स्पिति - मे महीन्यात - २७ मे - दिवस १
----------------------------------------------
एकंदर कारमध्ये घालवलेला वेळ ::जेवणखाण /मध्ये मध्ये घेतलेले ब्रेक्स धरून ~९ तास
कापलेले अंतर - ~230 km
रस्ता कसा आहे - बर्यापैकी चांगले रस्ते , पण वळणावळणाचे
हॉटेल - हॉटेल महेश झाकडी
सकाळी सकाळी ६ वाजताच्या विमानासाठी ३:३० ची ओला बोलावली .. एरवी आई २ मिनिटंग ...असा रोजच गाणं असलेली माझी लेक पण लग्गेच उठली आणि ४:२० पर्यंत एअरपोर्टवर पोचलो. ...बर्गरकिंग बघताच लेकीचा शंकर्या झाला सो नाश्टा (सकाळी ५ वाजता :) ) करून विमानांत बसलो ... ८;३० पर्यंत चंदीगड ला पोचलो .....शक्यतो आज संध्यकाळी झाकडीपर्यंत पोचायचे असा बेत होता .. २०१४ च्या ट्रिप मध्ये माझ्या सासर्याना पहिल्याच दिवशी त्रास झाल्याने मनात थोडी धाकधूक होतीच ... सगळ्या गरजू व्यक्तीना स्टुजील देऊन प्रवासाची सुरुवात केली....
व्हेकेशन देवता प्रसन्न असल्याने कुणालाही काहीच त्रास न होता आम्ही शिमल्यात पोचलो ... शिमल्यातील गर्दी आणि बकालपणा पहाता मला इथे आपण राहायचे नाहीए याचा अतीव आनंद झाला
बायपास घेऊन आम्ही शिमल्याच्या बाहेर पडलो आणि मगच जेवायला थांबलो एव्हाना गर्दी जरा कमी होऊ लागली होती
बायपास घेऊन आम्ही शिमल्याच्या बाहेर पडलो आणि मगच जेवायला थांबलो एव्हाना गर्दी जरा कमी होऊ लागली होती आणि हवेत जरासा गारवा जाणवू लागला होता ....गरम गरम जेवण झाल्यावर एक डुलकी अगदी आवश्यक होती ... मी जी मस्त ताणून दिली (बसल्या बसल्याच हां .. :) ) ती सरळ पाच च्या सुमारास उठले ...बाजूला सतलज खळाळत होती .. सुट्टी सुरु झाल्याची एकदम मस्त भावना मनात उठली
एव्हाना ज्ये ना थोडे दमले होती त्यामुळे गाडे सरळ हॉटेल महेश कडे वळवली ... झाकडी पासून पुढे सरळ कल्प्यापर्यंत दुसरं ठीकठाक हॉटेल नसल्यामुळे पुढे जाण्यात फार अर्थ पण नव्हता