रकार आहे. मी गेल्या चार वर्षांत घरच्या-जवळच्याना असं मिळून वीसेक फोटो केलेत. बाकीचं पाल्हाळ लावायचं नाही त्यामुळे लहानपणी प्रयोगवहीत कसं साहित्य , कृती वगैरे लिहीत असू तसं लिहिते आहे.