कभी यूँ भी तो हो - २

भाग १

मनवा, इडियट! घाबरतेस कसली, किती क्रिमिनल केसेस पाहिल्यास तू.." "अरे पण मी कॉर्पोरेट प्रॅक्टिस करते, क्रिमीनल थोडीच!" दुसरं वकिली मन लगेच म्हणालं.
"पोलिसांना कॉल करू शकते की.." म्हणत तिने मोबाईल पाहिला तर नो नेटवर्क. "व्हॉट द.. रोजचं नाटक आहे हे" म्हणत तिने करकरून दात आवळले. "काहीतरी करायलाच हवं. काय करू.. काय करू" म्हणत तिने इकडे तिकडे पाहिले. तेवढ्यात तिला कोपऱ्यातल्या डिस्प्ले वर ठेवलेली क्रितीची बॅट दिसली. क्रिती आता आतापर्यंत प्रोफेशनल क्रिकेट खेळत असे. अर्थात सध्याच्या स्थितीत तिला खेळणे शक्यच नव्हते म्हणून ब्रेक घेतला असेल.

हलकेच तिने पाय, गार फरशीवर टेकवले. चवड्यांवर चालत, आवाज न करता बॅट मुठीत घट्ट पकडली आणि दरवाजा किलकिला केला. हॉलमध्ये तरी पूर्ण काळोख होता. शूरपणाचा आव आणत तिने हलकेच पाऊल बाहेर टाकले. तिने डावीकडच्या किचन एरियात हळूच नजर टाकली तर लाकडी डिव्हायडरमधून उजेडाची तिरीप दिसत होती.

चोर आल्या आल्या किचनमध्ये घुसतात? भांडी-कुंडी इतकी महाग झालीत काय! विचित्रच प्रकार दिसतोय.. थंड पडलेल्या हातांनी बॅटवरची मूठ घट्ट आवळत ती किचनच्या दारात आली. मंद उजेडात ओट्याजवळ दाराकडे पाठ करून एक उंच, काळी आकृती दिसत होती. अचानक त्याने जोरात हात हलवला आणि एक सुरीचं पातं चमकलं.

तिला स्वतःलाच कळलं नाही तिच्या अंगात कुठून इतकी ताकद आली, अचानक जाऊन तिने बॅट त्याच्या पाठीला टेकवली आणि जोरात ओरडली, "हात वर! मी पोलिसांना फोन केलाय आणि माझ्याकडे डेंजरस कुत्रा आहे, जराही हलू नको."

"हेय.. ओके. फाईन. सी?" त्याने सुरी ओट्यावर ठेऊन हात वर केले तर हातात रिकामं पिवळं रॅपर होतं आणि गॅसवर नूडल्स उकळत होते. "डेंजरस कुत्रा? यू मीन जोई? आय बेट तो घोरत असेल आतासुद्धा" तो गालातल्या गालात हसत म्हणाला आणि डावा हात पुढे करून त्याने हळूच तिच्या हातातून बॅट काढून घेतली.

"ओह.. अँड हू.. आर..  यू? आणि तू आत कसा आलास?" पहिल्यांदाच तिचे त्याच्याकडे नीट लक्ष गेले आणि ती मान वर करून बघतच राहिली. केवढा उंच आहे हा, सहाच्या वर नक्कीच.. हाच पहिला विचार आला तिच्या मनात. पांढऱ्या शर्टवर घातलेला ब्लॅक स्वेटर आणि लाईट ब्लु जीन्स. डायनिंग टेबलाच्या आजूबाजूला उमटलेले ओलेत्या पावलांचे ठसे. पावसातून आत येताना त्याच्या केसात आणि लांब पापण्यांवर साचलेले थेंब चमकत होते, सरळ, लांब नाकाच्या टोकावर एक पाण्याचा थेंब सलगी करत थांबून राहिला होता आणि त्याहून चमकत्या, मिश्किल डोळ्यांनी हसत तो काहीतरी बोलत होता.

तिने एकदम तंद्रीतून जागी होऊन समोर पाहिले.
"इंद्रनील रायचौधरी. धिस इज माय मासीज हाऊस! अँड आय हॅव 'द की'! तो भुवया उंचावत म्हणाला.  "बाय द वे, हू आर यू?? ऍट धिस टाइम, अँड वेअरिंग धिस?"

त्याबरोबर चमकून तिला आठवलं की आपण फक्त ड्रामा क्वीन लिहिलेला, मिनी माउसचं चित्र असलेला पातळ होजियरी ड्रेस घातलाय आणि तो जेमतेम मांडीपर्यंत पोचतोय. शरमून तिचे गाल लालेलाल झाले पण तिने काहीच न झाल्याप्रमाणे कशीबशी आपली ओळख सांगून, अरुआंटी आणि अशोक अंकल क्रितीला भेटायला गेल्याचे सांगितले.

"आह, ओके. वॉन्ट सम मॅगी?" तो गॅसकडे वळत म्हणाला आणि तिने तिच्या खोलीत धूम ठोकली.

भाग ३

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle