ह्या गोष्टीची सुरुवात होते २०१४ मध्ये...आम्ही ७ जण म्हणजे आम्ही दोघे, दोघांचेही आई वडील आणि आमची ८ वर्षाची लेक असे सगळे किन्नोरच्या ट्रिपला गेलो होतो... तेव्हाच हिमालय फिवरची लागण झाली होती.... ही ट्रिप आम्ही अगदी सावकाश आणि आरामात, थांबत थांबत केली होती.
त्यानंतर २०१५ मार्चमध्ये आम्ही तिघेच फक्त एकदा येऊन गेलो... ह्यावेळी आम्ही स्पितीची तोंड ओळख करण्यापुरती एक "डे ट्रिप " फक्त करून आलो होतो. यावेळी मात्र आम्हाला तिघांनाही हिमालयाने पुरतं वेडं करून सोडलं.... आम्ही परत आलो ते मोठ्या स्पिती ट्रिपची स्वप्नं बघतच...
स्पिति - मे महीन्यात -दिवस ५- ३१ मे
---------------------------------------------- एकंदर कारमध्ये घालवलेला वेळ ::साधारणपणे पाच एक तास. पण आम्ही अगदी खुळावल्यासारखे ठायी ठायी थांबलो .. इतके नादिष्ट लोक नसतील तर कमी वेळ पुरेल
आठ तास पूर्ण झोप झाल्यावर आम्ही सगळे चांगले फ्रेश झालो होतो शिवाय आजचा दिवसही तसा आरामाचाच होता.. आज हिक्किम आणि अशी छोटीशी डे ट्रीप करण्याचा इरादा होता. हिक्कीम हे जगातलं सगळ्यात उंचीवर असणारं पोस्ट ऑफिस आहे. लांगजा हे डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटस गाव आहे. गाव म्हणण्यापेक्षा दहा एक घरांची वस्ती, हे जास्त योग्य वर्णन होईल.
आज आम्ही 4450 मीटरपर्यंत उंचीवर जाणार होतो आणि त्यामुळे आजपासून आम्ही ए एम एस साठी असणारी औषधे ज्येनांसाठी तरी चालू केली होती. शिवाय उंचीशी सवय व्हावी म्हणून आजचा दिवस तसा छोटासाच ठेवला होता.
स्पिति - मे महीन्यात - 2९ मे - दिवस ३
---------------------------------------------- एकंदर कारमध्ये घालवलेला वेळ ::जेवणखाण /मध्ये मध्ये घेतलेले ब्रेक्स धरून ~७-७:३०तास - मध्ये ब्लस्टिंग साठी थान्बाय्ला लागले होते त्यामुळे बराच वेळ गेला.
कापलेले अंतर - ~२१० km
रस्ता कसा आहे - तसा ठीक ठीक आहे पण ब्लास्टिन्म्मुळे काही ठिकाणी खूप खराब आहे
हॉटेल - हॉटेल कुन्फेन काझा
लोसर ला जायला जमणार नाही म्ह्णून थोडे हिरमुसले होऊनच आम्ही झोपलो पण उठल्यावर जो काही नजारा दिसला! आहाहा असे शब्द अगदी सहजच तोंडातून बाहेर पडले...
ह्या गोष्टीची सुरुवात होते २०१४ मध्ये ...आम्ही ७ जण म्हणजे आम्ही दोघे , दोघांचेही आई वडील आणि आमची ८ वर्षाची लेक असे सगळे किन्नोर च्या ट्रिप ला गेलो होतो ... तेव्हाच हिमालय फिवर ची लागण झाली होती .... ही ट्रिप आम्हे अगदी सावकाश आणि आरामात , थांबत थांबत केली होती.
त्यानंतर २०१५मार्च मध्ये आम्ही तिघेच फक्त एकदा येऊन गेलो ... ह्यावेळी आम्ही स्पिती ची तोंड ओळख करण्यापुरती एक "डे ट्रिप " फक्त करून आलो होतो. यावेळी मात्र आम्हाला तिघांनाही हिमालयाने पुरतं वेडं करून सोडलं .... आम्ही परत आलो ते मोठ्या स्पिती ट्रिप ची स्वप्न बघतच