स्पिति - मे महीन्यात - 2९ मे - दिवस ३
----------------------------------------------
एकंदर कारमध्ये घालवलेला वेळ ::जेवणखाण /मध्ये मध्ये घेतलेले ब्रेक्स धरून ~७-७:३०तास - मध्ये ब्लस्टिंग साठी थान्बाय्ला लागले होते त्यामुळे बराच वेळ गेला.
कापलेले अंतर - ~२१० km
रस्ता कसा आहे - तसा ठीक ठीक आहे पण ब्लास्टिन्म्मुळे काही ठिकाणी खूप खराब आहे
हॉटेल - हॉटेल कुन्फेन काझा
लोसर ला जायला जमणार नाही म्ह्णून थोडे हिरमुसले होऊनच आम्ही झोपलो पण उठल्यावर जो काही नजारा दिसला! आहाहा असे शब्द अगदी सहजच तोंडातून बाहेर पडले...
इतका सुंदर नजारा बघितला तेवढ्या वेळात गरम-गरम ब्रेकफास्टमुळे पोटालाही बरं वाटलं होतं मनात मात्र लोसर मिस होणार याची खंत कुठेतरी खात होती
इथे येताना आम्ही नेटवर शोधाशोध केली होती त्यामध्ये लोसर येथे आम्हाला अजून एक हॉटेल कळल होतं .. त्याचं नाव होतं नोंंमाद्स काटेज लोसर... आम्ही आधी बूक केलेलं हॉटेल उपलब्ध नाही म्हटल्यावर एकदा विचार मनात आला या हॉटेल ला फोन करून बघावा का ?खरं म्हणजे ज्येनांना थंडी सोसेल का अशी भीती वाटत होती तरी पण हिय्या करून फोन केलाच.
लोसरला राहू शकू का याची खात्री नसली तरी लोसरला राहण्याची शक्यता वाढल्यामुळे माझा नेहमीचा जीव सुखावला होता 2018 च्या आमच्या ट्रीप मध्ये हे गाव आमच्या भलताच मनात भरलं होतं.इथे जायला मिळेल अशी शक्यता निर्माण झाल्यामुळे सुखावलेले आमचे जीव गाडीत घालून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. आज काझा पर्यंत जायचा बेत होता. रस्त्यात जमलं तर गुईची मम्मी आणि धन कार बघायचा बेत होता अर्थात नियतीच्या मनात काही वेगळंच होतं ...थोडा पुढे गेल्यानंतर कळलं की रस्त्याच्या स्पीलोच्या पुढे ब्लास्टिंग चालू होतं... आता मात्र आमच्या मनात टेन्शन यायला लागलं... काझा पर्यंत तरी पोचू का असा प्रश्न पडायला लागला …
आता आम्ही स्पिटी मध्ये प्रवेश करत होतो काल पर्यंत हिरवागार दिसणारा हिमालय आता रुद्र दिसत होता ...करड्या आणि तपकिरी छ्टांचा प्रभाव आता वाढत होता...
थोड्याच वेळात स्पिलोला पोचलो.. गरम गरम मोमो आणि फ्राईड राईस असा लंच केला, तेवढ्यात ड्रायव्हरने बातमी आणली की इथून पुढे लगेचच ब्लास्टिंग सुरू होतंय, त्यामुळे अडकायला होऊ शकेल.झालंही अगदी तसंच. जरा पुढे जातोय तोपर्यंत आमची गाडी पडली अडकून. अर्थात गरम-गरम जेवण पोटात गेलेले असल्यामुळे सगळ्यांचाच मूड छान होता.हा वेळ आम्ही सत्कारणी लावण्यासाठी आम्ही भरपूर फोटो काढले.
फोटो काढण्यात आणि उन खाण्यात आमचा वेळ तसा चांगला गेला होता त्यामुळे ट्रॅफीक मध्ये अडकल्याचा काही फार कंटाळा आला नाही पण परत गाडी सुरू झाली, तेव्हा जाणवलं आमचा वेळ भरपूर मोडला होता. शेवटी गुई आणि धनकार आज करायचं नाही आणि डायरेक्ट काझ्यांला जाऊ असा आम्ही ठरवलं. जमलंतर परतीच्या वेळी धनकार करू अशी मनाची समजूत घातली आणि काझ्याच्या रस्त्याला लागलो.
थोडा पुढे जातोय तोच हा धबधबा आम्हाला दिसला गेल्या वर्षीही आम्ही याच रस्त्याने गेलो होतो आणि तेव्हा मात्र हा धबधबा नक्कीच एवढा मोठा नव्हता यामुळेच तर यावर्षी बर्फ जास्त झाला आहे यावर शिक्कामोर्तब झालं... जास्ती बर्फ यामुळे यामुळे माझी लेक अगदी खुश झाली पण ज्येनांना खूप थंडी वाजेल काय अशी चिंता कुठेतरी माझ्या मनात होती.
अर्थात आत्तापासून सगळ्यांना थंडी विषयी घाबरवून यात काहीच अर्थ नव्हता त्यामुळे माझी शंका मी माझ्या मनातच ठेवली आणि आम्ही पुढे निघालो... सतलज आणि स्पिटी चा संगम हे आजचं खास आकर्षण होतं. आमच्या गेल्यावर्षीच्या ट्रीपमध्येच हा स्पॉट मला जादुई वाटला होता... हिमालयातली ही जादू आई-बाबांना दाखवायला आता माझा जीव अगदी आतुर झाला होता
याच पॉईंटचे फोटो बघून माझे सासरे गेल्यावर्षी वेडावले होते.. त्यांचं वय लक्षात घेता त्यांना स्पिटी फिरवायची असेल तर फार वर्षे थांबू नये असा विचार करून आम्ही ही ट्रीप लगेच याच वर्षी अरेंज केली. ही जागा बघताना ते इतके खुश झाले आणि त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी ही खुशी बघून... ही ट्रीप अरेंज करण्याच्या आमच्या मेहनतीचं सार्थक झालं
सतलज आणि स्पिटीचा हा संगम मागे सोडला आणि स्पिटी ची कास धरून आम्ही पुढे निघालो.. यापुढेही स्पिटीच आमची सोबत करणार होती... आता चित्र परत एकदा बदलत होते करडा रंगांमध्ये थोडी चमकदार तपकिरी छटा येत होती.. सगळ्यात छान म्हणजे स्पिटीचे हायलाईट असलेली वाळूची पफॉर्मेशन्स आता दिसायला लागली होती प्रचंड वारा आणि बर्फ यामुळे डोंगरांचे इरोजन होऊन ही फॉर्मेशन तयार होतात
एव्हाना सात साडेसात तासाचा प्रवास झाला होता आणि सगळ्यांना थकवा जाणवायला लागला होता आजचा प्रवास आवरता घेऊन आता हॉटेलला जाऊ असं आम्ही ठरवलं .मागच्या वर्षीच्या हॉटेल मध्ये राहिलो ते हॉटेल आम्हाला खूप आवडलं होतं त्यामुळे आम्ही तिथंच राहायचं ठरवलं होतं. हे हॉटेल काझा मॉनेस्ट्री ला अगदी चिकटून आहे. दिवसभर येथे मंत्रपठणाचा एक छान आवाज येत असतो.