डोळ्यासमोर नजर जाईल तिथपर्यंत विस्तीर्ण माळरान, सोनेरी पिवळ्या गवताने आच्छादलेले! साधारण हजारेक एकराचा त्याचा पसारा. त्याच्या ज्या कडेला मी उभी आहे. तिथून माळरान संपून उत्तरेकडे शेताडी सुरू होते. ती थेट वायव्येकडून आग्नेयेकडे पसरलेल्या पुणे सोलापूर महामार्गापर्यंत. या सगळ्यातून तिरकी काट मारून एक छोटासा ओढा वाहतो त्याचा आता रस्त्यापल्याडच्या शिवारांत फारसा माग लागत नाही. पण लागला तरी पुढे उत्तरेकडे लगेचच असलेल्या भीमेच्या काठापर्यंतच त्याची धाव असणार हे स्पष्ट आहे. पश्चिम दख्खनमध्ये अनेक ठिकाणी अगदी सर्रास आढळणार्या भौगोलिक परिसर-तुकड्यांमधलाच हा एक. गावातले लोक याला बामणथळ म्हणतात.
मैत्रीणींनो, माझ्या मैत्रीणीच्या नातेवाईकांचे (माझे पण दूरचे नातेवाईक आहेत) येवल्याला पैठणीचे दुकान आहे.
तुम्हाला तुमच्यासाठी किंवा भेट देण्यासाठी जर पैठणी घ्यायची असेन तर खात्रीशीर दुकान आहे. मी भारत भेटीत मैत्रींणींसाठी आणि नातेवाईकांसाठी १२ साड्या घेतल्या. आपल्याला कोणता रंग, प्रकार, कापड प्रकार, अपेक्षीत दर ही माहिती दिली की ते व्हॉअॅपने फोटो पाठवतात.
आपण कुरीयर चार्जेस दिले की ते आपल्याला साड्या घरपोहोच पाठवतात.