वाढलेले आवाज ऐकून जोई जिन्यातून भुंकत उड्या मारत आला. खाली येता येता पटकन एक दोन पायऱ्या चुकून एकदम खाली घसरला. "जो! इझी.. इझी बॉय" म्हणत त्याने उठून चुचकारत जोईला जवळ बोलावले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवून, दोन्ही पंजे धरून त्याच्याशी गप्पा मारल्यावर तो जरा शांत झाला. मनवा आपल्या विचारात गुंतून लांबूनच त्यांचं प्रेम बघत थांबली होती. त्याचा पाय चाटत जोई कूं.. कूं.. आवाज करत हळूच खाली बसल्यावर इंद्रनीलने बोलायला सुरुवात केली.
"चलो प्रेझेंट मे आते है.. कम, सिट हिअर अँड टेक अ डीप ब्रेथ" तो शेजारी सोफ्यावर थोपटत म्हणाला. हम्म.. म्हणत सुस्कारा सोडत ती त्याच्याशेजारी जाऊन बसली. त्याने आपल्या मजबूत खांद्याकडे बोट दाखवून हसून "यू कॅन!" असं सांगितल्यावर पडत्या फळाची आज्ञा घेऊन तिने जवळ सरकून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.
"हम्म.. दिस इज कॉल्ड सुकूssन.. तो मागे डोकं टेकवत म्हणाला. पावसाळी थंड हवेत आता निशिगंधाचा गोड सुगंध दरवळत होता. "नाउ टेल मी, काय म्हणेल मां?"
"यू डोन्ट नो माय मदर! ती खूप खूप लाड करेल, प्रेम करेल.. लाईक ऑल मदर्स.. पण ती ह्या बाबतीत काही ऐकून घेणार नाही, शी विल कॉल यू होम फॉर लंच ऑर डिनर अँड शी विल ग्रिल यू!" ती आता विचारात पडली होती.
"इट्स ओन्ली अ डिनर यार, आय एम नॉट गोइंग टू डाय फ्रॉम इटिंग पूरनपोली" त्याने डोळे मिचकावले.
"पूरनपोली! त्याच्या उच्चाराला हसत तिने त्याचे परफेक्ट केस विस्कटत एक टपली मारली. "काही पुरणपोळी वगैरे मिळणार नाही तुला, दे विल आस्क यू टू मॅरी मी डफर!" ती डोक्याला हात लावत म्हणाली.
'येय!' त्याने मनातल्या मनात हवेत एक पंच मारला आणि तिच्याकडे गंभीर चेहरा करत म्हणाला, "अच्छा.. तो अब?"
"आय थिंक, मी हे सगळं ठीक करते. आईला सांगून टाकते की असं काही नाहीये, मी सौरभशी भांडता भांडता रागात बोलून गेले."
"बट देन दे विल व्ह्यू यू ऍज द सेम immature लिटल गर्ल. आय विल हेल्प यू टू प्रूव्ह, दॅट यू आर ऍन इंडिपेंडंट वूमन. यू आर केपेबल ऑफ डिसीजन मेकिंग. यू नो व्हॉट यू वॉन्ट इन युअर लाईफ. थिंक अपॉन दिस.." तो म्हणाला.
"अम्म.. खरंच तू येशील? नंतर आपण सांगू शकतो, तू निघून गेलास, लॉंग डिस्टन्स शक्य नाही सो वी ब्रोक अप etc.." ती जरा खूष होत म्हणाली. "पण तू हे सगळं माझ्यासाठी कश्याला करतो आहेस? यू विल रिअली गेट बोअर्ड.."
"कॉज आय एम अ गुड पर्सन?"
"यू आर अ वंडरफुल पर्सन!"
तेवढ्यात तिचा फोन घुर्रss आवाज करत जोरात व्हायब्रेट व्हायला लागला..
"शिट! आईचा कॉल.. " तिच्या तळव्यांना घाम आला होता. तो तिचे थंड पडलेले ओलसर हात आपल्या उबदार हातात घेत म्हणाला, "गो ऑन.. बी पॉझिटिव्ह अँड बी बोल्ड. काही नाही होत, बोल पटकन."
"बट यू डोन्ट हॅव टू डू दिस.."
"इट्स ओके, गो ऑन" तो हाताने सेलफोनकडे इशारा करत म्हणाला.
खोल श्वास घेत ती फोन घेऊन किचनमध्ये गेली.
'दे विल आस्क यू टू मॅरी मी डफर>> त्याला तिचे शब्द आठवत राहिले. अँड आय रिअली वॉन्ट दॅट टू हॅपन.. आय नीड यू इन माय लाईफ. ओन्ली यू कॅन कम्प्लिट मी. आय कॅन नेव्हर फील लाईक दिस विथ एनीबडी एल्स. आय लव्ह यू मनवा, विथ ऑल माय हार्ट.. मला तुझ्याबरोबर आयुष्यभर रहायचे आहे आणि वेळ आल्यावर मी हे तुला सांगणार आहे.' नुसत्या विचारानेच त्याला आतून अगदी शांत शांत वाटलं.
जोई एव्हाना मान टाकून बारीक घोरायला लागला होता. त्याला उचलून त्याने खालीच गेस्टरूमच्या एका कोपऱ्यात नेऊन त्याच्या बेबी ब्लॅंकेटवर झोपवले. मग स्वतः फॉर्मल्स बदलून आपल्या शॉर्टस आणि लूज टी घालून बाहेर येऊन पुणे मिरर उघडून चुळबुळ करत बसला.
किचनमधून जोरदार तापलेले डिस्कशन ऐकू येत होते, मग हळूहळू मनवाचा आवाज मऊ होत गेला आणि शेवटी बंद झाला.
ती येऊन फोन सोफ्यावर बाजूला टाकत धप्पकन त्याच्या शेजारी बसली आणि वर त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, "उद्या संध्याकाळी साडेसात वाजता."
"चिल! वी विल रॉक इट.." तो तिच्या केसांवर थोपटत म्हणाला.
"चलो, वी हॅव वर्क टूमारो! लेट्स स्लीप" म्हणत ती उठून उभी राहिली.
"टुगेदर?" तो जोई किबलकडे बघताना करतो तसा चेहरा करत म्हणाला.
"इन योर ड्रीम्स मि. रायचौधरी!" म्हणत ती आपले गुलाबी पडत चाललेले गाल लपवत तिच्या खोलीत पळून गेली.
तो हसऱ्या चेहऱ्याने उठून दिवे बंद करून आपल्या खोलीत जाऊन आडवा झाला आणि कानात इअरफोन्स घातले.
त्याचवेळी एफ एमवर लव्ह गुरूने त्याच्या मनात डोकावून पाहिल्यासारखी गजल सुरू केली..
बड़ी नाज़ुक है ये मंज़िल
मोहब्बत का सफ़र है..
धड़क आहिस्ता से ऐ दिल
मोहब्बत का सफ़र है..